Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] शिरा

लेखक तीरूपुत्र यांनी रविवार, 09/08/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,हे माझे मिपा वरील पहिले लेखन आहे म्हणून काही चूक झाल्यास क्षमा असावी. -----------------------------------------दुपार झाली आणि गणोबा ला खूप भूक लागली.सकाळी फक्त त्याने रात्रीची उरलेली अर्धी भाकर आणि वरण ऐवढच खालेलं होतं. "ओ बाबा मले लय भूक लागली हाय पोटामंदे मंगाणपासुन कावळे बोंबलत हाय." सखाराम ला पण खूप भूक लागली होती.म्हणून जेवण करण्यासाठी दोघे शेताच्या बांधावर बसले.आज चिंगीचा(मुलीचा) वाढदिवस आहे म्हणून त्याच्या अर्धांगिणीने शिरा बनविला होता. खूप दिवसा नंतर आज शिरा खायला मिळणार असल्यामुळे गणोबा खूप घाई करत होता.डबा उघडताचं काही सरकारी माणसे काहीतरी यंत्रे घेऊन त्याच्या जवाळ आली. एक जण बोलला " सखाराम तुमचं शेत धरणाखाली येणार". हे ऐकून सखाराम आणि गणोबाच्या घस्या खाली घास उतरत नव्हता.........

वाचने 4580
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

ईश्शशश!!! आलेच घासातले खडे!!! +१ ढिम्म यंत्रणेच्या निषेधासाठी!!!

धन्यवाद.

+१

+१ चांगला प्रयत्न आहे. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्या फक्त. मिपावर स्वागत. लिहित रहा. काही अडचण आल्यास कळवा.

मी विदर्भाचा असल्यामुळे काही वर्हाडी शब्द येऊ शकतात.जर मी शुद्ध लेखना मध्ये चूका करत असेल तर मला थोडी मदत करावी.प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by तीरूपुत्र

होउ द्यात चुका. चुकातुन शिका. :) कधीही मदत लागली तर साहित्य संपादक मंडळाकडे किंवा संपादक मंडळाशी संपर्क साधु शकता.

+१

+१ चांगला प्रयत्न. अवांतरः तुमचा आयडी तीरुपुञ असाच घ्यायचा होता का? कारण त्याचा उच्चार कसा ते कळत नाहीये. का "तीरूपुत्र" असा हवा होता? बदलून घ्या पाहिजे तर.

In reply to by तीरूपुत्र

तीरुपुत्र मधला त्र असा टंकतात. t आणि लगेच r=त्र शिफ्ट+Y दाबलत तर ञ मिळेल!! थोरल्या संपादक मंडळाला किंवा नीलकांत ना व्यनि करा. काम होईल.

+१

+१ ====> उत्तम कथा +१ =====> लिहायचा पहिलाच प्रयत्न असून देखील, विषयाची बर्‍यापैकी मांडणी.

+१

आवडली.

+१

वेलकम टू मिपा

+1

+१

+१ आवडली...

+१