Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] किंकाळी

लेखक सिध्दार्थ यांनी शुक्रवार, 07/08/2015 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
१९७५ च्या आसपास. काळ्या आभाळाची सावली नजीक येत होती. तिला आज घरी जाण्यास उशीर झाला होता. अंधार वाढू लागल्याने ती जनावरांना घेऊन गावाकडे निघाली. वाटेत एक नदी होती. दुपारच्या जास्त पावसाने पाणी वाढले होते पण पूल नसल्याने नदीत पाय ठेवण्यावाचून पर्याय नव्हता. चार जनावरांच्या शेवटून ती दहा वर्षाची पोर नदीत उतरली. एका मोठ्या विजेच्या कडकडाटा बरोबर पावसाच्या सरी येऊन अंग भिजवू लागल्या. नदीच्या मध्यापर्यंत आल्यावर तिचा तोल गेला. ती प्रवाहाबरोबर वाहू लागली. नाका तोंडात पाणी गेले. वाहून जाताना काठावरच्या एका दगडाला पकडून ती स्वतःला सावरून अडखळत उभी राहिली, कसे बसे मागे वळून तिने बघितले, ती मनातल्या मनात समाधानी झाली, शेवटचे जनावर सुखरूप नदीपार गेले होते पण दुसर्‍याच मिनिटाला पायाखालचा दगड घसरला आणि तिच्या तोंडातून किंकाळी निघाली.

वाचने 3484
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

नुसताच प्रसंग आहे. कथा नाही.

In reply to by dadadarekar

दोन भागांमध्ये आहे शशक हा त्यातला पहिला भाग

In reply to by कहर

@दोन भागांमध्ये आहे शशक म्हणजे द्विशशक झाली राव … >> अगदी बरोब्बर.. शतशब्द कथेमधे शेवटाला जो खेळ घडणं अपेक्षित असतं..तसं काहिही नाहिये यात. नुसतं असल्यासारखं वाटतय. कथाबीजाशी त्या शेवटानी काहितरी पंच दिला पाहिजे..ते होत नाहीये यात.

+१

डोळे पाणावले.

+१

+१ अर्र वाईट वाटलं. पण सगळेच जण अशा दु:खांत शशक का लिहितात?

+१

+१

+१

+1

+१