Skip to main content

[शतशब्द्कथा स्पर्धा] पहाट

लेखक बोलघेवडा यांनी बुधवार, 12/08/2015 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
" मालक सोडा तिला, म्या हुवतर पाया पडते, पर लेकीला सोडा", तमासगीर कमळाक्कान हंबरडा फोडला. "आमी येकदा धरलं, का मंग सोडत नसतोय" "आमी काय म्हनल त्ये ध्यानी आलं न्हाई का? ह्या लोकास्नी वाड्यातून भाइर काडा, आन ह्या पोरीला वर माडीवर न्ह्या. आमी आलोच लगोलग" संभानं भेदरलेल्या नाजुकाला पकडण्यासाठी हात म्होर केला, त्योच, "तिच्या आंगाला हात लावशील तर, जित्ता गाडीन हितं" करकर वहान वाजवत धाकलं मालक वाड्यात दाखल झालं. त्यास्नी बघून खुद्द पाटील बी टरकला. धाकल्या मालकाच्या आडदांड हातातलं कडं मशालीच्या प्रकाशात लखलखत हुतं. आन अडगळीच्या खोलीतुन आजवर ह्यो तमाशा बघणाऱ्या थोरल्या आज्या पाट्लानं, थरथरत्या हातानं मिशीला पीळ भरला व्हता.

वाचने 3806
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

+१

मस्त!

+१

+१

+1

कळली नाही खरंच! त्या मुलीला धटिंगणांच्या तावडीतून वाचवली इतकाच आशय कळला! बरोबर का? +१ आजा आणि नातू चांगले असतात का?

In reply to by खटपट्या

मी ही! +++१११ काही जणांनि शतशब्दकथांचा "पुढचा भाग" लिहायचाय,ह्या ऐवजी त्या पुढच्या भागात-नेऊन पूर्ण करायच्या आहेत.. असा अर्थ घेतलेला दिसतोय.

+१ मस्त!

+१.. आता धाकलं मालक हात धरतील? पण कुणाचा? कळण्यासाठी वाचा भाग २..

In reply to by चिगो

खिक्क्! हात धरणारा विल्लन, हात हातात घेतला जाणारा हीरो.

+१

+1

हीचा उत्तरार्ध सुखांत होवो हीच अपे़क्षा

+१

+१

पाटलाचा खेळच न्यारा.

+१

..