Skip to main content

मन

लेखक शीतल जोशी यांनी शुक्रवार, 21/08/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले किती शोधले तरी, न एक डोळा दिसले मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता मन कणखर किती , सावटाची दाटे भीती सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ मन एकाकी कधी अन कधी सामावे सर्वांसी रात्र काळोख दाटता, उजळे प्रकाश चंद्रासी मन अवखळ कधी, अन कधी क्रोधात कोपता मन प्रेमळ कधी , अन कधी निरव शांतता न कळले हे मन , न माझे न तुझे मन होता हे उदास, मानसी अश्रुंचे हे ओझे कधी चंचल हे मन, अन कधी हर्षता आनंदे कधी एकटे च रुसते अन कधी गाते तुझ्या संगे कधी सापडेल का हे मन, माझ्या मुठीत या बंद वाटे, नकोच सापडावे , मुक्त विहरू दे स्वच्छंद जर कधी लागलच ठाव, या उनाड मनाचा उरे काय अर्थ ह्या जगण्याचा बरे आहे , हे असेच , काही कोडी न सुटतात रिक्त ओंजळ हे माझी, न काही उरले उरात मन कोणासी कळले , भले भले हि थकले जंग जंग पछाडून , हाती काही न लागले मनाबद्दल हे विचार पण, माझ्या मनातलेच बोल मानसी बोलता स्वतःच्या, कळे मनाचे हे मोल नको उत्तर शोधूं या, या मनाच्या प्रश्नाचे तेच असेल हे जगण्याचे ऋण , जे बाकी असेल फेडायचे -शीतल
लेखनविषय:

वाचने 2577
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

ही कविता व्हॉटस अ‍ॅपवर पूर्वी वाचली आहे असे वाटते. ती आपणच त्यावर टाकली होती का ?

In reply to by मांत्रिक

मांत्रिक तुमची भीती वाटते हो. उगीच तुम्ही ओम फट म्हणायचे अन इकडे आमचा स्वाहा व्हायचा कशी वाटली गंमत

In reply to by मांत्रिक

मांत्रिक तुमची भीती वाटते हो. उगीच तुम्ही ओम फट म्हणायचे अन इकडे आमचा स्वाहा व्हायचा कशी वाटली गंमत

मन कोणासी कळले , भले भले हि थकले जंग जंग पछाडून , हाती काही न लागले वा... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town