Skip to main content

एक अनुभव

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 01/09/2015 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात तसे भूताखेतांचे किस्से खूप ऐकवले जायचे. कधीतरी मलासुद्धा भूत पाहायला मिळाव हे अगदी मनापासून वाटायचं मला. अंधारात दुरून दिसणाऱ्या झाडाला हात लाऊन परत येण्याची पैज मी कित्येकदा जिंकली असेल. (खर सांगायचं तर जीवावर उदार होऊन आणि मनातली भीती लपवत करत असायचो मी हे सगळ), आजवर मी कुणाच्या अंगात भूत आलेलं पाहिलं नव्हत. आणि त्या दिवशी तो योग जमून आला. माझ्या शेजारच्याच घरी हळदीचा कार्यक्रम होता, माझी वर्गमैत्रीण हि त्याच घरात होती. त्यानिमित्ताने तिच्याशी बोलन होईल म्हणून तिथे गेलो होतो, अपेक्षेप्रमाणे ती एकटी बसलेली दिसली मला. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो.. हलून हळू आम्ही खूप विषयांवर चर्चा केली. अर्धातास आम्ही बोललो असू, इतक्यात हळदीच्या DJ वर नाचणाऱ्या माझ्या मित्राने मला ओढत जाऊन नाचायला नेल...५ मिनिट झाली नसतील तोच समोर गर्दी जमा झालेली दिसली.. कुतुहुलाने मी पुढे जाऊन पाहिलं तर माझी वर्गमैत्रीण खूप भेसूर असा आवाज आवाज काढत संशयाच्या नजरेने सगळ्यांकडे पाहत होती.. तिच्या दोन्ही बंधूनी पकडून ठेवलं होत तिला.. एरवी तिच्यात नसणार पण अचानक आलेल बळ स्पष्ट जाणवत होत....त्या दोघानाही तिला संभाळण कठीण होऊन बसल होत.... क्रमश... एक अनुभव - २
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3170
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वाचतोय! पुभाप्र! पण थोडं सविस्तर लिहा. भयकथा तशाच जास्त खुलतात.

सर्दी खांसी ना मलेरिया हुवा------ हिस्टेरिया हुवा

>>>> अर्धातास आम्ही बोललो असू, इतक्यात हळदीच्या DJ वर नाचणाऱ्या माझ्या मित्राने मला ओढत जाऊन नाचायला नेल...५ मिनिट झाली नसतील तोच समोर गर्दी जमा झालेली दिसली. नक्की काय 'चोउन्सेल्लिन्ग' केलंत अर्ध्या तासात की नंतर पाच मिन्टात पोरगी बिघडली??? दया, कुछ तो गडबड है ;)

और दिखओ और दिखाओ.....