मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] पारितोषिक !

चाफा · · स्पर्धा
चौदाव्या आंतरराष्ट्रीय विज्ञानपरीषदेच्या शेवटच्या टप्प्यात स्वागत, तीनशेसाठ शोधांपैकी सर्वोत्तम `भूगर्भातून ऊर्जानिर्मितीच्या' प्रोफेसर रूसच्या संशोधनाला सर्वानुमते प्रथम पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. डॉक्टर मायकेलनी आपले भाषण संपवले. " माझ्यामते निर्णय घेण्यात घाई होतेय " सर्वांच्या नजरा मंचावर येणार्‍या व्यक्तीकडे वळल्या. " तुम्ही वेळेनंतर संशोधन दाखल केलंय, प्रोफेसर केनेथ " मायकेल उत्तरले " वेळेपेक्षा निष्कर्षावर विचार करायला हवा, आणि निष्कर्ष कसे आहेत ते तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल " केनेथचा हस्तनिर्देश मायकेलकडे होता. अपेक्षेने मायकेलकडे वळलेल्या नजरा त्याच्या प्रश्नार्थक चेहर्‍यावर आदळून परत मंचाकडे वळल्या, विजेत्याची ट्रॉफी आणि टेबलावरील रूसच्या संशोधनाच्या कागदांसहित केनेथ मंचावरून नाहीसे झाले होते. "याचा अर्थ याचे टेलीपोर्टेशन वरचं संशोधन खरंच यशस्वी होतं " मायकेल स्वत:शीच पुटपुटले.

वाचने 6416 वाचनखूण प्रतिक्रिया 39

किसन शिंदे 13/08/2015 - 20:30
लेखकाचे नाव पाहून खूप उत्साहाने धागा उघडला पण टेलीपोर्टेशन काही झेपले नाही. असो. जेव्हा समजेल तेव्हाचे +१ आत्ताच देऊन ठेवतो.

In reply to by किसन शिंदे

जडभरत 13/08/2015 - 20:45
टेलिपोर्टेशन आज जरी अशक्य वाटले तरी शक्य होणारच नै कशावरून? विमानप्रवास, दूरसंभाष, दूरचित्रवाणी ही पण कधीतरी कल्पनाच होती की?

एस 13/08/2015 - 20:37
हाहाहा! रोचक!

In reply to by अर्धवटराव

नाखु 14/08/2015 - 09:15
खंप्लीट हणुमोदन. नाखुस सराफ

कोमल 14/08/2015 - 09:17
+१ मस्तच.. टेलीपोर्टेशन कधी सस्केसफूल होइल सांगता येते नाही. पण शशक सस्केसफूल झालीये

सौंदाळा 14/08/2015 - 11:03
+१ १०० शब्दात पण चाफा टच तस्साच दणकेबाज आहे.

थॉर माणूस 14/08/2015 - 11:08
कल्विद कथा...! मस्त जमलीये आणि सिक्वेलसाठीसुद्धा खूप शक्यता आहेत कथेत. आवडली.

तुडतुडी 14/08/2015 - 12:24
मस्त. +१ विमानप्रवास, दूरसंभाष, दूरचित्रवाणी हि कल्पना कधीच नवती . मध्ये गायब झाल्या होत्या ह्या गोष्टी . असो . टेलीपोर्टेशन हि सुधा कल्पना नाहीये . it exist .

चाफा 14/08/2015 - 16:48
खुप दिवसांनी आलो पण तुमचं प्रेम तसंच आहे, शतशः आभार