जिन्नस
सात-आठ मिरच्या
मूठभर शेंगदाणे
लसणाच्या चार-पाच पाकळ्या
जीरे
दोन चमचे तेल
कोथिंबीर, मीठ
मार्गदर्शन
- प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
- लसूण पाकळ्या चिराव्यात.
- तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
- ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जीरे शेवटी टकल्याने ते जळत नाही.
- मग मीठ टाकून त्याला जाडेभरडे ठेचावे.
- हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
- तोंडी लावायला अगदी चवदार !!
वाचने
13631
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
करुन पाहते, वाचूनच अहाहा
मम :) पण पुढच्या वेळी फोटो पण
In reply to करुन पाहते, वाचूनच अहाहा by यशोधरा
ताई, माझ्या मते खडे मीठ टाकले
In reply to करुन पाहते, वाचूनच अहाहा by यशोधरा
आठवण काढल्याबरोबर करणे आले!
मी आज करतेच.
छान आहे
अाम्ही ठेचा असाच करतो अगदी पण
बगड़ी। नेलीस। काय ग तू तिकडे.
In reply to अाम्ही ठेचा असाच करतो अगदी पण by मनुराणी
हो मी बडगी आणलीय इकडे. आणि
In reply to बगड़ी। नेलीस। काय ग तू तिकडे. by त्रिवेणी
मस्तं पाकृ मंजुषा.
In reply to हो मी बडगी आणलीय इकडे. आणि by मनुराणी
आमी
कळण्याची भाकर
In reply to आमी by इरसाल
मस्त !!
वाह.....
पन....
In reply to वाह..... by बाबा योगिराज
नुसतं मिरच्या तव्यावर तेलावर
दणका आणि झणका पाकृ.
बडगी
ओह्ह्ह. मी लाकडी खलबत्ता च
In reply to बडगी by इरसाल
बरोबर
In reply to ओह्ह्ह. मी लाकडी खलबत्ता च by प्यारे१
>>>मदिरा ओकच्या
In reply to बरोबर by इरसाल
ठेचा...! क्या कहने !
छान आहे पाकृ
मला वेळ मिळाला की ठेचा
माझा आवडता पदार्थ.
फोटू.........................
तुम्ही फोटो का नाही टाकत?
केल्याने होत आहे रे.....