Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 18/08/2015 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली शतशब्दकथा स्पर्धा पहिली फेरी १५ दिवस ८३ कथा २४३८ मतं शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार! आणि.... वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
क्रमांक शीर्षक लेखक Wordcount Revised Votecount
1 लोकमान्य मृत्युन्जय 100 88
2 निकाल मधुरा देशपांडे 100 65
3 ईवाईन नाव आडनाव 100 58
4 वन नाईट इन द ट्रेन प्राची अश्विनी 99 55.44
5 अंतर अभ्या.. 100 55
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही. शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्‍या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला. प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
  • मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
  • मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
  • प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
हार्दिक अभिनंदन! आता प्रतीक्षा आहे परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांची!

वाचने 21218
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

.

सर्व विजेत्यांचे आणि संयोजकांचे हार्दिक अभिनंदन !!!

पहिली शतशब्दकथा स्पर्धा पहिली फेरी १५ दिवस ८३ कथा २४३८ मतं

असा विक्रम... नव्हे नव्हे... असे अनेक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल मिपाकरांचे आणि संयोजकांचेही हार्दिक अभिनंदन !

.

मनापासून अभिनंदन.माझा मिपा वरील पहिलाच प्रयत्न होता आणि खूप सारे प्रतिसाद पण मिळाले.त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार.सिक्वल पण जमल्यास लिहतो.

तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्‍या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला. >> हे सही :)

मिसळपाव आणि स्पर्धा आयोजकांचे अनेक आभार.. स्पर्धेच्या निमित्ताने लोकांना वेगळे काहीतरी आणि तेही कमी शब्दांत लिहिण्याची प्रेरणा मिळाली, शिवाय वाचकांसाठी सुध्दा ही पर्वणीच होती. शंभर शब्दांत सगळं बसवायला किती ते शब्दांचे खेळ करावे लागले... ;)

पहिल्या पाचही कथा जबरदस्त होत्या. 'लोकमान्य'चा आवाका खूप मोठा होता आणि लेखकाने तो १०० शब्दात अगदी अचूक पकडला. 'निकाल'मध्ये एका व्यथित झालेल्या मनाचे अश्रू समर्थपणे चितारले होते. 'ईवाईन' मध्ये इतक्या कमी शब्दात इतका सुन्न करणारा अनुभव लेखकाने इतक्या प्रभावीपणे मांडला होता की क्षणभर प्रत्यक्ष त्या जागी असल्याचा भास झाला. 'वन नाईट इन द ट्रेन' ही कथा मानसिक आंदोलनांचे मन मुग्ध करणारे चित्रण करते. 'अंतर' एकंदरीत आयटीवर आणि खाजगी नोकरीमधील भवितव्यावर स्वच्छ प्रकाश अगदी मोजक्या शब्दात टाकते. मला बाकीच्या बऱ्याच कथादेखील मनापासून आवडल्या. खूपच जबरदस्त पंच होता जवळपास सगळ्या कथांमध्ये. शतशब्दकथेत अवाक करणारा पंच हवा. तो या कथांमध्ये नक्कीच होता. काहीतरी धक्कादायक पण नकारात्मक शेवटच कथेला नाट्यमयता प्रदान करतो असा काहीसा सूर सुरुवातीच्या बऱ्याच कथांमध्ये दिसला. काही अंशी तो खरा देखील आहे. वर्तमानपत्रात मोठ्या नकारात्मक बातम्यांना मोठे स्थान मिळते आणि सकारात्मक बातम्यांना बहुतेक वेळा छोट्या जागेत समाधान मानावं लागतं. शब्दांची संख्या शिथिल करण्याने फारसा फरक पडायला नको. अगदी कमी शब्द हा खरं तर निकष असायला हवा. दोन-पाच शब्द इकडे-तिकडे हा वादाचा विषय असायला नको असे वाटते. शेवटी प्रतिभा, क्षमता, कौशल्य महत्वाचे. असो. पुनश्च सगळ्यांचे अभिनंदन आणि आयोजकांचे मन:पूर्वक आभार! स्पर्धेने खूप मजा आणली. कंटाळवाण्या माहौलमध्ये खूप रंगत आणली. :-)

शतशब्दकथेत अवाक करणारा पंच हवा. तो या कथांमध्ये नक्कीच होता.>>+१११११ कुणीतरी अश्विनी नावाच्या आयडीने बहुतेक . 'आणि तो पादला ' हि सुधा कथा होऊ शकते असा भयाण प्रतिसाद दिला होता . त्यांचा निषेध

सर्व प्रतिसादकांना अनेक धन्यवाद, आदूबाळ यांना त्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल डब्बल धन्यवाद. कथेचा सिक्वल प्रकाशित करु का?

In reply to by मृत्युन्जय

तो मागे पडेल. अजून बाकी तीन स्पर्धक कळायचे आहेत. मग सगळ्यांनी ठरवून एक्/दोन दिवसांत टाका उत्तरार्ध.

In reply to by मृत्युन्जय

सिक्वल शंभर शब्दांचाच असावा आणि मूळ कथेच्या प्रतिसादामध्ये द्यावा असे वाटते. म्हण्जे एकत्र वाचता येतील. संंंमं काय म्हणते पहायला हवे!

In reply to by खेडूत

खेडूतराव सिक्वलचा धाग्यात मूळ कथा वर पेस्टवली आणि खाली सिक्वल लिहिला तर वाचायला जास्त सोपे पडेल. अशा फायनलिस्टचे डुएलचे सहा धागे दिसतील. बादवे ह्या सहा जणांचे स्कोर पण परत मोजणार का? का फक्त परिक्षक निवडणार विजेते? आता परत परत ते वाट पाहाणे नको. ;)

In reply to by अभ्या..

खरंय! सहाच असतील तर ठीक- पण सर्वांना सिक्वल लिहीता येणार असं कुठं तरी वाचलं असल्याने अजून ८४ धागे निघू नयेत हे अपेक्षा !

बहुतांश शतशब्दकथा आवडल्या. एकत्र वाचायलाही आवडतील. हा नवा प्रकार खूपच भावला... ता.क.-अशाच प्रकारे आंजी'च्या कथा वाचायलाही खूप खूप आवडेल.

सर्वाना धन्यवाद! आदूबाळ तसेच सं मं नी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि वाचकांनी वेळ काढून वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. या स्पर्धेनिमित्त अनेक सुंदर कथा वाचायला मिळाल्या. त्यामध्ये नंबर काढणं खरेच कठीण आहे. आताचे क्रमांक मतदानावर अवलंबून आहेत पण खरे नंबर काढताना परीक्षकांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यांना शुभेच्छा!!!!

स्पर्धेची प्रथम फेरी यशस्वी रितीने पार पाडल्या बद्दल आणी शेंच्युरी निमीत्त श्री.आदुबाळ यांचा सत्कार शाल,श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. -आता तरी उरलेला निकाल लावा संघटना.

सर्वच स्पर्धकांनी आता त्यांच्या सिक्वेल्स टाकाव्यात ही विनंती... (त्या स्पर्धेसाठी नसल्याने १०० ची अट सैलावली तरी चालावी)

सर्वांचे अभिनंदन! अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला! एवढी अपेक्षाच नव्हती. मग आता फायनलला रंगत वाढवायला पहिल्या ५ जणांना परीक्षकांच्या ३ निवडीसकट फायनलला पाठवावे काय? म्हणजे पहिले ३ निवडताना अजून जरा स्पर्धा राहील! शेवाय अभ्याचा नंबर अर्ध्या मार्कानेच मागे राहिला आहे! :)