[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल (उत्तरार्ध)
निकाल - १
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.------------------------------------------------------------------------------------------------------------------ शेवटची सही करताना बघता बघता मन भूतकाळात गेले. सासरच्या त्रासाला कंटाळून परत आल्यावर मामांनी केलेले भांडण, समाजातली खोटीनाटी बदनामी, एकटी बघून लोकांनी घेतलेला गैरफायदा, कधीतरी सोबतच्या श्रीमंत मैत्रिणींचा वाटलेला हेवा, पण नशीबाने लाभलेले कायम पाठबळ देणारे मार्गदर्शक, कापड दुकानात काम करत संस्थेच्या वसतीगृहात राहून कष्टाने पूर्ण केलेले शिक्षण, काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस… आणि आज समोर होती सुनीता, डोळ्यात तीच चमक, अंगावर माराच्या त्याच खुणा. हुंड्यासाठी हिला जाळायला निघाले होते. पण पठ्ठीने पुराव्यानिशी खेचून आणले कोर्टात. इतक्या वर्षात काय बदलले असा प्रश्न पडतो कधीतरी, पण हेच बदलण्यात माझा खारीचा वाटा. आज न्यायाधीश म्हणून निकाल दिलेली ही पहिली केस. ------------------------------------------------------------------------------------------------------------------ स्पर्धा आयोजक आणि पहिल्या कथेला प्रतिसाद देणार्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!!
वाचने
14311
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
+१ छान!
+१
+१
+१ कथेचा दुसरा भागही आवडला.
+१
In reply to +१ by चिगो
अर्र करेक्ट.कोट हवं होतं. पण
In reply to अर्र करेक्ट.कोट हवं होतं. पण by मधुरा देशपांडे
मला वाटतं की कोर्ट चं कोट
+१
+१
+१
+१
+१. उत्तरार्ध आवडलाच!
+१ जियो!
+१
अरे मस्तच!
In reply to अरे मस्तच! by बोका-ए-आझम
+१
वर्तुळ पूर्ण केलंत.हे विशेष आवडलं.In reply to +१ by बहुगुणी
+११
+१
+1 आवडली कथा.
+१ छान आहे
+१
+१ आवडली
जबरदस्त
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१सुंदर . समाजाची घाणेरडी
+१
In reply to +१ by समीरसूर
+१
अतिशय सुंदर
+1
+१
+१.. .खुप मस्त कथा
+१ आवडली !
+१ , खुप छान
+१ खूप्च आवडली ही कथा मधुरा
+१
+१
+१ प्रचंड आवडली आहे ही कथा!
+१ मस्त लिहिलाय हा कथा भाग.
छान झालाय दुसरा भाग सुद्धा.
+१ मस्त.
+१
+१