Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल

लेखक मधुरा देशपांडे यांनी शनिवार, 08/08/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु. उत्तरार्ध

वाचने 18700
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

+१

+१ (सकारात्मक कथा) +१ (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....दुसर्‍या भागाचा शेवट पण सकारात्मक होवू दे.)

..

+१ टीपीकल बंडखोरी. बाकी मंगळसूत्र मोडलं की तोडलं?

In reply to by प्यारे१

एखादी वस्तु मोडुन गरजेपुरते पैसे मिळवणे अशा अर्थाने इथे मोडलं हाच अर्थ अभिप्रेत आहे. आणि त्या बंधनाला नाकारणे हेही आलेच.

In reply to by मधुरा देशपांडे

मंगळसूत्र 'तोडून' आली असती तर कथा जास्त परिणामकारक झाली असती असं वाटतंय. (नवर्यानं घालायचं असतं ना ते!) थोड़ा 'व्यावहारिक' विचार केला असेल. असो! :)

वा क्या बात है

+१

+१

+११११

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१ आवडली :)

+१

कॉप्या करणारी चुलत बहिण सायन्सला घालुन मला आर्टस मध्ये घातलेला दिवस आठवला. जास्त मार्कस होते तिच्यापेक्षा. अस काही मोदायला जमल नाही, पण कुणीतरी मोडलेलं वाचून भले शाब्बास!! म्हणावस वाटतयं.

In reply to by स्पंदना

यात मुलगा मुलगी अशा वेगळेपणाच्या/ दुजाभाव करण्याच्या वृत्तीपेक्षा अप्पलपोटेपणाची भावना/ आपपरभावाची भावना जास्त असते. बर्‍याच गोष्टी असतात. एक पातळीवर बघून नाही चालत. माझ्या वडीलांना तेव्हा (१९६५ सालच्या आसपास) ६०% च्या वर मार्क असताना त्यांच्या काकांनी स्वतःच्या मुलीला सायन्स ला अ‍ॅडमिशन घेऊन वडीलांना आर्ट्स ला टाकलं होतं. (एकत्र घरात असं कोणीतरी असतंच ज्याचं ऐकावं लागतंम) महिन्याचे लिमिटेड पैसे मिळत असल्यानं खाणावळ लावलेली. त्यात तेव्हाच्या पं.प्र. लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावर खाणावळ वाल्यानं आठवड्यातला एक दिवस सुट्टी म्हणून खाणावळ सोमवारी बंद ठेवल्यावर वडलांचा सोमवार उपवास सुरु झाला होता. काकांची मुलगी एखाद वर्ष कॉलेज केल्यावर उजवली गेली पण वडीलांचा करीअर चा मार्गच बदलला म्हणण्यापेक्शा खुंटला म्हणता येईल. असो!

+१

+१

+१

प्रतिसाद कमीत कमी शब्दात द्यायचे असं काहि आहे का? नाहि आत्तापर्यंत जेवढ्या कथा वाचल्या त्या +१ ह्या प्रतिसादापलीकडे नाहित. असो हि कथा आवडली.

In reply to by दिपक.कुवेत

शतशब्दकथा स्पर्धेची माहिती इथे आहे. वाचकांकडून मिळालेले गुण समजण्यास सोपे जावे म्हणुन ही +१ पद्धत आहे.

आवडलि....

+१

कथा नायीका स्वावलंबी बनावी हीच सदीच्छा!!!

+१

+1

+१

+१

समाजात अशा गोष्टी घडतात. नातेवाईकांत एखादी व्यक्ती अशी असते ज्याचे इतर नातेवाईक (विशेषतः आर्थिक परीस्थिती हलाखीची असणारे) मिंधे असतात. हा मनुष्य वयाने , अनुभवाने जेष्ठ आणि दरारा असणारा असतो. इतरांचे त्याच्यासमोर काही चालत नाही. कथा खूप आवडली.

+१

+१

+१

+१

मस्त

+१ भले शाब्बास्स!!!

+१

+१

+१ शशक चांगली आहेच पण माझा +१ कथेपेक्षा आशयाला, संदेशाला आहे. आयुष्यभर नशिबाला दोष देत रडत बसण्यापेक्षा कथानायिकेने घेतलेला निर्णय फारच सकारात्मक आहे. महत्त्वाचं म्हणजे नायिका स्वतः कर्म करून स्वतःचं आयुष्य घडवायला निघाली आहे, कुणाच्या उपकाराखाली नाही. समाजातही ही विचारसरणी पसरली तर बरेच प्रश्न कमी होतील (की हा माझा भाबडा आशावाद?)

In reply to by स्मिता.

धन्यवाद. अगदी हेच होते डोळ्यासमोर कथा लिहिली तेव्हा. खरंतर माझ्या आजुबाजुलाच असणार्‍या काही लोकांकडे बघुन ही कथा तयार झाली. पोळ्यावाल्या बाईंची दहावी झाल्यानंतर नातलगांच्या दबावाने लग्न झालेली एक मुलगी, जिला विरोध करता आला नाही. सासरच्यांनी माहेरी पाठवले. १८च्या आत झालेले लग्न, कुठे त्याचे कागदपत्र आणि कुठे घटस्फोट. पण नंतर मार्गदर्शक चांगले मिळाले आणि आज ती मुलगी पुढे शिकते आहे. अजुन एक अशीच मुलगी. अत्यंत गरीब. खरंच बोर्डाच्या पेपरला येतानाही दुरवरुन पाणी भरुन आणायची. पण धडपडत आज शिकते आहे. एक घरी भांडी घासणारी निरक्षर बाई, नवरा मारझोड करायचा, हिचे पैसे दारुवर उडवायचा. हिने शेवटी स्वतंत्र संसार थाटला आणि मुलांना शिकवते आहे. तिच्या आजुबाजुला अनेक जणी या त्रासातुन जात आहेत पण तिने हिंमत दाखवली. या सगळ्यात अनेक निकारात्मक बाबी असल्या, तरीही या ३-४ कथा जोडताना त्यात काही काळासाठी कोलमडुन जाणे, पुढे पाऊल टाकायला भीती वाटणे हे असले तरीही नशीबाला दोष न देता पुढे जाणे हा समान आणि महत्वाचा धागा होता. आणि तोच कथेतुन सांगण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदाच शशक लिहिली आणि ती अनेकांना आवडली हे वाचुन आनंद झाला. :)

+१

+१

+१

+१ आम्हीही एक शशक लिहीली होती याच नावाची.

In reply to by खेडूत

:) अरे हो, मी प्रतिसादही दिला होता पण लक्षात नव्हते ही कथा लिहिताना अजिबातच. दोन्ही कथानायिका एकाच मार्गाने जाणार्‍या आहेत हे मस्तच.

+१ एक नंबर

+१

छान कथा! बाकी मला सुरुवातीस वाटले की स्पर्धेचा निकाल लागला …

मस्तच गं!

+१

+1

+1

याचा सिक्वेल कसा असेल याविषयीची उत्सूकता आहे आता... कथेला अर्थातच +१