Skip to main content

गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे

रविवार, 09/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
एका (बहुधा अभारतीय आंतरजालीय) अभ्यासकाने खजुराहोच्या पार्श्वनाथ जैन मंदिरातील आदर्श जादुई वर्ग (Most-perfect_magic_square) चा उल्लेख असलेल्या शिलालेखाचे खालील छायाचित्र दिले आहे आणि मथळ्यातील वरच्या दोन ओळीतील अक्षरे (लेखन) माहित करून देण्याची विनंती मराठी विकिपीडियावर केली आहे. खालील शिलालेख चित्रातील आकड्यांचा टेबल त्याला वाचता आलेला आहे तो बहुधा ७ १२ १ १४ २ १३ ८ ११ १६ ३ १० ५ ९ ६ १५ ४ असा आहे. त्यास खालील गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे. . . . shilalekh . . (छायाचित्र मोठे करुन पाहण्यासाठी विकिमिडीया कॉमन्सवरील या दुव्यावर उपलब्ध आहे.) . . . * विकिप्रकल्पातून उपयोग होत असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील. * अनुषंगिका व्यतरीक्त इतर आवांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी आभार

वाचने 6414
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

मला पहिली ओळ ' राजपुत्र श्री देवसर्म्म' अशी वाटते आहे. माझे हे वाचन बरोबर असेल का ?

In reply to by जडभरत

दुसर्‍या ओळीतील पहिले अक्षर दगडाचा आकार लक्षात घेतलातर कदाचित आपण म्हणता तसे दीर्घ वी असू शकेल पण मग त्या नंतरचे जयतुच्या आधीचे अक्षर कोणते हा प्रश्न शिल्लक राहील असे वाटते आहे

दुसरी ओळ पहिली दोन अक्षरे आणि शेवटचे अक्षर नीट वाचता येत नाहीएत. जयतु आणि हे दंड चिन्ह स्पष्ट दिसते आहे. १) दुसर्‍या ओळीतील पहिली दोन अक्षरे 'रिप' अशी आहेत का ? १.१) पहिली दोन अक्षरे 'रिप' असतील तर त्यांचा अर्थ लागत नाही का काही जैनधर्मीय अर्थ असू शकेल ? २) शेवटचे अक्षर बहुधा हे असावे असे वाटते

In reply to by जडभरत

या निमीत्ताने शोध घेताना रिपुंजय नावाच्या राजाविषयी एक रोचक पौराणिक कथा वाचण्यात आली. अर्थात जैनसंदर्भ शोधल्यास कदाचीत अधिक माहिती मिळू शकेल. पण जैन संदर्भ सहज उपलब्ध होत नसावेत.

पण पहिल्या ओळीत जसाठी वापरलेलं चिह्न आणि दुसर्या ओळीत वापरलेलं चिह्न यात फरक आहे असं मला वाटतं.

In reply to by जडभरत

तुमचा मुद्दा अगदी बरोबर वाटतो आहे. खालच्या ओळीतील जयतुचा ज स्पष्ट आहे, मग पहिल्या ओळीतील पहिल्या दोनक्षरांचे वाचन अगदी वेगळे काही तरी असावे, काय असू शकतील पहिली दोन अक्षरे ?

In reply to by माहितगार

साढ किंवा साट असेल का? साढपुत्र म्हणून एक इंडोनेशियन नाव दिसते आहे गुगलवर. बरं मी तुम्हाला व्यनि केलेली वेबसाईट कृपया चेक करा. तिथे मदत मिळण्याची शक्यता आहे.

In reply to by मुक्त विहारि

उभी आडवी त्रिकोणी कशीही बेरीज करा. उत्तर ३४ येते.पूर्वी अशी यंत्र तंत्रसाधनेत वापरत असत.

In reply to by मुक्त विहारि

;)

In reply to by पैसा

जैन लोकांचे बरेचसे प्राचीन लेखन मागधी प्राकृतात आहे असा उल्लेख मिळतो. अद्याप ओळख न पटलेली चारही अक्षरे गूगल इमेजेस मध्ये शोधण्याचा एक प्रयत्न करून पाहिला साधर्म्य असणारी अक्षरे अद्याप तरी दिसली नाहीत. जोडाक्षरांच क्लस्टर बनवणे ब्राह्मीपासून चालत आले असावे 'वी' असू शकेल असे समजले तरी 'श्व' साठी सहसा दोन अक्षरे कोरलेली असावयास हवीत असे वाटते.

इंग्रजी विकिपीडियावर Jain temples of Khajuraho आणि खजूराहोतील मंदीरे बनवून घेणारे Chandela राजघराणे विषयक लेख आहेत. राजघराण्यातील काही नावात देव शब्द आहे पण नंतर सहसा वर्मा शब्द येतो आहे. वर्मा आनि सर्मा सेम असू शकतात का वेगळेच असावेत ?

हे यन्त्र प्रसिद्ध चंडेल राजा विजयधरचा नातु व राजा विजयपालाचा पुत्र देववर्मा/देववर्मननी(राज्यकाल १०५०-बहुदा १०६०) इसवि सनाच्या १० व्या शतकात इथे कोरुन घेतले.राजा विजयधर(राज्यकाल १०१७-१०२९) हा परक्रमी व कलासक्त होता, मुहम्मद घुरीचा पराभव तसेच खजुरहो च्या अनेक शिल्पांचे,मंदिर बांधकामाचे श्रेय त्यालाच दिले जाते. ह्या यन्त्रा वरील ओळी ह्या पाली/प्राकॄतात असुन- 'राजपुत्र श्री देववर्म/देवसर्म विजयतु:|' असे आहे. राजा देववर्माला सतत शेजारच्या कालचुरी/कालछुरी साम्रज्यापासुन धोका होता.सम्राट त्रिलिंगाधिपति गांगेयदेव कलचुरी आणि त्याचा पुत्र लक्ष्मीकर्ण कलचुरी ह्यांनी चंडेल राज्यांच्या नाकी आणले होते,आणि शेवटी राजा देववर्माला पराभुतही केले. त्या शत्रुपिडेला उपाय म्हणुन देववर्मानी हे यन्त्र मंदिरामधे खोदले असावे.हे काली-चंडीचे यन्त्र आहे जे शत्रुविनाश,प्रापंचिक सुख्,धनप्राप्ती,ग्रहदोष निवारण वगैरे साठी काळीजादु-गुढपंथी-ज्योतिष-तांत्रिक लोकांत 'सिद्ध चौतिस यन्त्र' म्हणुन प्रसिद्ध आहे.चंडी ही चंडेल राजपुत वंशाची कुलदेवी असल्यानी कोणी हा तांत्रिक उपाय राजाला सुचवला असण्याची शक्यता आहे. हा झाला इतिहास, आता मजा गणिताची,युलर च्या कल्पनेनुसार आपण ज्यावेळी दोन 4 × 4 चे mutually orthogonal diagonalize Latin squares घेतो-> A{[२ ३ १ ४],[१ ४ २ ४],[४ १ ३ २],[३ २ ४ १]} व B {[३ ४ १ २],[२ १ ४ ३],[४ ३ २ १],[१ २ ३ ४]}आणि ज्या वेळी आपण त्यांच्यावर 4 × (A − 1) + B हे operation करतो त्यावेळी चौतिस यन्त्रा चा magic matrix सापड्तो. ह्या magic matrix मधे- १.मुख्य Diagonal ची बेरिज ३४ येते. २.प्रत्येक 2x2 ची बेरिज ३४ येते. ३.८ समद्वीभुज(trapezium)असे येतात त्यांची बेरिज ३४ येते. ४.४ त्रिकोण ज्यामधे ३ चौकोन येतात आहेत ज्यंची बेरिज ३४ येते. ५.चारही कोप-यांची मिळुन बेरिज ३४ येते. ६.मुख्य Diagonal सोडुन बाकी सर्व Diagonal ची बेरिज १७ येते. आहे की नाही मज्जा

In reply to by पामर

धन्यवाद. आपल्या ज्ञानाला मनापासून नमस्कार!!! कृपया आपले लेखन ब्लाॅगवर उपलब्ध आहे का. वाचायला आवडेल.

राजा विजयधरला 'महाराजा राव विद्याधर' म्हणुन ओळखले जाते किंबहुना तो ह्याच बिरुदानी जास्त प्रसिद्ध आहे. देववर्मन हा फार कमनशीबी राजा ठरला; महाराजा धंगदेव,महाराजा गंडदेव,महाराजा राव विद्याधर,व कलिंजराधिपती महाराजा विजयपालाच्या पराक्रमी वंशात जन्माला येऊनही बिचारा कालचुरी लक्ष्मी-कर्णाकडुन पराभुत झालेला राजा म्हणुनच लक्षात ठेवला गेला.देववर्मनचा पुत्र किर्तिवर्मनने मात्र ह्या घेऊन कालचुरींचा मोठा पराभव केला.

In reply to by पामर

पामर खूपच छान माहिती. आंधळ्याने एक डोळा मागावा आणि त्याला दोन डोळे मिळावेत तसा आनंद झाला माहिती वाचून. या निमीत्ताने अनुषंगिक अवांतर पृथ्वीराज चौहानांनी चंडेलांशी केलेल्या युद्धांची वर्णने आहेत असे दिसते त्या एवजी पृथ्वीराज चौहानांनी अफगाण सीमे कडे अधीक लक्ष दिले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती का ?

In reply to by माहितगार

भारताच्या इतिहासाचे हेच वैशिष्ट्य आहे.दरवेळी परकिय आक्रमक येत गेले आणि स्वकिय आपापसात लढ्ण्याच्या नादात लुटत गेले,मरत गेले,उद्ध्वस्त होत गेले,गुलाम होत गेले.

बर्‍याच दिबसांनी सांख्यिक कोटी बघायला मिळाले, मजा आली