Skip to main content

तव्यावरचा शेंगदाणे-मिरचीचा झटपट ठेचा

लेखक मंजुषा१९८० यांनी गुरुवार, 27/08/2015 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस सात-आठ मिरच्या मूठभर शेंगदाणे लसणाच्या चार-पाच पाकळ्या जीरे दोन चमचे तेल कोथिंबीर, मीठ मार्गदर्शन
  • प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
  • लसूण पाकळ्या चिराव्यात.
  • तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
  • ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जीरे शेवटी टकल्याने ते जळत नाही.
  • मग मीठ टाकून त्याला जाडेभरडे ठेचावे.
  • हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
  • तोंडी लावायला अगदी चवदार !!
टीपा मिक्सर वापरू नये. ठेचलेलाच छान लागतो. माहितीचा स्रोत मी स्वत:

वाचने 13657
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

मम :) पण पुढच्या वेळी फोटो पण टाका. फोटो टाकण्यासाठी काही मदत हवी असेल तर कळवा.

In reply to by यशोधरा

ताई, माझ्या मते खडे मीठ टाकले तर फारच बरे! दुसरे अजून एक, साध्या पण चविष्ट तांदळाचा गरमागरम भात, खमंग लसणाच्या फोडणीचं पिठलं, लिंबाचं गोड लोणचं, आणि लोणकढं तूप याबरोबर हा ठेचा अप्रतिम अप्रतिम लागतो! पावसाळी दिवसात तर असा मेन्यू फारच सुंदर!

In reply to by मनुराणी

बगड़ी। नेलीस। काय ग तू तिकडे. मी पण करते baryacha। बडगीत. आज बगडित कुटलेले भरित खाणाऱ् आहे ग मी. उगाच तुला थोड़ी जलजल व्हावी म्हणून अवांतर लिहिले बाक़ी काय नैय.

In reply to by त्रिवेणी

हो मी बडगी आणलीय इकडे. आणि भरताचं म्हणशील तर गेल्या भारतवारीत मनसोक्त खाल्लेय. आणि इकडे जांभळ्या वांग्यावर भागवते पण ती चव येत नाही.

In reply to by मनुराणी

मस्तं पाकृ मंजुषा. माझ्याकडे ही बडगी आहेच तर करतेच त्यात लवकरच.

मिरच्या बारीक नै काय चिरत, तशाच भाजतो तव्यावर, मग सगळं खलबत्त्यात कुटतो....भरडं, मग त्यावर शेंगदाण्याच तेल ओतुन (हो हो ओतुन) बाजरी, ज्वारी किंवा कळण्याची भाकर या बरोबर हादडतो.

आमच्या येथे थोडा वेगळा प्रकार होतो. पहिले मिरच्या भाजुन ठेचा केला जातो. ज्या मध्ये लसन ठेचतानाच घातला जातो. अता तव्यावर थोडे तेल घालुन त्यात ठेचा, शेंगदाण्याचा (जाडसर) कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन परतवून घेतला जातो. यात मिरचिचा तिखट पना थोडा कमी होतो. आणि खायला हि चविष्ट.

नुसतं मिरच्या तव्यावर तेलावर परतून मिठात खरडल्या की शिळी भाकरवर चौदार लागतो.मग वढ्यावर जाऊन पाणी। प्यायचे.आणि झाडाखाली सावलीत थोडं आडवं व्हायचं.

बडगी म्हणजे वर दिलेला सगळं एकत्र ठेचण्यासाठी वापरले जाणारे एक लाकडी खलब्त्त्या सदृश्य औजार.

In reply to by इरसाल

ओह्ह्ह. मी लाकडी खलबत्ता च म्हणतो. बा द वे वरवंट्यानं वाटण्यात आणि बत्त्यानं ठेचण्यामुळे पदार्थाच्या चवीत बदल होतो बहुतेक. वरचा प्रकार भरड वाटल्यानंतर अधिक चविष्ट लागतो. अवांतर- खोबरं किंवा शेंगदाने वेगवेगळ्या प्रकारे बारीक केल्यावर चवीला वेगळे लागतात. खवणलेलं खोबरं नी मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं टोटल वेगळे लागतात.

In reply to by प्यारे१

लाकडी चव मिसळुन मस्त चव येते, जशी मदिरा ओकच्या लाकडापासुन बनवलेल्या पिंपात ठेवली असता ;)

In reply to by इरसाल

>>>मदिरा ओकच्या ही पु ना ओकांची कोणी नातलग की काय असा प्रश्न पडला. मदिरा ऐवजी मंदिरा वाचलं होतं. ;)

मला वेळ मिळाला की ठेचा बनवण्याचे काम मी आवडीने करतो... ५-६ मिरच्या + थोडासा आल्याचा तुकडा + लसणीच्या ३-४ कळ्या +काळ मीठ + लिंबु + { इच्छा असल्यास भाजलेले दाणे} मिरच्या भा़जुन मग वरचे पदार्थ मस्त मिक्सर मधे काढुन घेतो. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

तुम्ही फोटो का नाही टाकत? माझी आई देखील अशा प्रकारे तव्यावर मिरची आणि शेंगदाण्याची एकत्र चटणी करते.