✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत

द
दमामि यांनी
Tue, 08/25/2015 - 20:16  ·  लेख
लेख
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहे. हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात. हे व्रत ब्रह्मर्षी विश्वामित्रांना मेनकेने सांगितले. कोकीळ व्रताची कहाणी: शंकराची बायको पार्वती. तिला नेहमी आपल्या नवऱ्याचा आणि गंगाबाईचा संशय येई. त्यामुळे ती शंकरावर कायम लक्ष ठेऊन असे. कध्धी म्हणून माहेरी जात नसे. शंकराने बघितले तर सर्व देवांच्या बायका वर्षातून एकदा तरी चांगल्या महिनाभर माहेरी मुक्कामाला जातात पण पार्वती चुकून सुद्धा माहेरचे नाव घेत नाही . शंकराला आपल्या अविवाहित मुक्त जीवनाची (बॅचलर लाइफ़) ची फारच सय येऊ लागली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रवेश करते झाले. शंकराच्या मुखकमलाकडे पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी शंकरास मदत करायचे ठरविले. नारदमुनी (कळलावे) तिथून कोकीळ पक्ष्याच्या रुपात थेट पार्वतीकडे आले व दक्षनगरीत चालू असलेल्या आभूषणे व वस्त्रे यांच्या अल्प किमतीतील विक्री आणि प्रदर्शनाचे आणि तिथे देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी यांनी केलेल्या खरेदीचे रसभरीत वर्णन गाऊ लागले. ते ऐकून दाक्षायणीला फारच चुटपूट लागून राहिली. (इतर स्त्रियांनी फायद्याची खरेदी केली आपल्याला मात्र संधी मिळाली नाही याचा स्त्रियांना फार राग येतो हो!). तिने शंकराच्या मागे भुणभुण चालू केली," मला माहेरची खूप आठवण येते. गेल्या अठरा वर्षात तुमची आबाळ होऊ नये म्हणून मी एकदाही तिथे गेले नाही, एकदा जाऊन यावेसे वाटते." शंकराने "तुझ्यामागे माझी काळजी कोण घेणार? जेवणाचे काय?" इत्यादी कारणे सांगत तिला अडवायचा लटका प्रयत्न केला. वस्त्रभूषणांच्या आनंदापुढे सर्व गोष्टी दुय्यम वाटल्याने "गंगाबाईला मी माझ्या हाताखाली साऱ्यांमध्ये निपुण केले आहे, माझ्यामागे ती तुमची व्यवस्था पाहील" असे सांगून पार्वती त्वरीत माहेरी जाण्यास निघाली आणि चांगली दोन मासांनंतर परत आली. शंकराने कैलास पर्वतावर स्वर्गीय सुख भोगले ते वेगळे सांगायला नकोच. त्यावेळपासून शंकर कोकीळ पक्ष्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि जो कोणी विवाहित पुरुष तुझे व्रत करेल त्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीस माहेरी पाठवेन असा वर दिला. व्रत: प्रथम कोकिळ पक्षी शोधायचा. तो मिळाला की मला व्यनि करायचा. मगच मी पूर्ण व्रताची कृती देईन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
21245 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

सा सं, मोबल्यावरून

दमामि
Tue, 08/25/2015 - 20:19 नवीन
सा सं, मोबल्यावरून टंकल्यामुळे परिच्छेद नीट करता आले नाहीत. मदत कराल का?
  • Log in or register to post comments

समजा

पगला गजोधर
Wed, 08/26/2015 - 10:11 नवीन
समजा दोन पत्नी असलेल्या पतीने दोन कोकिळांची व्रते करावी, की एकच कोकीळ दोन वेळा पुजावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अविवाहित आयडीला हे व्रत कसे

एस
Tue, 08/25/2015 - 20:24 नवीन
अविवाहित आयडीला हे व्रत कसे काय बरे माहिती? :-P
  • Log in or register to post comments

अविवाहित लोकांनी हे व्रत करू

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/25/2015 - 20:42 नवीन
अविवाहित लोकांनी हे व्रत करू नये... त्यामुळे ते कायम अविवाहित राहतात, असे नारदमुनींनी विशवामित्र मुनींना सांगताना कायप्पा मुनींनी ऐकले असे गुपचुपव्रतपुराणाच्या १४ व्या अध्यायात लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी काही काळ एका विदेशी काम

शेखरमोघे
Wed, 08/26/2015 - 23:57 नवीन
मी काही काळ एका विदेशी काम केले. तेथे अविवाहित लोकाना नेहेमी ऐकवली जाणारी स्थानिक भाषेतील एक म्हण - ज्याना "तसेच" रोज दूध मिळवता येते, त्याना गाय (अथवा शेळी) विकत घेऊन, घरी ठेवून, तिची देखभाल करण्याची उठाठेव करण्याची काही जरूर नसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अविवाहित???? कोण??? कधी???

दमामि
Wed, 08/26/2015 - 14:26 नवीन
अविवाहित???? कोण??? कधी????कसं????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कोकीळ कि कोकिळा हे कसं

सुबोध खरे
Tue, 08/25/2015 - 20:29 नवीन
कोकीळ कि कोकिळा हे कसं शोधायचं? म्हणजे कोकीळ शोधला आणी ती कोकिळा निघाली तर आमचा ढोल व्हायचा.
  • Log in or register to post comments

कोकीळ कि कोकिळा हे कसं शोधायचं?

मुक्त विहारि
Tue, 08/25/2015 - 20:46 नवीन
सो सिंपल यु नो..... कोकिळ अथवा कोकिळेवर एक दगड फेकायचा, दगड फेकताच... उडाला तर कोकिळ आणि उडाली तर कोकिळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अरे डांबरट पोरा हसून हसून

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 20:30 नवीन
अरे डांबरट पोरा हसून हसून मेलो की. कै पण करतोस तू लेका. तुम जियो हजारो साल.
  • Log in or register to post comments

इथे लोकं विडंबन केल्याबद्दल

दमामि
Wed, 08/26/2015 - 14:31 नवीन
इथे लोकं विडंबन केल्याबद्दल शिक्षा द्यायला बसलेत, तुम्ही हजार साल काय घेऊन बसले भौ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

धन्य ते हेमंत लाटकर अन धन्य

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 20:33 नवीन
धन्य ते हेमंत लाटकर अन धन्य तो दमामी!!!
  • Log in or register to post comments

हे व्रत कसे करावे हे आम्हा

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 20:37 नवीन
हे व्रत कसे करावे हे आम्हा निरोपावे द-मामिमु-निवर
  • Log in or register to post comments

=))

अजया
Tue, 08/25/2015 - 20:41 नवीन
अच्र्त ब्व्ल्त मेला दमामि!!
  • Log in or register to post comments

किती जणी मिळून चालवता ओ हा

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 20:44 नवीन
किती जणी मिळून चालवता ओ हा आयडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ओ मेरे प्यारे मन्नू,तेरे अकल

दमामि
Tue, 08/25/2015 - 21:00 नवीन
ओ मेरे प्यारे मन्नू,तेरे अकल की नय्या बीच भवर में बुडबुड गोते खाये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खिक्क्क

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 21:20 नवीन
खिक्क्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

धागा वाचला नाय पण

खटपट्या
Tue, 08/25/2015 - 20:44 नवीन
धागा वाचला नाय पण पुनरागमनाबद्दल हाभिणंदन
  • Log in or register to post comments

थँक्यु हो भौ!

दमामि
Wed, 08/26/2015 - 14:32 नवीन
थँक्यु हो भौ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

=))

जेपी
Tue, 08/25/2015 - 20:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments

__/\__

बहिरुपी
Tue, 08/25/2015 - 20:51 नवीन
__/\__ स्विकारा महाराजा!
  • Log in or register to post comments

व्रताचा विधि

पैसा
Tue, 08/25/2015 - 21:01 नवीन
व्रताचा विधी मला म्हैत आहे. ११ अनाहितांना सोन्याचे कोकिळ वाटा. नाही वाटलेत तर तुमच्या पत्नीला कोकिळा व्रताची महालक्ष्मी व्रताची आणि संतोषीमातेच्या व्रताची पुस्तके भेट म्हणून देण्यात येतील.
  • Log in or register to post comments

आता इकडे सोन्या कोकिळवाला

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 21:21 नवीन
आता इकडे सोन्या कोकिळवाला शोधणं आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपल्या सोन्याबापूंना इचारायचे

कहर
गुरुवार, 08/27/2015 - 10:43 नवीन
आपल्या सोन्याबापूंना इचारायचे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जबराट

थॉर माणूस
Tue, 08/25/2015 - 21:24 नवीन
आवडले हे व्रत. पण हे व्रत करताना प्रसादाची सोय कशी असावी? तसेच मित्र आप्तेष्टांना घरी बोलावल्यास "तिकडे" न कळण्यासाठी एखादा उपाय आहे काय?
  • Log in or register to post comments

सुडंबन आवडले.

रेवती
Tue, 08/25/2015 - 21:37 नवीन
सुडंबन आवडले.
  • Log in or register to post comments

एक नागपूरातला विवाहित मित्र

सूड
Tue, 08/25/2015 - 22:06 नवीन
एक नागपूरातला विवाहित मित्र हे व्रत करीत असे. त्यामानाने प.महाराष्ट्र आणि कोकणात या व्रताबद्दल अनभिज्ञता आढळते. अठरा वर्षांपूर्वी शेजारच्या काकांनी हे व्रत केले होते, व्रताचे नियम नीट्ट पाळले नाहीत म्हणून की काय देव जाणे काकांच्या साबा आणि साबु दुसरा आषाढ येईस्तवर त्यांच्या घरी मुक्कामाला होते.
  • Log in or register to post comments

हहपुवा!!!

अविनाश पांढरकर
Wed, 08/26/2015 - 00:35 नवीन
हहपुवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

त्यापेक्षा लग्नच केले नाहीतर,

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 23:25 नवीन
त्यापेक्षा लग्नच केले नाहीतर, बायको नाही म्हणजे कोकीळा व्रत नाही आणि आयुष्यभर स्वर्गीय सुख! कस काय दमामी खर आहे की नाही.
  • Log in or register to post comments

हे व्रत आवडलं. भारीय.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/26/2015 - 01:16 नवीन
हे व्रत आवडलं. भारीय.
  • Log in or register to post comments

=))

विकास
Wed, 08/26/2015 - 01:24 नवीन
=)) मस्तच! कोकीळ कसा दिसतो हे माहितीसाठी खाली चिकटवत आहे! Image removed. (चित्र विकीवरील असल्याने, अधिक माहिती हवी असल्यास माहितगारांना विचारावीत! ;) )
  • Log in or register to post comments

बाप्रे! काय तो भयप्रद लालबूंद

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 07:17 नवीन
बाप्रे! काय तो भयप्रद लालबूंद डोळा.. पांडु एखादी कथा पाडेल यावरुण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सगळे व्रत करुन त्याच्या

यशोधरा
Wed, 08/26/2015 - 09:44 नवीन
सगळे व्रत करुन त्याच्या नावाने कोकळतायेत म्हणून चिडल्या कोकिळ, त्यामुळे तो लालबुंद डोळा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहो कोकीळा माहेरी गेल्यानंतर मित्रांना रात्री ओली पार्टी

gogglya
Wed, 08/26/2015 - 11:33 नवीन
दिल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळ चा फोटो आहे. म्हणुन डोळे लाल आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दमामी बाकी विंडबन भारीये!

हेमंत लाटकर
Wed, 08/26/2015 - 10:25 नवीन
दमामी बाकी विंडबन भारीये!
  • Log in or register to post comments

दुसरी

नाखु
Wed, 08/26/2015 - 10:52 नवीन
दुसरी गोष्ट : हे व्रत करताना

"कावळे"*

दर्शन टाळावे. अन्य्था फल सांगतेवर परीणाम होतो. आता पहिली गोष्ट : व्रत कथा विस्तार चांगला आहे. चतुरमासानिमित्त आणखी व्रत-कहाण्या याव्यात ही अपेक्षा.

"कावळे"*

मध्ये डोम्/पर्/चोंबडे असे उप प्रकार आहेत याची नोंद घ्यावी. भावीक नाखु
  • Log in or register to post comments

हे व्रत करताना काही ड्रेसकोड

माहितगार
Wed, 08/26/2015 - 10:53 नवीन
हे व्रत करताना काही ड्रेसकोड असावा लागतो का ?
  • Log in or register to post comments

हहपुवा ... :-)

बबन ताम्बे
Wed, 08/26/2015 - 11:13 नवीन
सॉलीड विनोदी .
  • Log in or register to post comments

या

बॅटमॅन
Wed, 08/26/2015 - 11:22 नवीन
व्रतात सोमरसप्राशन किंवा पांढरे बटाटे अथवा गोश्तीची गोष्ट नसल्याने बहुधा फाऊल धरण्यात आला असावा.
  • Log in or register to post comments

देवा . अजिबात माफ करू नको

तुडतुडी
Wed, 08/26/2015 - 12:40 नवीन
देवा . अजिबात माफ करू नको अश्या अश्रद्ध, पापी लोकांना . विनोदाच्या नावाखाली काहीही बरळनार्यांना . अस्सल विनोद करायला जमत नाही म्हणून तुझ्या नावाने विनोद करून हीन थराला जातात
  • Log in or register to post comments

अयि तुडतुडे,

बॅटमॅन
Wed, 08/26/2015 - 13:33 नवीन
अयि तुडतुडे, एतादृशोऽभिमानस्तु वॄथा एव | किन्तु अरसिकेषु क्रूरजनेषु एतादृश: विनोदस्तु सदैव स्पृहणीयः अत एव अस्मान्सदैव रञ्जय इति मे विज्ञप्ति: | - भगवद्भक्तः वाल्गुदीश्वरः|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

अनुरोधं

पगला गजोधर
Wed, 08/26/2015 - 14:01 नवीन
भोः वाल्गुदनररत्न, तस्याः संस्कृत भाषाकौशलं सर्वत्र प्रसिद्धम्भ, यद्यपि भद्रं व प्रतिसाद मराठीभाष्ये लेखिष्यातु, इती अनुरोधं करिष्यामी ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नै चांगलंय..

अस्वस्थामा
Wed, 08/26/2015 - 15:29 नवीन
नै चांगलंय.. फक्त ते "करिष्यामी" चा "मी" पयला की दुसरा वो ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

बॅट्या आणि पग, मान गये उस्ताद

दमामि
Wed, 08/26/2015 - 18:46 नवीन
बॅट्या आणि पग, मान गये उस्ताद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

च्यामारी.

आनंदी गोपाळ
Wed, 08/26/2015 - 22:42 नवीन
सोन्स्क्रूत काहून लिवाया लाग्ले बा? आता जर मी हितं (समजा) मंडारिनात लिवाया लागलो, तर शिविगाळ करतोय की स्तुती, की नुसतीच प्लेन व्हॅनिला निर्भत्सना, हे तुडतुडीभाऊंना कसे कळावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

प्रॉब्लेम इतकाच आहे की

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 01:43 नवीन
प्रॉब्लेम इतकाच आहे की मँडारिन ही हिंदू धर्माची प्रमुख भाषा नव्हे. ते स्थान संस्कृतचे आहे. त्यामुळे मँडारिनात काही लिहिल्यास तो इफेक्ट येणार नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

संस्कृत मेड इन चायना????

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 02:11 नवीन
संस्कृत मेड इन चायना????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तसे नसावे...

विकास
गुरुवार, 08/27/2015 - 02:14 नवीन
संस्कृत मेड इन चायना???? तसे नसावे कारण Sanskrit is long lasting language ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हे वाल्गुदनरपुंगवः

पगला गजोधर
गुरुवार, 08/27/2015 - 09:33 नवीन
आमं, प्राचीन वैदिकहिंदूधर्म दर्पणः संस्कृतभाषायाम अस्ति खलु । किंन्तु मिपाः वैदिकहिंदूधर्मस्य मुखपत्र नस्ती, यत्र बहुधर्मीय बहुपंथीय जन मराठीसाहित्यवाचानार्थम आयान्तिच वर्तन्ति, अतः यत्र संस्कृतप्रतिसाद प्रकटीकर्तुं किंमं प्रयोजनम अस्ति ? मन्ये छद्ममनोरथः शंकयः !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 12:14 नवीन
नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः इति मे मति: - इतःपरम् भवान् यदि किञ्चित् निजमनसि धारयति तर्हि किं करवाणि? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

किं करवाणि?

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/27/2015 - 12:22 नवीन
किं करवाणि? वापरा गिर्वाणी, मग आमालाबी समजतील तुमची गाणी / गार्‍हाणी :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा