Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] सुगंधी हातरूमाल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 10/08/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला. उचलल्यावर, त्याला आवडणार्‍या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.काल तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.शरदीनी,माझ्या पायाशी घुटमळत होती. शरदला जाऊन बरीच वर्षं गेली. "मी नवर्‍यावर प्रेम करायची" असं मी कसं बोलू.?प्रेम नेहमीच ताजं असतं." असं बोलून मंदाकीनी त्याच सुगंधी रुमालाने आपले अश्रू पुसत होती. जणू शरदच तिला त्या रुमाला मधून "नको रडूं" म्हणत होता. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

वाचने 2984
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

+१

शतशब्द कथा करूण , शोकांत किंवा रडण्याचा उमाळा आणणारीच असावी असा नियम आहे का ? संपादक मंडळीनी कृपया खुलासा करावा . नसेल तर तशी दवंडी पिटवण्याची नितांत आवश्यकता आहे . तातडीने यावर कार्यवाही व्हावी .

+१

माझ्या पायाशी घुटमळत होती. ??? म्हणजे काही कळले नाही...

+१ शरदिनी कदाचित मांजर असेल. होईल खुलासा दुसर्या भागात!

+१ शरदिनी कदाचित मांजर असेल. होईल खुलासा दुसर्या भागात!

शरदीनी अगदी लहान वयाची मुलगी होती.आई रडते हे तिला कळत होतं.तिला मंदाकिनीने,तिच्या आईने, उचलून घेतलं नव्हतं.आदल्या रात्री शरद गेल्याने झालेल्या दुख्हाच्या रडारडीचा तिच्या मनावर परिणाम झाला असावा.लहान मुलंच ते.

In reply to by श्रीकृष्ण सामंत

काही गल्लत होत आहे का?
शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.
काल तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.
शरदला जाऊन बरीच वर्षं गेली.
आणी ४१ वर्षे वय असताना
शरदीनी अगदी लहान वयाची मुलगी होती.
?

In reply to by gogglya

फक्त "आता शरदला जाऊन बरीच वर्षं गेली"असं लिहिलं असतं तर गल्लत झाली नसती."आता" शब्द कमी झाला

+१

छान. "शरदीदिनी" च्या रहस्य उकलीसाठी पु.भा.प्र.

छान