✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्वासघात ! : ०२

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 08/23/2015 - 23:20  ·  लेख
लेख
विश्वासघात ! : ०१ फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्‍या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते. फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य!" "एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. दुसर्‍याच क्षणी त्याच्या हातांनी खाली सरकून तिच्या गळ्याभोवती पोलादी विळखा आवळला. शुद्ध हरपताना तिने ऐकले, "बाय बाय, डबल एजंट !" ========

विश्वासघात ! : ०२

डबल एजंट प्रेयसीला संपवताना त्याच्या डोळ्यासमोर फक्त कर्तव्यपूर्ती होती. तिचे कलेवर बिछान्यावर चादरीखाली झाकून, हाताचे ठसे पुसून तो निघाला. वस्तुस्थितीच्या जाणिवेने त्याच्या काळजात कळ आली. हेरखात्याचे ब्रीदवाक्य त्याने शंभराव्या वेळेला घोकले, "सर्वतोपरी कर्तव्य". आदेशाप्रमाणे तो निकिताच्या फ्लॅटवर पोचला. "मोहिमेत मला रीमाची जागा दिलीय. पटकन सगळा प्लॅन सांग." निकिता. टेबलावरच्या लॅपटॉपवरचा प्लॅन समजावून देत असताना निकिता त्याच्या खुर्चीमागे उभी होती. सगळे सांगून झाले आणि त्याचा फोन वाजला. त्याने फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला, "खोटे संदेश पाठवून आपल्या हेरांच्या हत्या घडवून आणणारा डबल एजंट सापडला. निकिताला संपव." चमकून त्याने मागे वळून पाहिले... निकिताच्या पिस्तुलातली गोळी विस्फारलेल्या डोळ्यांच्या मधोमध छेद करत त्याच्या कवटीत घुसली. ========

Book traversal links for विश्वासघात ! : ०२

  • ‹ [शतशब्दकथा स्पर्धा] विश्वासघात !
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11087 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

भारी झालाय उत्तरार्ध! +१.

रेवती
Sun, 08/23/2015 - 23:24 नवीन
भारी झालाय उत्तरार्ध! +१.
  • Log in or register to post comments

+१

संदीप डांगे
Sun, 08/23/2015 - 23:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments

मस्तच!!!!

स्नेहानिकेत
Sun, 08/23/2015 - 23:52 नवीन
मस्तच!!!!
  • Log in or register to post comments

+१

नितिन५८८
Mon, 08/24/2015 - 00:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments

रोचक उत्तरार्ध.

द-बाहुबली
Mon, 08/24/2015 - 01:45 नवीन
रच्याकने, निकिता नाव मला खुप आवडते. याच नावाचा एक फ्रेंच चित्रपटही बघीतला होता तो ही तरुणीवर होता जिला सिक्रेट सर्वीस असासीन बनवते...
  • Log in or register to post comments

+१

पिलीयन रायडर
Mon, 08/24/2015 - 02:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Mon, 08/24/2015 - 02:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलाय.

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 03:27 नवीन
मस्त लिहिलाय.
  • Log in or register to post comments

+१

जुइ
Mon, 08/24/2015 - 03:42 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

फारच भारी.

अरवीन्द नरहर जोशि.
Mon, 08/24/2015 - 04:02 नवीन
फारच भारी.
  • Log in or register to post comments

सुपर्ब!

एस
Mon, 08/24/2015 - 05:30 नवीन
सुपर्ब!
  • Log in or register to post comments

आवडल.

जेपी
Mon, 08/24/2015 - 06:25 नवीन
आवडल.
  • Log in or register to post comments

जबरीच.

प्रचेतस
Mon, 08/24/2015 - 08:53 नवीन
जबरीच.
  • Log in or register to post comments

वा !!

खटपट्या
Mon, 08/24/2015 - 08:57 नवीन
वा !!
  • Log in or register to post comments

मस्तच!

अजया
Mon, 08/24/2015 - 09:04 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

+१

नाव आडनाव
Mon, 08/24/2015 - 09:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments

डॉ इ ए साहेब,

पगला गजोधर
Mon, 08/24/2015 - 09:47 नवीन
एक मस्त स्पाय थ्रिलर लिहून काढान तुम्ही…. अशी १००, २०० शब्दात बोळवण करू नका ब्वा आमची :)
  • Log in or register to post comments

+१

gogglya
Mon, 08/24/2015 - 10:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

सिध्दार्थ
Mon, 08/24/2015 - 11:25 नवीन
+१ एक नंबर
  • Log in or register to post comments

एकच नंबर ! क्या बात है !

उगा काहितरीच
Mon, 08/24/2015 - 11:44 नवीन
एकच नंबर ! क्या बात है !
  • Log in or register to post comments

+१

पद्मावति
Mon, 08/24/2015 - 12:20 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments

लैच जब्बर

मास्टरमाईन्ड
Mon, 08/24/2015 - 14:53 नवीन
तुम्ही खरंच एक थ्रिलर लिहा राव.
  • Log in or register to post comments

जबराट..

चिगो
Mon, 08/24/2015 - 15:05 नवीन
जबराट. डॉक्टरसाहेब.. 'थ्रिलर' लिखाणाची विनंती मनावर घ्याच..
  • Log in or register to post comments

सहमत डाॅकसाहेब राॅक्स!!! +१

मांत्रिक
Mon, 08/24/2015 - 16:30 नवीन
सहमत डाॅकसाहेब राॅक्स!!! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

एखादी थ्रिलर सीरीज येऊ च दे

प्यारे१
Wed, 08/26/2015 - 16:58 नवीन
एखादी थ्रिलर सीरीज येऊ च दे सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मस्त

मित्रहो
Mon, 08/24/2015 - 17:10 नवीन
+१ मस्त कथा
  • Log in or register to post comments

वाह मस्तच

जगप्रवासी
Mon, 08/24/2015 - 17:22 नवीन
वाह मस्तच
  • Log in or register to post comments

जबराट

प्रशांत
Mon, 08/24/2015 - 17:35 नवीन
जबराट
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
Mon, 08/24/2015 - 18:29 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

मस्त !

बबन ताम्बे
Mon, 08/24/2015 - 18:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments

मस्त!

बोका-ए-आझम
Mon, 08/24/2015 - 18:37 नवीन
+१
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/24/2015 - 20:16 नवीन
सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

उत्तरार्ध आवडला

पैसा
Mon, 08/24/2015 - 20:21 नवीन
उत्तरार्ध आवडला, पण अजून यापुढचा भाग लिहा ही विनंती! जो कोण पाकिस्तानी एजंट असेल तो/ती मेली पाहिजे! :D आणि काही तरी होऊन भारतीय एजंट जिवंत राहिले पाहिजेत!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/24/2015 - 20:47 नवीन
:) रीमा आणि निकिता ही टोपणनावे असू शकतात आणि 'तो' चे तर अजून नावच माहीत झालेले नाही (असते तर तेही टोपण नाव असू शकले असते म्हणा) ! "सर्वतोपरी कर्तव्य" हे "Duty first" चे सुगम भाषांतर आहे. म्हणजे अजून भारत आणि पाकिस्तान या दोन बाजू नक्की कोणत्या हे (किंवा त्या बाजू भारत आणि पाकिस्तान आहेत हे पण) अजून कुठेच स्पष्ट झालेले नाही. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाहा!

पैसा
Mon, 08/24/2015 - 20:50 नवीन
ते लिहिता लिहिता लक्षात आलं म्हणून मी पाकिस्तान्याला मारा हे लिहून टाकलं. =)) आता लोक म्हणतायत तशी एक मस्त दीर्घकथाच लिहून पाकड्यांचा खात्मा करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सहमत पैसाताई. डाॅक येऊ दे एक

मांत्रिक
Mon, 08/24/2015 - 21:01 नवीन
सहमत पैसाताई. डाॅक येऊ दे एक भन्नाट सस्पेन्स थ्रिलर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झक्कास

एक एकटा एकटाच
Mon, 08/24/2015 - 22:25 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

कथेला +११

नाखु
Tue, 08/25/2015 - 10:51 नवीन
पण किमान शब्दात बोळवण करण्यापेक्षा एक दीर्घमाला लिहाच !!! अभामिपारुचेल्तेखाआणिपचेलतेआस्वादक्वाचक्पडीकमिपाकर संघातर्फे विनंती निवेदन.
  • Log in or register to post comments

+१

मृत्युन्जय
Tue, 08/25/2015 - 16:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

बहिरुपी
Tue, 08/25/2015 - 17:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

माधुरी विनायक
Wed, 08/26/2015 - 16:32 नवीन
बापरे... अगदीच अनपेक्षित... मस्त...
  • Log in or register to post comments

+1

जिन्गल बेल
Wed, 08/26/2015 - 16:40 नवीन
बापरे.....!!!!
  • Log in or register to post comments

वा

बाबा योगिराज
Wed, 08/26/2015 - 17:59 नवीन
१+ मस्तच.......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा