✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हणे हा पुरोगामी महाराष्ट्र

व
वटवट यांनी
Wed, 08/19/2015 - 15:17  ·  लेख
लेख
बाबासाहेब पुरंदरेंच्या निमित्ताने जो काही वाद उकरून काढला आहे. आणि त्याला ज्याप्रकारे हे असलं दुर्दैवी रूप दिलं जातंय… त्यावरून विशेषकरून इतिहाससंशोधनाबद्दल काही नियम करावेत कि काय असा विचार मनात आला… १. कोणीही इतिहास संशोधन करूच नये. २. करायचे असल्यास फक्त त्यांच्याच जातीच्या संदर्भात करावे. ३. ते करण्याआधी त्या त्या जातीच्या महासंघाची परवानगी घेणे बंधनकारक करावे. ४. प्रत्येक शब्द अन शब्द काडीचीही अक्कल नसलेल्या, "पॉवर"फुल दळभद्रीच लोकांकडून तपासून घ्यावा. ५. संपूर्ण आयुष्य ध्यॆयाने झपाटून तर अजिब्बात संशोधन करू नये… कारण आज काल कुत्र्याच्या छत्र्याच वडाच्या झाडाचं मोठेपण मानत नाहीयेत. ६. आणि चुकूनसुद्धा, कधीही दुसर्याच्या जातीच्या महापुरुषांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करू नये. ७. ह्या महाराष्ट्रात "ब्राह्मणांनी" #कधीही इतिहास संशोधन करू नये. . . सरळ एक रिझोल्युशनंच पास करा म्हणावं… आणि द्या हाकलून एकजात ब्राह्मणांना महाराष्ट्राबाहेर… . . तेंव्हा तरी ह्यांना शांती मिळेल कि नाही देव जाणे…
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4467 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

कुत्र्याच्या छत्र्या

प्रदीप साळुंखे
Wed, 08/19/2015 - 15:23 नवीन
ह्या कुत्र्याच्या छत्र्या कोण? आणि हे वडाचे झाड कोण? काय ही 'वटवट' करताय ?
  • Log in or register to post comments

शशक स्पर्धा संपली आहे.आता

जेपी
Wed, 08/19/2015 - 15:28 नवीन
शशक स्पर्धा संपली आहे.आता क्रुपया पुढच्या वेळेस प्रयत्न करा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा ! :)

वेल्लाभट
Wed, 08/19/2015 - 15:32 नवीन
हाहाहाहा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जौ द्या हो!

पैसा
गुरुवार, 08/20/2015 - 14:08 नवीन
जौ द्या हो! कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही कधी.
  • Log in or register to post comments

.

तिमा
गुरुवार, 08/20/2015 - 14:45 नवीन
वरातीमागून घोडं !
  • Log in or register to post comments

७. ह्या महाराष्ट्रात

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/20/2015 - 15:01 नवीन
७. ह्या महाराष्ट्रात "ब्राह्मणांनी" #कधीही इतिहास संशोधन करू नये.
हे सातार्‍यात ( की कोल्हापुरात) झालेल्या एका विद्रोही साहित्य संमेलनात जाहीरेपणे स्टेज वरुन घोषित केले गेले होते म्हणे !!
सरळ एक रिझोल्युशनंच पास करा म्हणावं… आणि द्या हाकलून एकजात ब्राह्मणांना महाराष्ट्राबाहेर…
ह्यावरुन हिटलर चे फायनल सोलुशन टु ज्युईश क्वेश्चन आठवले , असेही होवु शकते लवकरच !
  • Log in or register to post comments

>>> एका विद्रोही साहित्य

प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 21:30 नवीन
>>> एका विद्रोही साहित्य संमेलनात यावरुन आठवलं. अशाच एका विद्रोही साहित्य संमेलनात शंबूकाचा (रामायणवाले) पुतळा केला होता. त्याचं डोकं आणि धड वेगळं अशा अवस्थेत. संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन वगैरे प्रस्थापित गोष्टींनी न करता डोकं धडावर ठेवून झाली. असते एकेकाची आवड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आयडीया आवडली.

अर्धवटराव
Fri, 08/21/2015 - 00:21 नवीन
डोके धडावर प्रस्थापीत करुन संमेलनाची सुरुवात करायची कल्पना जाम आवडली आपल्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हत्ती आपल्या चालीने चालतो,

विवेकपटाईत
गुरुवार, 08/20/2015 - 19:39 नवीन
हत्ती आपल्या चालीने चालतो, कुत्रे कितीही भुंकले तरी काही फरक पडत नाही. भुंकणे कुत्र्यांचा स्वभाव असतो. कधी कधी मालकांच्या आदेशानुसार हि भुंकतात. हे चालणारच. यालाच राजनीती म्हणतात.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा