असा सांगतात पत्ता...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
गोष्ट तशी जुनी. मुंबईत चर्चगेट भागातल्या प्रतिष्ठा भवन या इमारतीमध्ये माझं काही काम होतं. पत्ते, रस्ते लक्षात ठेवणं, हा माझा प्रांत नव्हे. म्हणजे लग्नापूर्वी नवं घर घेतल्यानंतर आणि लग्नानंतर सुरूवातीच्या काळात त्या घरी जातानाही मी दोन-तीन वेळा रस्ता चुकून भलतीकडे पोहोचल्याचं आठवतंय.
तर... मला प्रतिष्ठा भवनात काही काम होतं. चर्चगेट भागातल्या कार्यालयात होते मी. तिथले आमचे वरीष्ठ नुकतेच नागपूरहून बदली होऊन आले होते. त्यांनी तिथवर पोहोचायचे दोन-तीन मार्ग मला उत्साहाने सांगितले. पत्ते समजून घेताना माझा घोळ होतो, असं त्यांना सांगितलं आणि मला समजेल अशा सोप्या प्रकारे पत्ता सांगा, अशी विनंती केली.
त्यावर ते हसत म्हणाले, रस्ते नाही ना लक्षात राहत तुझ्या. बरं. पण तरी सुद्धा मी सांगतो, तशी जाशील तर चटकन पोहोचशील. एकदम सोपं आहे बघ. तुला आपलं वानखेडे स्टेडियम माहिती आहे ना... त्याच्या समोरची इमारत...
अरे वा. मस्त. हे नक्की लक्षात राहील... खुश होत मी म्हणाले.
मग नवऱ्याला फोन केला. ऐन वेळी तिथे जाणं ठरलं, त्यामुळे घरी पोहोचायला उशीर होईल, हे नवऱ्याच्या कानावर घातलं. सुदैवाने काही कामानिमित्त नवरा त्याच भागात होता.
मी पोहोचतो पाच मिनिटात, आपण सोबत जाऊ.. असं म्हणून नवऱ्याने फोन ठेवला.
हे एक बरं झालं. मला रस्ता आणि पत्ता दोन्ही शोधायचा त्रास नाही. माझे बाबा आणि नवरा या दोघांनाही पत्ते अचूक शोधता येतात. दोघांचीही मला न आवडणारी एक समान सवय म्हणजे कोणत्याही ठिकाणी पोहोचायचे एकापेक्षा जास्त रस्ते दाखवायचे. एकाच ठिकाणी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रस्त्याने घेऊन जायचं. वर आणखी, लक्षात आला का रस्ता, हे विचारायचं...
विषयांतर झालं थोडं... असो...
तर ठरल्याप्रमाणे नवरा आला. आपल्याला वानखेडे समोरच्या इमारतीत जायचंय... बाईकवर बसता-बसता नवऱ्याला सांगितलं. बरं, म्हणून नवऱ्याने बाईक सुरू केली. गप्पा मारत आम्ही वानखेडे स्टेडियमजवळ पोहोचलो. अरेच्चा.. सरांनी वर्णन केल्याप्रमाणे एकही इमारत इथे दिसेना. आता काय करावं. मग नवऱ्याने इमारतीचं नाव विचारलं. झालं... मला फक्त प्रतिष्ठा इतकंच आठवत होतं. पुढचं काही आठवेना. प्रतिष्ठा असं काही नाव आहे. नावात प्रतिष्ठा आहे इतकं नक्की.. चाचरत उत्तर दिलं मी.
बरं. आता प्रतिष्ठा नावाने शोधाशोध सुरू झाली. पण तरीही ती इमारत सापडेना. दिसणाऱ्या सगळ्या पानवाल्यांना विचारून झालं... कोणालाच सांगता येईना.
मग कंटाळून त्या सरांना फोन केला.
सर, त्या इमारतीचं नाव प्रतिष्ठाच आहे ना.
हो. पोहोचलीस का तू...
अहो सर, तुम्ही वानखेडेच्या समोर म्हणालात ना... इथे तुम्ही सांगितल्यासारखी एकही इमारत दिसत नाही...
काय सांगतेस... अगं, आयकर भवनच्या थोडं पुढे गेलं की दिसेल तुला ती इमारत. खूप जुनी आहे ती. कोणीही सांगेल...
बरं. मग मी आता आयकर भवन विचारते सर... इतकं म्हणून फोन ठेवला.
आमचा संवाद ऐकणारा नवरा माझ्याकडे इतकं विचित्रपणे का बघतोय, हे कळेना. मी काही म्हणायच्या आधी नवऱ्यानेच विचारलं, आयकर भवनच्या पुढे का... बस...
हो, म्हणत मी बसले आणि पुन्हा प्रवास सुरू. अरे आपण वानखेडे पासून इतके दूर का जातोय...
तुला पोहोचायचंय ना वेळेत. मग थोडा वेळ शांत राहा बघू.. नवऱ्याने दटावलं.
थोड्याच वेळात एका इमारतीसमोर येऊन थांबलो आम्ही.
हेच प्रतिष्ठा भवन. मी थांबतो इथे. तू जाऊन ये. मग बोलू आपण...
बरं, म्हणत मी इमारतीत शिरले. काम झालं. बाहेर आले. मग नवऱ्याने समोर बोट दाखवत सांगितलं, ते बघ वानखेडे स्टेडियम... काय पत्ता सांगितला तुला सरांनी...
सर मला म्हणाले वानखेडे स्टेडियम समोरची इमारत...
बरोबर... समोरचीच इमारत... आणि हे प्रतिष्ठा भवन... पण दोन्हीच्या मध्ये रेल्वेचे रूळ आहेत, हे माहिती नाही का त्यांना...
क्षणार्धात सगळा घोळ लक्षात आला माझ्या... मग दोघं मस्त हसत सुटलो...
प्रतिक्रिया
हा हा हा जबरदस्त
खीक....
माधुरीताई, तरी फक्त रुळांच्या
आता
माझा नोकिया मॅप्स चा अनुभव
बापरे, एखाद्या हॉलीवूड
गोल स्टेडियम
:-)
हा हा हा
बराचवेळ आठवत नव्हतं पण आत्ता
प्रसंगाचे वर्णन आवडले. मला
रूळं ओलाडून का नाही गेलात मग.
तुम्ही मुंबईत फार फिरला नाहीत का...
बाइकवर असल्याकारणाने जमले
जुने मुंबईकर
बरोबर..
पुण्यात फिर फिर फिरलो
पुणेकरांना पत्ता विचारला
यावरुन आठवलं. मुंबईला सी एस
तसे नसेल हो प्यारे साहेब.
पुणेकर
मस्तं, छान लिहिलय.
मी आणि कोणताही पत्ता यांच फार
पत्ता
:)
पत्ते शोधने
भारी किस्सा.
@सोन्य मारुति चोउक
चोक झालो.
पुण्यामध्ये पत्ता शोधायचा,
पुण्यात कसब्यात किंवा हडपसर
हाहाहा!