उरलेली शिळी आमटि, दाल फ्राय किंवा दाल तडकाचा ब्येस्ट सदुपयोग!
साहित्यः
१. तुर, मसुर आणि मुग डाळ - प्रत्येकि पाव वाटि छोटि
२. तेल - ३ चमचे
३. आलं / लसूण पेस्ट - १ चमचा
४. जीरं, धणे आणि बडिशेप पावडर - १ छोटा चमचा प्रत्येकि
५. हळद / तिखट - पाव चमचा प्रत्येकि
६. बारीक चीरलेली हिरवी मिरची - चवीप्रमाणे
७. बारीक चीरलेला टोमॅटो - १
८. बारीक चीरलेले कांदे - २
९. बारीक चीरलेली कांद्याची पात (हिरवा भाग फक्त)
१०. बारीक चीरलेली कोथींबीर
११. काळे तीळ - १ चमचा
१२. ओवा - १/२ चमचा
१३. बेसन - २ चमचे
१४. कणीक
१५. चवीप्रमाणे मीठ
१६. पराठे भाजण्यासाठि साजुक तुप किंवा बटर
कृती:
१. वर म्हटल्याप्रमाणे जर शीळी आमटि, दाल फ्राय कींवा दाल तडका वापरणार असाल तर क्रं. २ ते ४ च्या पायर्या टाळा.
२. तीनहि डाळि ३-४ तास भीजत घालून कमीत कमी पाण्यात कुकरला बोटचेप्या शीजवून घ्या. वरण गार झालं कि घोटुन घ्या
३. आता मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत ३ चमचे तेल घाला. तेल तापलं कि त्यात अनुक्रमे आलं/लसूण पेस्ट, बारीक चीरलेला कांदा घाला. कांदा जरासा परतला की बारीक चीरलेला टोमॅटो घाला.
४. टोमॅटो मउ झाला की त्यात जीरं, धणे, बडिशेप पावडर, हळद, तिखट आणि मीठ घाला. मसाले परतले कि घोटलेलं वरण घालून डाळ सारखी करा. एक ५ मि. गॅस बंद करुन मिश्रण थंड होउ द्या.
५. आता एक दुसर्या भांड्यात कणीक, बेसन, हिरवी मिरची, कांद्याची पात, कोथींबीर, काळे तीळ, चवीप्रमाणे मीठ (वरणात ऑलरेडी घातलेलं आहे हे ध्यानात ठेवुन), हळद, ओवा आणि शीजवलेली डाळ घालून गोळा मळा. शक्यतो पाण्याची गरज भासत नाहि.
६. एक ५-१० मि. मळलेल्या गोळ्यातून लिंबाएवढा गोळा घेउन जाडसर पराठा लाटा. हा पराठा स्टफ्ड नाहिये म्हणून जरा जाडसरच ठेवायचा आहे. दोन्हि बाजूनी साजूक तुप किंवा बटर लावून खरपूस भाजा.
७. गरमागरम परोठे आवडत्या चटणी, सॉस, कैरीचा छुंदा किंवा वाफळत्या चहाबरोबर हादडा.
टीपा:
१. कधीहि, कोणतेही परोठे हे तव्यावरुन डायरेक्ट खाणार्याच्या पानात सर्व करणार असाल तर ठिक अन्यथा तव्यावरुन पराठा काढला कि एका छोट्या तपेली, भांड किंवा स्टिलच्या डब्यावर काढा (खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे). असं केल्याने पराठे गरम असताना खाली वाफ धरुन जे ओलसरं होतात ते टाळलं जातं आणि पराठे हे ओलसरं / लिबलिबीत झाले तर खायचा मुड जातो....स्पेशली स्टफ्ड पराठे.
२. हिरव्या कांद्याच्या पातीएवजी बारीक चीरलेला पालक किंवा मेथीही घालू शकता.
ता.क.: Last but not least म्हणतात त्या प्रमाणे कणीक मळायचं आणि पराठा लाटायचं श्रेय हे none other than...अर्धांगीनीचं.
वाचने
17382
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
दाल पराठा खायला मी ...
आव्व्व न्नो.....मी पयली चा
मस्त दिसत आहेत.
मिश्रण एक-जीव केले की,
In reply to मस्त दिसत आहेत. by अजया
वाहव्वा!!!!!
फारच चमचमीत असणारा
बहुगुणी साहेब/अजया
In reply to फारच चमचमीत असणारा by बहुगुणी
लै भारी
ये कुछ काम है हमारे। टीप
मस्त दिसताहेत.
+ १, थालिपीठं करते अशीच.
In reply to मस्त दिसताहेत. by इशा१२३
ब्यॅचलर स्पेशल डिश आहे...
(No subject)
मस्तच
छान पाकृ
तोंपासू पाकृ ! मधून मधून
फारच देखणा दिसतोय पराठा (की
चला!! काहीतरी खंमंग अन सोप्प
आज दणदणीत लसुणी दाल उरवली आहे
ज्जे बात पिरा
In reply to आज दणदणीत लसुणी दाल उरवली आहे by पिलीयन रायडर
उद्या ब्रेफाला काय हा प्रश्न सुटला!
सदर लेख फाउल समजला जावा.
दीपकची न वाटणारी पण छान
ओह धन्यवाद प्यारे
In reply to दीपकची न वाटणारी पण छान by प्यारे१
अखिलमहाराष्ट्रकोंडयाचेमांडेकर
In reply to ओह धन्यवाद प्यारे by दिपक.कुवेत
तवा बीडाचा आहे का?
वा!
माझी आई पण असे पराठे बनवते
धन्यावद मंडळी
दाल पराठ्याची पाककृती आवडली
करुन पाहीन येत्या शनवारी
फोटो पाहून खावे वाटले.
मस्तं दिसताहेत दाल पराठे.