Skip to main content

(चरस गांजा अता मिळाल्या)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला* करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला --(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद *गवत*= ग्रास

वाचने 4899
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

विडंबन छान !!! बाबाजी की बूटी.... गाणं आठवलं. क्लास आहे ते गाणं... शब्दही, संगीतही.

In reply to by वेल्लाभट

मी हे गाणे ऐकले नव्हते. तुमचा प्रतिसाद वाचून विडिओ डाउनलोड केला. मस्त आहे गाणे. अगदी गांजेकस!!

__/\__ :-D

मस्तच! डोळ्यासमोर बेफिकीरपणे कश मारणारा हिप्पी उभा राहतो. पण हे खरेच शाक्त स्वामी वाटतात! म्हणजे त्यांचे सध्याचे धागे बघून. दोन महत्वाचे पंचमकार कव्हर केलेयत.

In reply to by जडभरत

पण हे खरेच शाक्त स्वामी वाटतात! >> मग काय! आहेच मी शाक्त स्स्वामी;) ( गंमतीचा भाग जाऊ द्या, पण महाकालेश्वर आमचे कुळदैवत आहे. )

लै भारी हो स्वामीजी.