Skip to main content

[शतशब्दकथास्पर्धा] भेट

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 13/08/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरताच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती. पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली. ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?” त्यालाही ओळख वाढवायचीच होती. दोघे बाहेरच्या बागेत बाकावर बसले.गप्पा रंगल्या.हातात हात आले.नववर्षाच्या गार वाऱ्यात तिचा हात जास्तच थंड लागल्यामुळे त्याने आपला कोट तिच्या अंगावर पांघरला.पहाटे तिला घरी पोचवले. आता कोट घेण्यासाठी तो आला होता.दार उघडण्याऱ्या वृद्धाने उदास हसत स्वागत केले. दारासमोरच्या भिंतीवर तिचा फोटो त्याच्याकडे पाहून हसत होता.फोटोसमोर मेणबत्ती जळत होती.

वाचने 7275
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

+१

+१ छानच कलाटणी दिलीत! पाककृतींबरोबर आता भयकथा लिखाणात पण जोरदार स्वागत! :)

बाप्रे!!

+१

+१

+१

+१

जोरकस (उशीराची भरपाई अशीही) भयचकित नाखुस

+१

+१ एक प्रश्न आहे. नायिका जेव्हा नायकाला चर्चमध्ये भेटते तेव्हा ती भूतच असते कि नायक तिला घरी सोडून जेव्हा परत कोट आणायला जातो त्या मधल्या काळात तिला अपघात झालेला असतो?

In reply to by किसन शिंदे

अर्थातच नायिका जेव्हा नायकाला चर्चमध्ये भेटते तेव्हाच ती भूत असते! कारण नायक तिला घरी सोडून जेव्हा परत कोट आणायला जातो त्या मधल्या काळात तिला अपघात झालेला असतो? असे म्हटले तर फ्युनेरल विधी, जमलेले नातेवाईक वगैरे उल्लेख आला असता ना? रच्याकने: भूत असलेली नायिका चर्च मध्ये जाईल ह्याला रामसे बंधूंनी तर नक्कीच जोरदार आक्षेप घेतला असता, कारण त्यांची सगळी भुते अगदी ईमानदारीत देऊळ, चर्च, साधु, संत यांना फार्फार घाबरत असत. होली वॉटर अंगावर पडल्यावर तर त्यांना भाजल्यागत वेदना होत म्हणे. त्या मानाने हॉलीवूडची सध्याची भुते फार बेकार! मरता म्हणून मरत नाहीत. मेली-मेली म्हणूस्तोवर पुन्हा कुठून तरी उपटतात. खरंच त्या मानाने रामसे बरे!

In reply to by जडभरत

>>>>चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरतच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती. पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली. ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?” यात फ्युनरलचा आणि नातेवाईकांचा कुठेच उल्लेख दिसत नाही.

In reply to by किसन शिंदे

चर्चची न्यू इयर पार्टी आहे. जागा चर्चच असेल असं नाही... बाकी मेल्यानंतर तरी गप्प बसावं की 'माणसानं'(लिंगनिरपेक्ष शब्द आहे. योग्य तो अर्थ घ्यावा)

In reply to by प्यारे१

बाकी मेल्यानंतर तरी गप्प बसावं की 'माणसानं'(लिंगनिरपेक्ष शब्द आहे. योग्य तो अर्थ घ्यावा)
हा हा हा हा.. =)) पण असं कसं? 'इच्छा-वासना' अतृप्त राहील्यानंच तर आत्मा 'भुत' होतो, असा फंडा आहे ना?

+१

+१

त्याने आपला कोट तिच्या अंगावर पांघरला.पहाटे तिला घरी पोचवले. आता कोट घेण्यासाठी तो आला होता घरी पोचवले तेव्हाच का नाही कोट घेतला. काळाचे अंतर कळत नाही.

In reply to by थॉर माणूस

पार्टी मध्ये ड्रिंक्स होती. पहाटे तो त्या बाईला घरला सोडून गेला. यानंतर माणूस काय करेल सांगा बरं? आपल्या स्वताच्या घरी जाईल आणि गप गुदगुल्या होत होत मधूनच हसत झोपेल. दुपार नंतर कधीतरी जाग येणार तेव्हा लक्षात येणार संध्याकाळी पुन्हा कुठंतरी जायचंय कोट हवा. (इथे मत बदलू शकतं. तिलाच भेटायला जाईल की, फ्रेश आहे वगैरे वगैरे ) मग तो जाणार तिच्या घरी. थोडक्यात... आता म्हणजे उतरल्यावर!

In reply to by प्यारे१

कोट घेण्याचा बहाणा असतो. त्यानिमित्ताने अजून एका भेटीची निश्चिती करता येते! सगळं विस्कटून सांगावे लागते आजकाल! श्या: पूर्वीचे मिपा राहिले नाही हेच खरे. ;-)

In reply to by एस

त्या छकु छकु ताहो है मध्ये भारी दाखवलंय. थंडी का पावसामुळं शारुख आपला कोट काजोल ला देतो आणि नंतर शिंकत नि शेकत बसतो. (लिहिता लिहिता हे सगळं समर कँपमध्ये होत असतं हे आठवल्यानं बावचळलो खरंतर)

+१

+१

+१

+१ वो कौन थी!

मस्तच

+1

+१

+१ बाकी प्रतिक्रियांशि - ह्या ह्या करून शमत! :-D समांतर:- मलाही देवळाच्या अंगणात चाफ्याची फ़ुलं काढत असलेली हिरविण घेऊन कथा लिवायाचे स्फुरण चढत आहे! :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>> हिरविण घेऊन आँ???? घ्या आता!

+१

+१

+१

+१

+१ :))

Mast g tayde +१

Mast g tayde +१

+१

+१

+१

+१

+१. बाकी कथा सुंदरच. उत्तरार्ध वाचायची उत्सुकता आहे…

+१

+१