Skip to main content

बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?

लेखक हाडक्या यांनी गुरुवार, 13/08/2015 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला. असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्‍हेने रंगवत आहे ? देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ? यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ? याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ? या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.

वाचने 28237
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, जरा ग्राऊंडवर उतरूया काय? इथे दरदिवशी लाखो रुपये साधूंच्या खानपानावर सरकारतर्फे खर्च होत आहेत. धान्य, दूध, फळे प्रचंड प्रमाणात पुरवठा सुरू आहे. ६०० एकरच्या वर जमीन साधूग्रामासाठी भाड्याने घेतली आहे. याचे जमिन मालकांना सरकार भाडे भरत आहे, मोफत वीज, पाणी पुरवले जात आहे. आणि या सगळ्यात शहरवासीयांच्या उपयोगाचं काहीच नाहीये. उलट येणार्‍या गर्दीचा ताप आहे तो वेगळा. शहरवासीयांना रस्ते सोडले तर प्रत्यक्ष फायदयाचे काहीच नाही. वरून ह्या रस्त्यांची पुढील वर्षभर टीकतील याची काहीच हमी नाही. रस्त्यांचा खर्च एकूण खर्चाच्या काही टक्के आहे. बाकीचा खर्च फक्त कुंभमेळ्याच्या आयोजनावर आहे. आणि आयोजन म्हणजे फक्त पोलिसदल आणि बॅरीकेड्स नाही. नाशिक रेल्वेस्टेशनचा कायापालट केलाय. लाखो उतारुंना एकाच वेळी उतरता येईल इतके स्थानकात बदल केलेत. निवाराशेड्स, रूग्णवाहिका, फिरते दवाखाने, फिरते शौचालय, पाण्याच्या सुविधा, आपत्कालिन व्यवस्था, इत्यादी. शहरवासियांना एवढ्या बदलाची वा सोयींची काहीच आवश्यकता नाही. विशेष म्हणजे नेहमीचे प्रवाशी तर या काळात गरजेच्या सुविधांचाही वापर करू शकणार नाहीत. अधिक माहीती इथे: दुवा १, दुवा २ खर्चाचे आकडे: मंजूर आराखडा खास गाड्या सोडल्यात म्हणून प्रवाशांची संख्या वाढते की प्रवाशांची संख्या वाढते म्हणून त्यांच्या सोयीसाठी खास गाड्या सोडल्या जातात? यात सामान्य प्रवाशांचा कुठे विशेष फायदा आहे? विशेष फायदा हा फक्त यात्रेकरूंना आहे ज्यासाठी सरकार पैसा मोजते. या यात्रेकरूंपैकी विनातिकीटही भरपूर असतात. लोक तिकिटही काढतात पण त्यातून सरकारला नफा मिळत नाही. त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणे सोडा. सरकार सगळीकडे खर्च करते. त्याचे कारण यात्रेकरूंना फायदा व्हावा म्हणून. शहरवासीयांना फायदा करून द्यावा म्हणून कुंभ आयोजित होत नसतो. हज सबसिडी असावी नसावी यात मला पडायचे नाही. पण हिंदूंसाठी सरकार खर्च करत नाही हा समज योग्य नाही म्हणून प्रतिसाद प्रपंच.

In reply to by संदीप डांगे

कालच कुठेतरी वाचले की नाशिकचा कुंभमेळा फिफा वर्ल्डकपपेक्षा चांगला आयोजीत केला आहे. लींक मिळाली तर देतो.

In reply to by खटपट्या

ते तर आहेच. जगातल्या सगळ्या मी मी म्हणणार्‍या विकसित देशांसाठी कुंभआयोजन एक आश्चर्यजनक प्रकार आहे. अनेक देशांतून लोक/अधिकारी याचा अभ्यास करायला येतात. पर्वण्यांच्या एकूण काळात सुमारे १० कोटी लोकांचे दळणवळण, आरोग्य, निवास, अन्नपाणी इत्यादींची कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देता घडवून आणणे जगाने दखल घ्यावी अशीच बाब आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मुंबईची लोकसंख्या अदमासे दिड कोटी आहे. व भारताची सव्वाशे कोटी. त्या तुलनेत यंत्रणांवरचा दबाव व कौशल्याची मागणीही त्याप्रमाणात असते.

In reply to by संदीप डांगे

प्रतिसाद अतिशय आवडला. सोयी ह्या यात्रेकरूंसाठी असतात. आणि कित्येक सोयी ह्या तात्पुरत्या, यात्राकाळापुरत्या असतात. यात्रेच्या अतिशय गर्दीच्या काळात नेहमीचे प्रवासी शक्यतो तिथे जाणे टाळतात.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, कुंभमेळ्यातील यात्रेकरूंना सरकार फुकट खाणेपिणे, फुकट प्रवास करण्याची सोय पुरवित आहे का? आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी शेकडो जादा गाड्या सोडल्या जातात किंवा गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी जादाच्या अनेक गाड्या सोडतात. या गाड्यातून फुकट प्रवास करायला मिळतो का? जादा गाड्या सोडल्यामुळे एसटी महामंडळ व रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते ना? या जादा गाड्यांचा लाभ उत्सवासाठी न जाणार्‍यांना पण मिळतो ना? आता या सुविधांची तुलना हाज अनुदानाशी केली तर काय दिसते? हाजसाठी प्रतिमाणशी रोख फायदा आहे. त्यातून सरकारला कोणतेही अधिक उत्पन्न मिळत नसून निव्वळ तोटाच आहे. हाजसाठी न जाणार्‍यांना या सवलतीचा काहीही फायदा नाही. हिंदू-मुस्लिम तुलनाच करायची तर हिदूंच्या उत्सवाला दिलेल्या सोयीसुविधांंमुळे यात्रकरू व यात्रेकरू नसलेल्यांची सुद्धा सोय होते आणि सरकारला सुद्धा वाढीव उत्पन्न मिळते. याउलट मुस्लिमांच्या उत्सवासाठी दिलेल्या रोख सवलतीमुळे फक्त यात्रेकरूंचा फायदा होत असून सरकारचा तोटा होत आहे. आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपण घर नीट आवरून व्यवस्थित ठेवतो. आलेल्या पाहुण्यांना स्वच्छ, नीटनेटक्या घरात राहता येतेच. त्याचबरोबर घरात राहणार्‍यांनाही त्याचा फायदा होतो. >>> त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणे सोडा. सरकार सगळीकडे खर्च करते. त्याचे कारण यात्रेकरूंना फायदा व्हावा म्हणून. शहरवासीयांना फायदा करून द्यावा म्हणून कुंभ आयोजित होत नसतो. यात्रेकरूंसाठी निर्माण केलेल्या सुविधांचा फायदा यात्रेकरूंप्रमाणे स्थानिकांनाही होतो. >>> हज सबसिडी असावी नसावी यात मला पडायचे नाही. पण हिंदूंसाठी सरकार खर्च करत नाही हा समज योग्य नाही म्हणून प्रतिसाद प्रपंच. हा खर्च सरकार हिंदूंसाठी करते असे तुम्ही म्हणत आहात ते चुकीचे आहे. त्या खर्चाचा फायदा हिंदूंप्रमाणे अहिंदूंनाही होतो. याउलट हाज सबसिडीचे लाभार्थी फक्त मुस्लिम आहेत. अमुस्लिमांना त्याचा फायदा नाही. किंबहुना त्यांना अप्रत्यक्षरित्या तोटाच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

माझा मुद्दा तरी सरकार सर्व धर्माच्या सोहळ्यांसाठी करत असलेल्या खर्चाबद्दल आहे आणि राहीन. १० लाखाच्या वर येणारे साधू ज्यांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत ते यात्रेकरू नाहीत? त्यांच्यावर होणारा खर्च, खर्च नाही? त्यातून सरकारला काय उत्पन्न मिळते? त्याच्यातून अहिंदू लोकांना वा शहरवासियांना काय फायदा आहे? कुंभमेळ्याला येणारे सर्व यात्रेकरू हिंदूच आहेत. हा काही सर्वधर्मिय सोहळा नाही. की त्यामुळे फक्त सरकारतर्फे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायला अहिंदू आपले घरदार सोडून कुंभमेळ्याच्या गर्दीत सामील होतात. असा तुमचा समज असेल तर असो बापडा. सरकार करत असलेल्या खर्चाची यादी दिली आहे वरच. त्यात केवळ खाणेपिणे-प्रवास फुकट नाही म्हणून सरकारचे इतर सर्व खर्च, मेहनत, कौशल्य सपशेल नाकारण्याचा व डोळेझाक करण्याचा प्रयत्न का?. तुम्ही मांडलेल्या तर्कावरून असं दिसते की कुंभमेळ्यात केला जाणारा सरकारी खर्च हा 'सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून, शहरवासीयांना विशेष फायदे मिळावे म्हणून, हिंदूंसोबत अहिंदूंनाही लाभ घेता यावा म्हणून' होतो. किंवा असे होते म्हणून सरकारला यात खर्च करण्यात रस आहे अन्यथा नसता. राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्माच्या सर्व सोहळ्यांना सरकार या ना त्या प्रकारे भूर्दंड सोसून मदत करतेच. उदा. महाराष्ट्र विजमंडळाचे सर्वात कमी दर बीपीएल ग्राहक, कुक्कूटपालन व धार्मिक उत्सवनिमित्तच्या जोडण्या यांना आहेत. त्यात धार्मिक म्हणजे सर्वच धर्माचे. यात सरकारचा फायदा होत असेल तरच गुंतवणूक करावी असा कार्पोरेटी खाक्या नसतो तर नागरिकांच्या मदत व सोयीसाठी ह्या सुविधा असतात. हज सब्सिडी बंद करण्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. त्यावर सरकार अंमलबजावणी करेल. त्यामुळे तो मुद्दा आता कुठल्याही चर्चेत घेणे गैर वाटत आहे.

In reply to by संदीप डांगे

>>> १० लाखाच्या वर येणारे साधू ज्यांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत ते यात्रेकरू नाहीत? त्यांच्यावर होणारा खर्च, खर्च नाही? त्यातून सरकारला काय उत्पन्न मिळते? त्याच्यातून अहिंदू लोकांना वा शहरवासियांना काय फायदा आहे? यातून सरकारला भरपूर उत्पन्न मिळते. येणारे प्रवासी ज्या सार्वजनिक वाहनांचा वापर करतात (आगगाड्या, बसेस इ.) त्याच्या तिकिटविक्रीतून सरकारला उत्पन्न मिळते. कुंभमेळ्याच्या गावी असलेल्या स्थानिक व्यावसियाकांचा व्यवसाय वाढतो (उदा. लॉजेस, दुकाने, रस्त्यावरील विक्रेते, सलून्स इ.). कुंभमेळा बघण्यासाठी परदेशातील अनेक वाहिन्या येऊन चित्रीकरण करतात व त्यांच्याबरोबर काही परदेशी पर्यटकसुद्धा येतात. त्यांच्यामुळेही सरकारला उत्पन्न मिळते. यातून हिंदू आणि अहिंदूंचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या फायदा होतो. हाजला जाणार्‍यांमुळे सरकारला नुकसान सोसावे लागते हे लक्षात घ्या. >>> कुंभमेळ्याला येणारे सर्व यात्रेकरू हिंदूच आहेत. हा काही सर्वधर्मिय सोहळा नाही. की त्यामुळे फक्त सरकारतर्फे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायला अहिंदू आपले घरदार सोडून कुंभमेळ्याच्या गर्दीत सामील होतात. असा तुमचा समज असेल तर असो बापडा. अहिंदू हे यात्रेकरू म्हणून येतात असे मी म्हटलेच नाही. परंतु कुंभमेळ्यामुळे हिंदू आणि अहिंदू अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिकांचा त्या काळात व्यवसाय वाढतो. हाज यात्रा देशाबाहेर असल्याने सरकारला कोणत्याही प्रकारचा फायदा न होता सरकारचा तोटाच होतो. >>> सरकार करत असलेल्या खर्चाची यादी दिली आहे वरच. त्यात केवळ खाणेपिणे-प्रवास फुकट नाही म्हणून सरकारचे इतर सर्व खर्च, मेहनत, कौशल्य सपशेल नाकारण्याचा व डोळेझाक करण्याचा प्रयत्न का?. वर लिहिलेच आहे. सरकारने खर्च केला तरी सरकारला व स्थानिक जनतेला उत्पन्न मिळून त्याची परतफेड होते. >>> तुम्ही मांडलेल्या तर्कावरून असं दिसते की कुंभमेळ्यात केला जाणारा सरकारी खर्च हा 'सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून, शहरवासीयांना विशेष फायदे मिळावे म्हणून, हिंदूंसोबत अहिंदूंनाही लाभ घेता यावा म्हणून' होतो. किंवा असे होते म्हणून सरकारला यात खर्च करण्यात रस आहे अन्यथा नसता. तसे नाही. सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून सरकार सोयीसुविधा निर्माण करीत नाही. कुंभमेळा ही हजारो वर्षे चालत असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. हा मेळा व्यवस्थित पार पडावा यासाठी सरकार सुविधा निर्माण करते. त्यानिमित्ताने सर्वांचाच फायदा होतो. उदा. आपल्याला उत्पन्न मिळावे म्हणून सरकार पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त होणार्‍या यात्रेसाठी सुविधा निर्माण करीत नाही. धार्मिक परंपरा कमीतकमी त्रासात सुरू रहावी हा त्यामागे उद्देश असतो आणि त्यासाठी केला जाणारा खर्च हा एकतर्फी आणि अनाठायी नसतो. >>> राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्माच्या सर्व सोहळ्यांना सरकार या ना त्या प्रकारे भूर्दंड सोसून मदत करतेच. उदा. महाराष्ट्र विजमंडळाचे सर्वात कमी दर बीपीएल ग्राहक, कुक्कूटपालन व धार्मिक उत्सवनिमित्तच्या जोडण्या यांना आहेत. त्यात धार्मिक म्हणजे सर्वच धर्माचे. यात सरकारचा फायदा होत असेल तरच गुंतवणूक करावी असा कार्पोरेटी खाक्या नसतो तर नागरिकांच्या मदत व सोयीसाठी ह्या सुविधा असतात. या उत्सवासाठी सरकार करीत असलेल्या खर्चाचा ताळेबंद मांडल्यास त्यात सरकारला भुर्दंड पडला का व किती भुर्दंड पडला ते लक्षात येईल. परंतु वर लिहिल्याप्रमाणे सरकारने सोयीसुविधांसाठी खर्च केला तरी अनेक अप्रत्यक्ष मार्गाने सरकारला खर्च परत मिळतो. जनतेलाही त्याचा फायदा होतो. >>> हज सब्सिडी बंद करण्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. त्यावर सरकार अंमलबजावणी करेल. त्यामुळे तो मुद्दा आता कुठल्याही चर्चेत घेणे गैर वाटत आहे. हजसाठी दिले जाणारे थेट रोख अनुदान आणि कुंभमेळ्यासारख्या धार्मिक यात्रांच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या सोयीसुविधा यांना मूळ प्रतिसादात एकाच तागडीत तोलल्याने मी प्रतिवाद केला. हे तुमच्या लक्षात असेल की हाजसाठी अल्पदरात विमानप्रवासाची सुविधा दिल्याने सरकारला फक्त आणि फक्त तोटाच होता. हा खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने भरून निघत नाही. याउलट धार्मिक यात्रांच्या निमित्ताने रोख सवलत न देता सोयीसुविधा दिल्याने सरकारने केलेला खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने भरून निघू शकतो. एक साधे उदाहरण देतो. एखाद्या गावातील काही शेतकर्‍यांना थेट रोख रक्कमेची मदत दिली तर फक्त तेवढ्याच शेतकर्‍यांचा फायदा होईल आणि सरकारला त्यातून काहीही मिळणार नाही. याउलट सरकारने जर अखंडित वीजपुरवठा, पाणीपुरवठा इ. सोय केली तर त्या भागातील सर्व शेतकरी व शेतकरी नसलेल्यांना सुद्धा फायदा होईल. त्यातून नवीन व्यवसाय निर्माण होऊ शकतील, शेती उत्पन्न वाढू शकेल आणि सरकारला करांच्या रूपाने उत्पन्न मिळून केलेला खर्च भरून येऊ शकेल. हाजला देण्यात येणारी रोख सवलत आणि धार्मिक यात्रांना पुरविण्यात येणार्‍या सुविधा यात हाच नेमका फरक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हाज सबसिडीचे लाभार्थी फक्त मुस्लिम आहेत.
एकतर हे सब्सीडी प्रकरण खरच किती लाभदायक आहे हेच संदीग्ध आहे. आणि जरी त्याचा लाभार्थी केवळ मुस्लीम समुदाय असेल तरी त्यात प्रॉब्लेम काय आहे ? हज यात्रा करुन काहि लोकांना जर जीवन कृतार्थ झाल्याचं वाटत असेल, त्यातुन कोणाचं नुकसान होत नसेल, आणि कोणाच्या तोंडाचा घास हिरावुन हि सब्सीडी दिली जात नसेल तर आनंदाने यात्रांना सब्सीडी द्यावी.

In reply to by अर्धवटराव

>>> एकतर हे सब्सीडी प्रकरण खरच किती लाभदायक आहे हेच संदीग्ध आहे. आणि जरी त्याचा लाभार्थी केवळ मुस्लीम समुदाय असेल तरी त्यात प्रॉब्लेम काय आहे ? हज यात्रा करुन काहि लोकांना जर जीवन कृतार्थ झाल्याचं वाटत असेल, त्यातुन कोणाचं नुकसान होत नसेल, आणि कोणाच्या तोंडाचा घास हिरावुन हि सब्सीडी दिली जात नसेल तर आनंदाने यात्रांना सब्सीडी द्यावी. सरकार हे सर्वधर्मियांचे आहे. त्यामुळे फक्त एकाच विशिष्ट धर्माला लाभार्थी करणे हे योग्य नाही. सरकारने इतर सर्वधर्मियांना अशी रोख सवलत दिल्यास हाजबद्दल आक्षेप येणार नाहीत (उदा. सरकार ख्रिश्चनांना व्हॅटिकनला विमानाने केवळ १२००० रूपयात जाऊन देईल का?). हाज सवलतीमुळे सर्वांचेच अप्रत्यक्ष नुकसान होते कारण सरकार जी सवलत देते ते उत्पन्न जनतेचे दिलेल्या करांच्या पैशातून आलेले असते. म्हणूनच त्याबद्दल आक्षेप आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

दुसर्‍यांचा हक्क डालवुन असं होत असेल तर ते अयोग्यच आहे. पण हजयात्रा जर मुस्लीमांचा परमोच्च आस्थेचा विषय असेल, व त्यासाठी आर्थीक अनुदान देणं एव्हढी एकच मदत जर सरकार करु शकत असेल तर तसं करायला काहि हरकत नसावी.
उदा. सरकार ख्रिश्चनांना व्हॅटिकनला विमानाने केवळ १२००० रूपयात जाऊन देईल का?
घरात फक्त आजीबाई उपास करते म्हणुन तिच्याकरता साबुदाणा खिचडी बनते. इतरांनी पण उपास केला तर त्यांनाही मिळेल. शक्य तेव्हढं आस्थेने केलं तर बिघडलं कुठे ? जनतेने दिलेल्या करांच्या पैशातुन सरकार मदत करते हे खरं आहे. पण त्याच कर भरणार्‍या जनतेत मुस्लीम टक्का देखील आहे. आणि या खर्चाचं फार काहि ओझं होत असेल असं वाटत नाहि. जनतेच्या मनःशांती करता अल्प किंमत मोजायला काहि प्रॉब्लेम नसावा.

In reply to by अर्धवटराव

vatican ला 12000 मध्ये? यात इटली वगैरे पैकेज देत असले तर हम रेडी हूँ. एकदा कन्वर्ट व्हा आणि पुन्हा reconvert व्हा. हाय काय नि नाय काय! मोरोक्को मध्ये फ्लेश बिज़नेस जोरात असतो. आणि विशिष्ट धर्मीय लोकांना तर हे हराम आहे. करायचं काय मग? प्रश्न आला की उत्तर तयार होतं. चार लग्न करायला काही अडचण नाही. मग एक लग्न करा, कार्यक्रम करा, दुसऱ्या दिवशी तलाक तलाक तलाक. दुसऱ्या दिवशी दुसरं करा, कार्यक्रम करा पुन्हा तलाक. have fun हबीबी!

In reply to by श्रीगुरुजी

भारतातील हजची 'मदत ' ही ' मदत ' नाही. लोकशाही असल्याने सर्कारी पैशावर जनतेचा हक्क अहेच. ... हिंदूनी नर्मदा परिक्रमा करावी. भरपूर पुण्य मिळते म्हणे. ....

In reply to by dadadarekar

कोणतीही यात्रा हा एक पर्यटनाचा प्रकार आहे ज्यामुळे स्थानीक लोकांना उत्पन्न मिळते. कुंभ मेळा आयोजित केला कि स्थानिक रिक्षावाले, दुकानदार, हॉटेल मालक, कलाकार फुलवाले नारळवाले इ यांना उत्पन्न मिळते. हाज ला जाणार्या लोकांचा हा पैसा सौदी अरेबिया ला मिळतो भारतातील लोकांना त्याचा दोन दमड्यान्चाही फायदा होत नाही. हज ला सबसिडी देण्यापेक्षा( जी केवळ मुस्लिम मतांसाठी दिली गेली होती/ आहे) तोच पैसा अजमेरच्या उरुसावर किंवा फतेहपुर सिक्री वर खर्च केला तरी चालेल निदान स्थानिक लोकांना ( वर म्हटल्याप्रमाणे यात हिंदू मुसलमान सर्वच आले) म्हणजे पर्यायाने भारतालाच फायदा होईल.त्यातून ज्याला हज ला जायचेच आहे त्याने स्वतःच्या पैश्याने जावे म्हणजे पुण्यही मिळेल. मनाला आल्हाददायक का काय तेही वाटेल

In reply to by सुबोध खरे

धार्मिक यात्रा ही स्वतःच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी करायची असते. त्यातून पैसा कुणाला मिळतो वगैरे बघायची गरज नसते. माझा पैसा , परदेशातील लोक हा आप पर भाव असेल तर तुम्ही खुशाल नर्मदायात्रा करावी. हजला जाताना हा आपपरभव सोडायचा असल्याने मुसलमान खुशाल हजला जातील मg ते कोणत्ञा का देशात असेना ! तुम्ही भारतीय दमड्या व त्यांचे भारतातील वाटप या सगळ्याच्या चिंतनात रमून जावे व त्यानुसार यात्रा कराव्यात.

In reply to by dadadarekar

आम्ही अध्यात्मात नाही तेंव्हा आम्ही आमच्या पैश्याची चिंता करतो. तुम्हाला हज ला जायचा तर जा की. आणी जाताना असा आप पार भाव सोडून तुमच्या भारतीय दमड्या आम्हाला देऊन गेलात तर तुमची अधिक अध्यात्मिक उन्नती होईल आणी आमच्या मनालाही आल्हाददायक वाटेल. हा प्रतिसाद मात्र हलके न घेता सिरीयसली घ्या अशी नम्र विनंती.

In reply to by पैसा

=))

In reply to by सुबोध खरे

अचुक हाणलय डॉक =)) @दरेकर "तिर्थक्षेत्री" जौन तिकडेच कायमचं रहाणार्‍यांना जास्तं पुण्य मिळतं म्हणे. पुण्यवान व्हा आणि मोठेही व्हा. तेवढे पैसे दानाचे पुण्य मिळवायचं बघा.

In reply to by dadadarekar

बाय द वे, हजची यात्रा स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून करावी असा नियम आहे असे ऐकतो... त्याचे काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तूर्तास स्वकष्टाची कमाई या शब्द्याची व्याखा+अर्थ लवचिक+सोयीस्कर केला आहे. अभामिपाधुराळीधागेनियमीत्वचक्चावक्स्वादक संघ

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तीच तर गंमत आहे. म्हणूनच सरकार एअर इंडीयाला सबसिडी देतं. मग एअर इंडीया यात्रेसाठी खास सवलत असल्याचं जाहिर करतं. आणि यात्रेकरी "आपल्या" कमाईचा पैसा खर्च करून यात्रेला जातात. सगळं कसं नियमात. ;)

In reply to by श्रीगुरुजी

या तुलनेत जर हाज सवलत पाहिली तर हाज यात्रेकरूंना अल्प दरात विमान तिकीट दिले जाते (प्रतिमाणशी रू. १२ हजार). (वेळेत बुक केल्यास) मुंबैइ - जेद्दाह या मार्गावर एरवी तिकिटाचा दर २०० डॉलरच्य आसपास अहे म्हणजे साधारण १३००० रुपये. रिटर्न तिकिट साधारण साव्वातीनशे डॉलर म्हणजे २१००० रुपयात मिळते. हे बघता फार काही सवलत मिळते असे दिसत नाही. शिवाय त्यात एयर इंडियानेच प्रवस करावा अशी अट असेल तर ते एयर इंडिया साठी आणि पर्यायाने सरकारसाठी बरेच आहे की. एरवी एयर इंडियाने जायला लोक कुठे उत्सुक असतात? पुणे-दिल्ली या प्रवासाचेच परतीचे तिकिट कमीतकमी १६ हजार रूपयांना आहे. परवाच दुबईहुन परत आलो. तिकिट ७००० रुपयात मिळाले. काही दिवसांपुर्वी मुंबई चेन्नई प्रवास देखील केला. तिकीट २२००० रुपते होते. सांगण्याचा उद्देश हा की देशांतर्गेत तिकीट दर काही अनाकलनीय कारणांमुळे खुप जास्त आहेतचे त्यामुळे ही तुलना होउ शकत नाही. मुंबई चेन्नई या प्रवासासाठी (रिटर्न नाही) जिथे २२००० रुपये तिकीट होते (ऐनवेळेस बुक केलेले) त्यापेक्षा कमी खर्चात (रु १७५००) नोव्हेंबर महिन्यात बेंगलोर सिंगापूर चे रिटर्न तिकीट मिळते आहे.

पर्शिया , इराण , इराक मुळचे पारशांचे देश . अत्यंत क्रूर पद्धतीनं ते त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले . जे पारशी हिंदुस्थानात आश्रयाला आले त्यांनी त्यावेळी दिलेला शब्द ते आजही पळत आहेत . तेव्हा ते परदेशी असले तरी आम्ही त्यांना तसं मनात नै

In reply to by तुडतुडी

उत्तर ध्रुवावरुन आलेले म्हणजे हिंदू. पर्शियातून आलेले म्हणजे मुसलमान. हिंदू लोक मुस्लिमाना परकीय म्हणतात. पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत ना ?

In reply to by dadadarekar

@पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत ना ?>> होय ना.. म्हणूनच तर ते या देशासाठी "जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है।" अशी गीत रचत राहिले.. रहातील.. आणि देशासाठी लढले लढतील... तेच पारश्यांचेही. पण तुझी बाकिची बाहेरनं आलेली प्रजा आनि त्यांचे इथेच जन्मुन तरिही स्वतःला इथे बांधील न करुन घेणारे टनाटनी इस्लामी / ख्रिश्चन लोक काय करतात या देशासाठी? सांग बरं?

पुरे आता हे सगळं! सगळ्यांच्या भावना पोहचलेल्या आहेत.तरी नारळ-सुपारी घ्या आणि इतर धाग्यांवर जा.

श्रीगुरूजी, आपण निश्चित कुंभमेळ्यात जाऊन आले आहत न किमान एकदा? कारण माफ़ करा पण आपल्या प्रतिसादावरुन आपण फ़क्त रेटून कुठलेतरी कागदी गणित दिल्या सारखे बोलताय, तरीही जर आपण ते सत्य मानत असालच तर असो!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीमास्तुरे हे साक्षात्कारी महापुरुष आहेत. ते प्रत्यक्ष काहीही न बघता व न वाचताही त्या विषयावर सखोल लिहू शकतात.

In reply to by dadadarekar

कुंभमेळ्यातून अनेकाना रोजगार मिळतो म्हणून त्यावरचा खर्च जस्टिफाइड आहे , हे तर अजबच लॉजिक आहे. आता या लॉजिकात या प्रकारात इनपुट किती व आउअटपुट किती हे विचारायचे नाही बरे का ! आपल्याला हवे ते लॉजिक रेटुन लावण्यात हे लोक पटाइत असतात. अमित शहाच्या कुंभमेळ्याच्या खास स्नानाला धरणातून लाखो लिटर पाणीसोडले गेले. पण ही उधळपट्टी नाही बरं का ! पाणी सोडले की त्याचीच वाफ होऊन पुन्हा गोरगरिबांच्या शेतावर पाउस प्डावा या उदात्त हेतूने ते पाणी सोडले होते, असे दिव्य लॉजिक ही मंडळी लावतीलच.

In reply to by dadadarekar

आपले प्रतिसाद फार मोठे स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अभ्यासपूर्ण अहवालांवर आधारित असतात बरे?

अभिनंदन. हा १०१वा प्रतिसाद. पण शंभरी गाठण्यात आमचाही हातभार आहे बरं का हाडक्याशेठ.

शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना भग्वदगीतेची हार्डबाईंड कॉपी (रंगीत छायाचित्रांसहित), कर्मण्येवाधिकारस्ते वाले कृष्णार्जुनाचे वॉलसाईज पोस्टर आणि कृष्णमुमुक्षुचा एक अंक देउन सत्कार करणेत येत आहे. सुंतकरावांना बर्फाची पिशवी, हितेशोपनिषेध आणि कै.नेफळेचरित्र देउन श्रद्धांजली देण्यात येत आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूचना: एक्दा दिलेला माल बदलून मिळणार नाही, सबब इथेच तपासून घेणे. तोडफोड/ दर्जाबाब्त अजीबात हमी नाही. बर्फाची पिशवी गळकी आहे का नाही ह्याबाब्त प्रमाणपत्र दिले जाणार नाही. चरित्राची एकच प्रत शिल्लक आहे जास्तीची मागू नये (झेरॉक्स वर काम भागवावे) हितेशोपनिषेध चे पारायण वर्षातूब दोनदा करणे अनिवार्य ( बैलपोळा आणि शिमगा).
चिट(क्)वणीस सत्कार समीती

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आमी बी सत्कार समितीचे मेंब्र हावो ना चिमणराव. मंग असा आपल्यातच नसतोय वाटायचा पुर्स्कार ! बाकी ते बीबीसी आणि सगळ्या मिडियाला लोक्स विसरले इथंवर येईपर्यंत.. इ-मेलला काय त्यांनीतरी रिप्लाय दिल्ला नै. आणि पब्लिक आपसातच भांडत बसतंय हे त्यांना चांगलंच म्हैतेय हा.. दादा दरेकर भौ अथवा इतर कोणीही आहेत का की त्यांना असं वाटतंय की जे त्या बीबीसीच्या लेखातल्या बाबी सत्य आहेत अथवा किमान दिशाभूल करणार्‍या नाहीत ? एक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र अस्ले काही छापत असेल तर सर्वांनीच निषेध करणं आपलं प्रथम कर्तव्य नाही का ? कारण तशी परिस्थिती असती तर तुम्ही इथे ज्या पद्धतीने लिहिताय त्यानंतर तुम्हाला तुमच्यावर हल्ल्याची भिती वाटली असती. नव्हे असे हल्ले होताना दिसले असते. याऊलट तुम्ही तर तिसर्‍या मुंबईत घर घेताय, आपले उद्योग करताय, गीता आणि इतर धर्मातल्या गोष्टी अभ्यासताय (असा तुमचा दावा), त्यावर टिकाही करताय, इथे दंगा ही करताय त्याचबरोबर वरुन तुमचा फोटो ही टाकताय. म्हणजे परिस्थिती इतकी वाईट नाही हे तुम्हाला दिसंतय तरीही तुम्ही त्या लेखाबद्दल एक अवाक्षर ही काढायला तयार नाही आहात ? हा तुमचा अथवा तुमच्यासारख्या विचारांच्या लोकांचा दांभिकपणाच नव्हे काय ? मी कोणाचाही समर्थक अथवा द्वेषी नाही परंतु असली स्वार्थी आणि स्वकेंद्रीत दांभिकता चीड आणते हे मात्र खरं.

In reply to by हाडक्या

गावात हगवणीची साथ आली याचा अर्थ प्रत्येक नागरिक हगवणीने त्रस्त असतो असा नसतो ना ? दादा दरेकर सुखात रहातो याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो , त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?

In reply to by dadadarekar

गावात हगवणीची साथ आली याचा अर्थ प्रत्येक नागरिक हगवणीने त्रस्त असतो असा नसतो ना ?
तुमचा वास सोडलाच का हो. (ह.घ्या.) बादवे, उदाहरण गंडलंय असे नमूद करतो. जे मुद्दे आहेत त्याच्याशी विसंगत आणि कोणत्याही प्रकारे लागू न होणारी उपमा वापरली आहे.
दादा दरेकर सुखात रहातो याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो , त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?
याचा अर्थ भारतात तुम्हाला कसलीही भिती न बाळगता आंजावर वावरता येतेय आणि स्वतःची प्रगती साधता येतेय हे तुम्हाला मान्य आहे. सध्या तेवढे तरी पुरेसे आहेच सुरुवात करायला.
याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो, त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?
अर्थ तुम्ही घ्याल तसा आहे. म्हणजे असं की एक सामान्य अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती (तुम्ही सामान्य नागरीक आहात हे गृहीत आहे. जर एखाद्या गँगशी संबंधित असाल, खरंच दादा वगैरे असाल, कोणी मोठे नेते असाल, मंत्री असाल तर अलाहिदा. ) जर आरामात आंजावर बहुसंख्य धर्माच्या लोकांना शिव्या घालू शकते, स्वतःची प्रगती साधण्याचे मार्ग इतर सामान्य नागरीकांप्रमाणेच चोखाळू शकते तर मग असे म्हणता येईल ना की अल्पसंख्यांक समाजातल्या बहुसंख्य लोकांना त्या संधी उपलब्ध आहेत (तुमच्यासारख्या आणि तुमच्या वरच्या सामाजिक स्तरातल्या). हे तुम्ही मान्य केलेल्या फॅ़क्ट्सवर असल्याने तूर्तास इतकी मान्यता गृहित धरू. विषमता : आता ही कोणाला फेस करायला लागत नाही हो ? तुम्ही तुमच्या कोषातून, गल्लीतून, मोहल्ल्यातून बाहेर पडला की सर्वांनाच वेगवेगळी विषमता फेस करावी लागते. अगदी मी डावखुरा आहे म्हणून मला खूप सार्‍या विषमतेस तोंड द्यावे लागले. उ.दा. गिटार क्लासवाल्याने न घेणे, शाळेच्या हॉकी टीममध्ये संधी न मिळणे, कात्रीने नीट कापू शकत नाही म्हणून शाळेतल्या बाईंचा ओरडा खाणे, देवळात प्रसाद न मिळणे (कारण मी उजव्या हातात घ्यायला नकार दिला होता) अशा क्षुल्लक कारणापासून ते इतर मोठ्या अशा भेदभावास सामोरे जावे लागलेय. देशात ज्या त्या ठिकाणच्या तर विदेशात तिथल्या तिथल्या विषमता पाहिल्यात. मुद्दा असा आहे की नेहमी व्हिक्टीम म्हणवून घेऊन भारतात तरी सदैव सहानुभुती मागत बसणं मला तरी अस्थायी वाटतं. आणि ते ही एक परदेशी वृत्तपत्र तसं म्हणत असताना निषेधदेखील करावासा न वाटण देखील गैर आहे असं माझं मत आहे. बाकी तुमच्याकडून किमान संयत विचाराची अपेक्षा करतोय. असो.

In reply to by हाडक्या

डायरिया गॅस्ट्रोएंटेरायटिस ऐवजी हगवण टाइपायला सोपे म्हणुन वापरले... तुम्हाला बीबीसीचा निषेध करायला कुणी अडवले आहे का ? मग तुम्ही बिनधास्त निशीध करा. पण तुमच्या मागोमाग आम्हीही आलेच पाहिजे हा तुमचा अट्टाहास आम्हावर लादु नका.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

त्यात काय? ये मिपा है मेरे भाई.... एक कृष्णविवर ते दुसरं कृष्णविवर व्हाया दोन आकाशगंगा प्रवास होऊ शकतो एका धाग्यात. टेंशन नै लेने का!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ही गाडी पेशल हाय. जेला पायजे तशी लई ठेसनं घेत (व्हाया) येडीवाकडी जातीय बगा ! =))

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

याच धाग्यावर भारत-पाकीस्तान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हमेरीका-भारत, मराठी-परप्रांतीय, आयटी-नॉनाअयटी हे विषयही चर्चीले जातील. खात्री बाळगा.

In reply to by खटपट्या

आयटी वाल्यांच्या तुलनेत नॉन आयटीवाल्यांना मिपावर येण्यासाठी जास्त पयशे खर्च करावे लागतात त्यामुळे नॉन आयटीवाल्यांना नेटपॅक साठी सबसिडी द्यावी.

In reply to by खटपट्या

जुनं लोन बुडवल्याचा पुराव द्या मग आणि मगच नवीन लोन देवून ते माफ करण्याचा विचार केला जाईल. माझेतेमाझेतुझेतेहीमाझेस्वाहाकारीपतसंस्था. टगेवाडी-आदर्शपूर शाखा

जर भारतात कुठल्याही कारणासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमा होत असतील तर त्यासाठी सुविधा देणे हे भारत सरकार आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रोज मुंबैबाहेरून लाखो लोक येतात. तरीही मुंबईचे प्रशासन त्यांच्यासाठी सुविधा देते. त्याचप्रमाणे जर भारतात कोठे राष्ट्रीय किंवा आंतर राष्ट्रीय स्पर्धा असतील तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुविधा दिल्या जातात. तसेच जर हिंदू उत्सव किंवा मुसलमानांच्या कुठल्या पिराचा उरूस भारतातील कुठल्या ठिकाणी असेल तर त्यासाठी एक host म्हणून सुविधा दिल्या जाव्यात. ह्या सुविधा म्हणजे infrastructure प्रकारच्या असणे अपेक्षित आहे. हिंदू अथवा मुस्लिमांच्या उत्सवांसाठी सरकारने फुकट जेवण देणे अपेक्षित नाही. हज यात्रेसाठी भारत हा host नसल्यामुळे अशा सुविधा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु जर बरेच मुस्लिम एखाद्या विमानतळावरून किंवा बंदरावरून मक्केला जात असतील तर त्यांना विमान किंवा बोट पकडण्यासाठी infrastructure देणे ठीक आहे. विमान भाड्यात सवलत देणे अप्रस्तुत आहे.

'नॉट विदाउट माय डॉटर' वाचतेय सध्या . गेल्या महिन्यात कारमेन बिन लादेन चं the veiled kingdon (बुर्ख्यामागचे साम्राज्य) वाचलं. शिसारी आली वाचताना . याबद्दल BBC, dadadarekar आणि तत्सम लोकांचं काय म्हणणं आहे ?

हजला जाताना हा आपपरभव सोडायचा असल्याने
हसून हसून डोळयात पाणी आलं . मक्का , मदिनेच्या वेशीवरच ते लोक कर्ने घेवून जोरजोरात ओरडत असतात . गैर मुस्लिमांनी माघारी फिरावं म्हणून . मुस्लिम सोडून इतर कोणालाही मक्का , मदिनेत प्रवेश नाही . भारतीय सरकारचा काय संबंध ह्या सगळ्याशी ? आम्हाला आपपरभव सोडायला शिकवणारे स्वतः काय करतात ?

हे dadadaekar आणि यांचे असेच काही आयडीज यांचा कर्ता करविता Multiple personality syndrome चे शिकार आहेत का याची एकदा शहानिशा झाली पाहिजे

dadadarekar असं कोण म्हणे हो ? आणि तसं झालं जरी असेल तरी आम्ही एक बोलावं आणि दुसरंच करावं असं नै कै करत. राहुल गांधीने एका भवानी मंदिराला भेट दिली गेल्या आठवड्यात . तो फोटो बघा जरा . शनिवारी मी मारुतीच्या मंदिरात गेले होते . तिथे १ बुरखाधारी स्त्री रुइचि माळ , तेल वगेरे घेवून पूजा करायला आली होती . मी तिथल्या कर्मचार्यांशी बोलले . (तिथली व्यवस्था बघणाऱ्या लोकांशी ). मग त्यांनी तिला तंबी दिली . बुरखा घालून मंदिरात यायचं नाही म्हणून. आणि आता तुमचं बरळणही बास करा . स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून . हि वृत्ती बदला जरा

आणि आता तुमचं बरळणही बास करा . स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून . हि वृत्ती बदला जरा एक सांगा लुंगीत असं काय झाकुन ठेवतील ? तुमी पण णां ?