१९७५ च्या आसपास.
काळ्या आभाळाची सावली नजीक येत होती. तिला आज घरी जाण्यास उशीर झाला होता. अंधार वाढू लागल्याने ती जनावरांना घेऊन गावाकडे निघाली. वाटेत एक नदी होती. दुपारच्या जास्त पावसाने पाणी वाढले होते पण पूल नसल्याने नदीत पाय ठेवण्यावाचून पर्याय नव्हता. चार जनावरांच्या शेवटून ती दहा वर्षाची पोर नदीत उतरली.
एका मोठ्या विजेच्या कडकडाटा बरोबर पावसाच्या सरी येऊन अंग भिजवू लागल्या. नदीच्या मध्यापर्यंत आल्यावर तिचा तोल गेला. ती प्रवाहाबरोबर वाहू लागली. नाका तोंडात पाणी गेले. वाहून जाताना काठावरच्या एका दगडाला पकडून ती स्वतःला सावरून अडखळत उभी राहिली, कसे बसे मागे वळून तिने बघितले, ती मनातल्या मनात समाधानी झाली, शेवटचे जनावर सुखरूप नदीपार गेले होते पण दुसर्याच मिनिटाला पायाखालचा दगड घसरला आणि तिच्या तोंडातून किंकाळी निघाली.
वाचने
3484
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ १०० शब्दात अतिशय परिणाकारक
++॑१
२ भाग
In reply to ++॑१ by dadadarekar
दोन भागांमध्ये आहे शशक म्हणजे
In reply to २ भाग by सिध्दार्थ
@दोन भागांमध्ये आहे शशक
In reply to दोन भागांमध्ये आहे शशक म्हणजे by कहर
+१
+०.२३
+१
+१
+१
+१
+१
+1
+१
+१ शेवट वाईट आहे...
फक्त प्रसंग कथा कुठे ?