Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] "व्हॉटसअप "

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 14/08/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कानात इअर फोन कोंबून बाईक बुंगवत जायचं इतकच त्याला माहीत, रस्त्यावर गर्दी दिसली म्हणून उत्सुकतेने याने पण बाईकचा वेग कमी करून काय दिसतंय ते बघायला गेला. एका बाईकचा अपघात झाला होता, कुठल्यातरी गाडीच्या धडकीने त्या बाईकची अवस्था वाईट केली होती. आणि त्यावरचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच अस्ताव्यस्त आडवा पडला होता. "अरेरे तो गाडी वाला ठोकून गेला" जमावाची कुजबुज, पण मदतीला कोणीच आलं नाही. सर्वांसारखे याने पण खिशातून फोन काढून त्यावरून फोटो काढून "व्हॉटसअप " वर शेअर केले करंट न्युज म्हणून. आज हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात, समोरून ओवरटेक करून येणाऱ्या गाडीने याच्या बाईकला धडक दिली होती आणि लोक फक्त फोटो काढत होते शेअर करण्यासाठी.

वाचने 2807
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

+१

+१

+१

+१

बरोबर

+१

+१

+१

+१