विश्वासघात ! : ०२
विश्वासघात ! : ०१
फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते.
फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य!"
"एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. दुसर्याच क्षणी त्याच्या हातांनी खाली सरकून तिच्या गळ्याभोवती पोलादी विळखा आवळला. शुद्ध हरपताना तिने ऐकले, "बाय बाय, डबल एजंट !"
========
विश्वासघात ! : ०२
डबल एजंट प्रेयसीला संपवताना त्याच्या डोळ्यासमोर फक्त कर्तव्यपूर्ती होती. तिचे कलेवर बिछान्यावर चादरीखाली झाकून, हाताचे ठसे पुसून तो निघाला. वस्तुस्थितीच्या जाणिवेने त्याच्या काळजात कळ आली. हेरखात्याचे ब्रीदवाक्य त्याने शंभराव्या वेळेला घोकले, "सर्वतोपरी कर्तव्य". आदेशाप्रमाणे तो निकिताच्या फ्लॅटवर पोचला. "मोहिमेत मला रीमाची जागा दिलीय. पटकन सगळा प्लॅन सांग." निकिता. टेबलावरच्या लॅपटॉपवरचा प्लॅन समजावून देत असताना निकिता त्याच्या खुर्चीमागे उभी होती. सगळे सांगून झाले आणि त्याचा फोन वाजला. त्याने फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला, "खोटे संदेश पाठवून आपल्या हेरांच्या हत्या घडवून आणणारा डबल एजंट सापडला. निकिताला संपव." चमकून त्याने मागे वळून पाहिले... निकिताच्या पिस्तुलातली गोळी विस्फारलेल्या डोळ्यांच्या मधोमध छेद करत त्याच्या कवटीत घुसली. ========Book traversal links for विश्वासघात ! : ०२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारी झालाय उत्तरार्ध! +१.
+१
मस्तच!!!!
+१
रोचक उत्तरार्ध.
+१
+१
मस्त लिहिलाय.
+१
फारच भारी.
सुपर्ब!
आवडल.
जबरीच.
वा !!
मस्तच!
+१
डॉ इ ए साहेब,
+१
+१
एकच नंबर ! क्या बात है !
+१
लैच जब्बर
जबराट..
सहमत डाॅकसाहेब राॅक्स!!! +१
एखादी थ्रिलर सीरीज येऊ च दे
मस्त
वाह मस्तच
जबराट
मस्त
मस्त !
मस्त!
सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक
उत्तरार्ध आवडला
धन्यवाद !
हाहा!
सहमत पैसाताई. डाॅक येऊ दे एक
झक्कास
कथेला +११
+१
+१
+१
+1
वा