पटेल, न पटेल
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
व्हर्जिनियात राहणारे ग्लॅडिस आणि जिम त्यांच्या टेक्सासला राहणार्या मुलीला भेटायला दुपारी गाडीने निघाले होते. संध्याकाळ होता-होता वाटेत टेनेसी राज्यातल्या नॉक्सव्हिलपाशी पोहोचल्यावर त्यांनी रात्रीपुरतं एखाद्या मोटेल मध्ये रहायचं ठरवलं होतं. 40 West Expressway मधून exit घेउन ते बाहेर पडले. मोटेलची शोधाशोध करत असतांना एका रस्त्यावर 'Rama.. Inn' अशी नियॉन साईन दिसली. जवळ पोहोचल्यावर कळलं की पूर्वीच्या 'Ramada Inn' मधली दोन अक्षरं काढून टाकलेली होती, पण एकंदरीत इमारत आणि आसपासचा परिसर नीट-नेटका होता. ग्लॅडिसने गाडी पार्किंग लॉट मध्ये लावली आणि आपापली एक-एक बॅग घेऊन दोघे मोटेलच्या लॉबीकडे निघाले.
लॉबीचं दार उघडताच समोर काऊंटर दिसला, पण तिथे कुणी नव्हतं. काही क्षणातच - बहुधा त्यांच्या दार उघडल्याची घंटा आत वाजली असल्याने असावं- काऊंटर मागचं दार उघडलं आणि एक अमेरिकन फॉर्मल वस्त्रांतली पण सावळी, चाळिशीच्या आत-बाहेरची अशी भारतीय गुजराती स्त्री आतून हसतमुखाने 'गुड इव्हिनिंग' म्हणत बाहेर आली. तिच्या मागचं दार हळू-हळू बंद होतं, पण ते पूर्ण बंद व्हायच्या आत आतला भारतीय मसालेदार स्वयंपाकाचा वास बाहेर आलाच! ग्लॅडिस आणि जिम दोघांनीही अनाहूतपणे दीर्घ श्वास घेतला, त्यांच्या चेहेर्याकडे पहात ती मोटेल फ्रंट डेस्क क्लर्क घाई-घाईने म्हणाली 'सॉरी अबाऊट द स्मेल!"
"नाही, नाही, उलट मीच तुम्हाला विचारणार होते की वास छान येतोय, जेवण अजून चालू आहे की आम्हाला उशीर झालाय?"
त्यांच्याकडे गोंधळून पहात ती डेस्क क्लर्क म्हणाली, "सॉरी, पण या मोटेलमध्ये रेस्टॉरंट नाहीये...मी स्वयंपाकात होते...आमचं किचन मागेच आहे."
"ओह! सॉरी! पण आम्हाला डिनर घ्यायचं होतं, इथे कुठे जवळपास भारतीय रेस्टॉरंट मिळेल का?"
"नाही, जवळ नाहीये, दहा-एक मैलांवर जावं लागेल, पण तुम्हाला इतर काही चालणार असेल तर पुढच्याच चौकात एक चागलं इटालियन रेस्टॉरंट आहे, मी हवं तर मॅप देऊ शकेन तुम्ही चेक-इन केलंत की."
"चालेल," ग्लॅडिस थोडंसं अनिच्छेनेच म्हणाली, "आम्ही शॉवर घेऊन मग जाऊन येऊ."
चेक-इन करून कार्ड कीज घेऊन दोघे आपल्या रूममध्ये पोहोचले.
बॅगा अनपॅक करून जिमने दोघांचे दुसर्या दिवशीचे कपडे हॅंगरला लावून ठेवेपर्यंत ग्लॅडिस शॉवर घेऊन आली होती. तिच्यानंतर जिम शॉवर घेऊन आला आणि दोघे जेवायला जायला बाहेर निघणार इतक्यात दारावर कळेल-न-कळेल अशी हळूवार टकटक ऐकू आली. ग्लॅडिसने पुढे होऊन दार उघडलं. मघाची डेस्क क्लर्क बाहेर उभी होती, हातात एक ट्रे, आणि ट्रे वर दोन प्लास्टिक आवरणाने झाकलेल्या प्लेट्स.
"आय होप यू डोंट माईंड, तुम्हाला चालणार असेल तर मी ही लँब करी केलीय ती आणलीय तुमच्यासाठी."
भूक उसळलेली असतांना वाफाळत्या प्लेट्स मधून येणारा तो अफलातून सुगंध घेत जिम म्हणाला, "दॅट्स व्हेरी काईंड ऑफ यू! पण कशाला त्रास घेतलात?"
"त्रास कसला?" प्लेट्स कॉफी टेबलवर ठेवत ती म्हणाली, "मी खात नाही नॉन-व्हेज, पण माझ्या नवर्याने आज बिझिनेस ट्रिपहून येतांना त्याच्या आवडीचा लॅंब कट आणला होता, म्हणून त्याच्यासाठी केलं होतं त्यातलंच थोडंसं तुम्हाला आणलंय, इतकंच. बरोबर नान ही आहे."
"थोडंसं कुठलं? हे पुरून उरेल आम्हाला दोघांना! याचे पैसे दिले तर घ्याल का?'
"मुळीच नाही, दिस इस ऑन द हाऊस! एंजॉय!" असं म्हणून ती दार ओढून घेऊन परत जायला निघाली. पण ग्लॅडिसने तिला थांबवलं, म्हणाली, "निदान बसा तर दोन मिनिटं. मला नेहेमीच कुतुहल वाटत आलंय मोटेल्स चालवणार्या भारतीयांचं, तुम्ही पटेल का?"
ती हसत म्हणाली, "हो, कसं ओळखलं?"
"नाही, अमेरिकेतल्या पन्नास टक्के मोटेल्स पटेल या एकाच आडनावाच्या भारतीयांच्या आहेत हे मी ऐकून आहे म्हणून खडा टाकला इतकंच. काय नाव तुमचं?"
"मी आशा पटेल. आणि खरंय तुम्ही म्हणता ते. आमच्या स्वतःच्याच तीन मोटेल्स आहेत या एका शहरात."
"आणि तुम्ही सगळी मंडळी भारतातल्या एकाच समाजातली आहात ना? कौतुक आहे किती चिकाटीने तुम्ही हा बिझिनेस वाढवता ते" जिम म्हणाला, "आम्हा सर्वसाधारण अमेरिकन लोकांना का जमत नाही हे?"
आशा म्हणाली, "खरं सांगू का? फक्त भारतीय पटेलच नाही, तर चिनी लोकंही असेच कष्टाळू असतात. आमची दीर्घ काळ कष्ट करायची तयारी असते. आम्ही कुटुंबाची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत नेतो, आमची मनोधारणा अशी असते की दहा डॉलरचे वीस, वीसाचे पन्नास असं करत हजार जमेपर्यंत धीर सोडायचा नाही, मग चिकाटीने त्याचे हजारो होतात यथावकाश!"
"मग अमेरिकन का नाही करत असं?"
"रागावणार नसाल तर खरं सांगू? मला वाटतं बहुसंख्य अमेरिकन लोकांना असं वाटतं की माझ्याकडे मिलियन डॉलर्स असतील तरच त्याचे बिलियन होणार, मिलियनच नाही तर कशाला प्रयत्न करायचे, आहे ते बरं आहे!"
जिम आणि ग्लॅडिस दोघेही हसले, ग्लॅडिस म्हणाली, "खरंय, अमेरिकन लोकांना कॉलेज संपलं की एकदम जीएम चा सीईओ व्हायचं असतं!"
आणखी काही मिनिटे भारतीय मसाले वगैरे विषयांवर बोलून झाल्यावर आशा खाली निघून गेली.
जेवणं आवरून झाल्यावर थोडा वेळ लोकल टीव्ही चॅनेल्स वर हवामान वगैरे ऐकून झाल्यावर जिम म्हणाला, "नाहीतरी बाहेर जाण्यासाठी कपडे घातलेच होते, चल जरा शहरातून ड्राईव्ह घेऊन येऊयात आणि मग झोप काढू, सकाळी लवकर चेक आऊट करू या."
दोघे रूम बंद करून एलिव्हेटरने खाली लॉबीत उतरले. बाहेर जातांना पाहिलं तर काऊंटर पुन्हा निर्मनुष्य. 'आता रात्री कुणी उशीरा येणारे प्रवासी नसतील' असा विचार करीत दोघे दाराकडे निघाले, इतक्यात दार उघडून आशा बाहेरून आत येतांना दिसली. डाव्या हातात गाडीची किल्ली आणि उजव्या हातात मॅक्डॉनल्डची कागदी बॅग.
"अरेच्चा! इतकं उत्तम जेवण आम्हाला खायला घातलंत आणि तुम्हाला स्वतःसाठी बाहेरून आणावं लागलं? सो सॉरी!"
"नाही, नाही," ती ओशाळून म्हणाली, " हे मॅकचिकन सँडविच आणि फ्रेंच फ्राईज आहेत, आम्ही भारतीय राहिलो आहोत, पण आमची मुलं अमेरिकन झालीयेत, त्यांना भारतीय खाणं आवडत नाही, म्हणून मग रोज...."
प्रतिक्रिया
कथा पटली. अगदी मॅकडॉनल्ड नाही
कथा आवडली
लेख छान वाटला
हम्म..
छान, विचार करण्याजोगी कथा आहे.
@बहुगुणः
मस्त लेख.
मला ही तसेच वाटले, पण हा लेख
घ्या.
खरचं
छान गोष्ट !
अरेच्चा, सरप्राइजिंगली फ्रेश!
अगदी
मस्तच
मस्त कथा !
गुड. वेरी गुड.
खूप मस्तं लेख. पटेल मंडळींचं
लेख फार आवडला. अगत्य आणि खास
लेख आवडला. शीर्षक समर्पक :)
अमेरिकन लोकांना कॉलेज संपलं
पटेल आणि गुजरथी समाज
छान
नो पटेल?
उुगीच
थोडे पटेल... :)
विकासजी एक उत्सुकता म्हणून
नाही...
धन्यवाद विकासजी!
लेखन आवडल!! अर्थात भारतिय
छान
आवडला...
मस्त! वर म्हटल्याप्रमाणेच
+१
लेख छान.
लेख आवडला !
छान लेख!
अनेक मॉटेल्स...
लेख आवडला!
लेख आवडला.हार्दिकबद्दल