( दीडशे रे.....)
दीडशे रे..........
एक शाळा होती सुंदर
तीत मुले होती शंभर
मग आणखी आले पन्नास
किती किती झाले रे?
दीडशे रे
दीडशेला भागू मी की, दीडशेने गुणू मी
भागू गुणू, भागू की गुणू
गुणू भागू, गुणू की भागू
दीडशे रे
तो सट्टे कसकसले लावे अन् हरतो हो
लावे अन् हरतो हो
मग किती सेशन गेले, अन् पैसे पण गेले रे
पण आशेवर लढला, अन् खेळतच राही रे
तो डाव खेळ-खेळला, हरला हरला आणि हरला
बिल थकले उधार झाली, उधारीत हाय ती खाल्ली
जहरासाठी पैसे नव्हते रे
दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे
दीडशे रे
बांधून ये रिक्षाला
काटेरी तारांना
पंचर कर रिक्षाची चाके रे
छोले तर ती खाते ना
आणि कुलचे पण खाते ती
आणि चावून ती अनरसे
सांबार पण गिळते ती
पोटात गुळबुळबुळते, धावून जाते गडबडते
पण बिल ते बस्स फडफडते, रिक्षाचे काय जळते
येतात जातात रुपये रे
दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे
दीडशे रे
-- स्वामी संकेतानंद
(डिस्क्लेमरः पहिले शाळाविषयक कडवे("किती किती झाले रे" वाले) माझे नाही. ते आमच्या भागात, गाणे आले तेव्हापासून, हिट आहे. कोणत्या पोराने ते बनवले होते ह्याची कल्पना नाही. उर्वरित बांधकाम माझे आहे.)
छान
खीक्क्क्!
असेच म्हणतो.
गात गातच लिहीलं आहे न देवा!!
पोस्टमध्ये एक उल्लेख राहून
खल्लास.
ळॉळ!
म्हणून दिल्लीवाली गर्लफ्रेंड
अरे काय? खत्तरनाक... चालीत
स्वामिज्जी की म'हान रचनांएं..
किंचीत दुरुस्ती
वा वा वा
हाहा..
जबरदस्त!!
एकदम दिलसे रे...
वा स्वामीजी वा!