Skip to main content

[शतशब्दकथास्पर्धा] दैव

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 13/08/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
ओ सायेब... !!! आज तरी माह्या बापाचा चेक आला का हो ? डागतराने आयचं आप्रेशन कराया सांगितलंय. पंधरा हजार रुपडे मागतोय..!!!! .. .. .. .. .. मागल्या वर्षी अंजीच्या बापानं आत्महत्या केली... वीस हजाराच्या पिक कर्जापायी. . आपल्या पतीला झाडाला लटकलेल पाहून तिच्या आईला तिथेच लकवा मारला... आता ती घरी झोपूनच असते. पिंट्याची शाळा पण आता फीचे पैसे न दिल्यामुळे बंद झाली होती. शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा चेक मिळवण्यासाठी अंजी गेले चार पाच महिने तलाठी ऑफिसचे उंबरठे झिझवत होती. .. .. .. .. .. आज त्याचा मूड चांगला होता. त्याने चेक देण्यासाठी हाथ पुढे केला. परंतु अंजीचे दैव आज चांगले नव्हते. .. .. .. .. .. .. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी. "अतिप्रसंग करणाऱ्या तलाठ्याचा गळा दाबून खून. .. तरुणी फरार ...!! "

वाचने 4469
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

+१

:(

+१

+१

+१

+१

+१

+१ भयानक

+१

अतिप्रसंग झाला हे पेपराला कोणी सांगितले. ?

In reply to by ब़जरबट्टू

दादू काळजी नसावी पत्रा(वळी)कार न घडलेले(सुद्धा) लिहितात इथे घडलं असेल असे सम्जून चालू कसे !!!
दांडकेवाल्यांचे(चॅनेल फेम) तेच दांडके त्यांच्याच टाळक्यात हाणले पाहिजे या मताचा नाखुस.

In reply to by ब़जरबट्टू

कथा लिहिताना हा विचार आला होता मनामध्ये... पण इतकी मोठी कथा फक्त शंभर शब्दात सांगायची तर काही गोष्टींचे लॉजिक वाचकांवर सोडावे लागते . नाईलाज असतो हो :( काही शक्यता १) अतिप्रसंग करताना औफिस च्या बाहेर त्यांचा आवाज लोकांनी ऐकला असेल २) आन्जीवर अतिप्रसंग करताना तलाठ्या ला त्याचं एखाद्या सहकाऱ्याने मदत केली असेल... नंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर त्याने आपल्या जबाबात सत्य काय घडले हे सांगितले असेल. ३) कार्यालयातील CCTV वर हि घटना कैद झाली असेल. ४) घटना घडत असताना गावातील एखाद्या व्यक्तीने अन्जीला मदत करण्याऐवजी त्या घटनेचा video शूट केला असेल... ( आपल्या देशात हे आजकाल सर्रास घडते ) ५) खून केल्यावर अंजी प्रथम घरी किंवा एखाद्या नातेवाईकाकडे गेली असेल... व जे काही घडले ते सगळे सांगितले असेल. व त्यानंतर फरार झाली असेल... यापैकी एखादी शक्यता कथेमध्ये घालता आली असती पण मग १०० शब्द मर्यादा पाळता आली नसती :) त्यामुळे याबाबतचे लॉजिक वाचकांवर सोडले आहे. ...

+1

+१

+१

+१

+११११

+१

दारुण वास्तव!

+१

+१

+१

+१

+१