"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला. उचलल्यावर, त्याला आवडणार्या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.काल तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.शरदीनी,माझ्या पायाशी घुटमळत होती.
शरदला जाऊन बरीच वर्षं गेली.
"मी नवर्यावर प्रेम करायची"
असं मी कसं बोलू.?प्रेम नेहमीच ताजं असतं."
असं बोलून मंदाकीनी त्याच सुगंधी रुमालाने आपले अश्रू पुसत होती.
जणू शरदच तिला त्या रुमाला मधून
"नको रडूं"
म्हणत होता.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
वाचने
3009
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
दवंडी पिटवा लवकर
शतशब्द कथा करूण , शोकांत किंवा रडण्याचा उमाळा आणणारीच असावी असा नियम आहे का ? संपादक मंडळीनी कृपया खुलासा करावा .
नसेल तर तशी दवंडी पिटवण्याची नितांत आवश्यकता आहे . तातडीने यावर कार्यवाही व्हावी .
+१
+१
??? शरदीनी,
माझ्या पायाशी घुटमळत होती. ??? म्हणजे काही कळले नाही...
+१
+१
शरदिनी कदाचित मांजर असेल. होईल खुलासा दुसर्या भागात!
+१
+१
शरदिनी कदाचित मांजर असेल. होईल खुलासा दुसर्या भागात!
शरदीनी माझ्या पायाशी
शरदीनी अगदी लहान वयाची मुलगी होती.आई रडते हे तिला कळत होतं.तिला मंदाकिनीने,तिच्या आईने, उचलून घेतलं नव्हतं.आदल्या रात्री शरद गेल्याने झालेल्या दुख्हाच्या रडारडीचा तिच्या मनावर परिणाम झाला असावा.लहान मुलंच ते.
ओह!!! आत्ता कळली कथा!!! काय
In reply to शरदीनी माझ्या पायाशी by श्रीकृष्ण सामंत
ओह!!! आत्ता कळली कथा!!! काय करणार? शशक प्रभावी बनवण्यासाठी खूप रहस्यमयता वापरलीये अनेकांनी.
वेळ काळ यामध्ये
In reply to शरदीनी माझ्या पायाशी by श्रीकृष्ण सामंत
काही गल्लत होत आहे का?
आणी ४१ वर्षे वय असताना
?
गल्लत
In reply to वेळ काळ यामध्ये by gogglya
फक्त "आता शरदला जाऊन बरीच वर्षं गेली"असं लिहिलं असतं तर गल्लत झाली नसती."आता" शब्द कमी झाला
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद
In reply to गल्लत by श्रीकृष्ण सामंत
कधी कधी १०० शब्दांच्या मर्यादेमुळे असे होत असावे.
+१
+१
+१
छान.
"शरदीदिनी" च्या रहस्य उकलीसाठी पु.भा.प्र.
+१
छान