मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया
मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया
१.
मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. सिगारेट देऊन, तयार सबमिशन-फाईल घ्यायचं, साध सरळ बार्टर असतं, काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? मैत्रीच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. कॅन्टीनमध्ये वन बाय टू करून मैत्री करता येते, वर्गातल्या प्रॉक्सी मधून मैत्री करता येते,इंजिनीरिंग ड्राइंग कॉपी करून मैत्री करता येते, झुंडीने रात्रभर जागून सबमिशन करता मैत्री येते, आजूबाजूच्यांच पाहून पेपर लिहिताना मैत्री करता येते, लिहिताना चुकलात तरी मैत्री करता येतं; मास्तरांना गंडवायला शिकलात तरी मैत्री करता येतं ! इंजिनीरिंगला गेलो कि डोक्यावर शिंग फुलू लागतात, जागेपणी म्याटिनीचे झोपाळे झुलू लागतात ! आठवतं ना, तुमची माझी प्लेसमेंट जेव्हा झाली होती, रूम सगळी बिअर भरली होती ! लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, तंगडीसकट बुडता बुडता वाचलो होतो ! बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं, मित्रांनीच अलगद वर काढलं असतं !
मैत्रीबित्री झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात, मैत्री म्हणजे फॅड नुसतं, मानणारी माणसं भेटतात ! असाच एक जण चक्क मला म्हणाला, अमेरिकेत सेटल झालो तरी मैत्रीबित्री कधीसुद्धा केलं नाही !आमचं काही नडलं का? मैत्रीशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं ! तेव्हा मी इतकंच म्हटलं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं ! मित्रं सोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक सिगारेट अर्धी अर्धी ओढली असेल गोडीने ! भर दुपारी उन्हात कधी त्याच्यासोबत तासन तास फिरला असाल, बार्गेनिंग करत त्यांच्याबरोबर फ़शन स्ट्रीटमध्ये शिरला असाल ! मैत्रीकधी भांडतेसुद्धा !! रागान कधी गांडो म्हणते सुद्धा, किल्ली चोरून बाईक फिरवणे सुद्धा मैत्री असते, घाण घाण शिव्यासुद्धा मैत्री असते, तरीसुद्धा मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते.
*********************************************************************************
२.
कोमेजून गंजलेली एक लुना राणी,
उतरलेली ब्याटरी, त्यात सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही,
सुरु कशी होऊ ब्रम्ह्या, मला स्पार्कच नाही
सांगायाचे आहे, या कवितेतून मला, दमलेल्या लुनाची कहाणी तुला,
आटपाट पुणेनगरी गर्दी होती भारी,
घामाघूम ब्रम्हे करी रोजचीच वारी,
रोज सकाळीच ब्रम्हे निघताना बोले,
लिफ्ट द्यायची काल राहूनीया गेले,
जमलेचं नाही काल मला जरी,
आज परी देणार मी बळेच-जोरी,
विद्यापिठ्मार्ग मध्ये मारू मग फेरी,
ख-या खु-या पोरीसाठी ४००० जरी,
विकेन मी जुन्याबाजारात मला,
दमलेल्या लुनाची कहाणी तुला,
असा कसा मालक देव लुनाला देतो,
हा लिफ्ट तर देतो वर ४००० देतो,
सर्विसिंग गेल्या माझ्या सगळ्या निसटून,
पळवे मला नुसता हा विद्यापीठातून,
जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे,
नजरेत तुमच्या काही अनोळखी दिसे,
मुक्तापिठातून लुना हरवेल का हो,
नंतर हा ब्रम्हे तुम्हा आठवेल का हो,
दाखविली मी या कवितेतून कला,
दमलेल्या लुनाची ही कहाणी तुला... ला ला ला....
**********************************************************
उरलेल्या सावकाश टाकेन प्रतिक्रियेत ….
प्रतिक्रिया
चुडिवाले चाचा
.
एवढंच ना?
.
.
..
प्रयोजन काय?
ओह ते तुम्हीच काय.
मुपिचे दळण मुपिवरच दळावे..
पण या रचना त्याच्याच आहेत ना?
:(
मला वाटतं मुक्तपीठवर नोंदणी
मी वाचलंय हे सर्व. पण म्हटलं
मुपी =?
मुपी = मुक्तपीठ....
मुविजी अहो सप्तर्षि बैंचं
त्याची लिंक मिळाली नाही...
एक मिळाली
धन्यवाद....
धन्यवाद त्या मांजराचं
आजही ते मांजर लोकांची तितकीच
लाडू कावळा
ani ti nachnari lift pan
घाटात फुटला घाम
१ नंबर . लुनाच्या कवितेसाठी .
@कोमेजून गंजलेली एक लुना राणी