अप्रतिम!
थोडीशी प्रभा गणोरकर यांच्या "आलीस बाई, ये" या कवितेची आठवण झाली.
माणसाला माणूस दिसत नाही
अशी गडद संध्याकाळ
जवळपास रात्रच
पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली
पायाखालची वाट दिसत जाते
रस्त्यावर दिवे नसतानाही
पायांना सापडत जाते
जुन्या घराचे सारवलेले अंगण
वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या
दरवाजाचा काळा मखमली स्पर्श
वेचीत माझे हात दार ढकलतात
साखळी वाजते
आतून हळू आवाज येतो
आलीस बाई, ये.
तुमच्या आवडलेल्या कवितेत केवळ किंचित लयीसाठी थोडासा शब्द-बदल करावासा वाटला, औद्धत्याबद्दल क्षमस्व!
थकल्या दो चरणांच्या पाशी
माथा हलके झुकला
'सुखी रहा' या शब्दांपाशी
निरोप साधा अडला!
जन्मांतरीच्या अनुबंधांची
अशीच असते रेषा
परतो, अथवा दिगंत जावो
अखंड असते आशा
गमे परंतु सोपे नव्हते
वृद्ध अनोळखी धागे
जुनी-पुराणे वृक्ष आजही
मूळांपासुनी जागे!
सुरेख!
तर्री ताई यांची कविता आणि
मला वर दिली तितकीच माहिती आहे
इतका विंट्रेस घेऊन कविता
मस्त जमलंय! बहुगुणींनी दिलेली
व्वाहवा! छान.
अप्रतिम!
उत्तम