दै.लोकसत्ता हे मराठीतील अग्रगण्य दैनिक आहे.लोकसत्ताची मराठी भाषा आणि इतर वृत्तपत्राची मराठी भाषा यात खुप फरक आहे.नियमित इतर वृत्तपत्रे आणि कधीकधी लोकसत्ता वाचणार्यांना लोकसत्ता वाचताना त्रास होतो असा अनुभव आहे. मी तर दै.लोकसत्ताला मत दिले आहे.कुमार केतकरांचे अग्रलेख हीच लोकसत्तेची जमेची बाजू तसेच लोकसत्तेतील स्तंभलेखनही छान असते.
दै.नवशक्ती हे छान आणि स्वस्त वृत्तपत्र आहे.यात महापालिका निविदा,नाव बदल,मालमत्ता ,इ.यांच्या जाहीराती जास्त असतात . रविवार चा नवशक्ती(पुरवणि-ऐसी अक्षरे रसिके) वाचनीय असतो.
दै.प्रहार हे नविन वृत्तपत्र खरोखरोच वाचनिय आहे.याचाही दर्जा उत्तम आहे.
दै.सकाळ राजकारणातील आतील बातम्यांसाठी उत्तम.याच्याही पुरवण्या चांगल्या असतात.
मटा सध्या फोटो अल्बम झाला आहे. याचे नविन संपादक कोण आहेत तेच कळत नाही.
नवाकाळ लॉटरी निकालासाठी घ्यावा.संध्याकाळ कोडी सोडविण्यासाठी .
सामना बाळासाहेबांच्या वाढदिवशी घ्यावा. उत्तम वाचण्यासारखे असते आणि कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
सम्राट नावाने दोन वृत्तपत्रे निघतात.एक वृत्तरत्न सम्राट आणि विश्वसम्राट.याविषयी न बोललेलेच बरे.
मराठी वृत्तपत्रांमध्ये सर्वात महागडे दैनिक म्हणजे संध्यानंद(रोज ४ रू.) यांत भविष्य,चटपटीत बातम्या यांवर जोर दिलेला असतो.
मटाचे आणि लोकमतचे संकेतस्थळ इतर वृत्तपत्रांच्या संकेतस्थळापेक्षा जलद आहे.रात्री १२ वाजल्यानंतर यांच्या संकेतस्थळांवर दुसर्या दिवसाची तारीख लगेच पडलीच पाहीजे.त्यामुळे आंतरजाळ आवृत्तीत मटाचा प्रथम क्रमांक लागेल.
सकाळची इतकी सवय झाली आहे म्हणून तो वाचावाच लागतो पण लोकसत्ता हे वृत्तपत्र सकाळपेक्षा उत्तम आहे ... लोकसत्ताही आवडीने वाचतो... घरात सकाळ आणि क्लिनिकला लोकसत्ता....( केतकरांच्या काँग्रेसधार्जिण्या अग्रलेखाच्या वाटेला न जाता)
______________________________ ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
आत्ताच सांगतो...उद्याचा सामना वाचा...खरंच मजा येणार वाचायला...का ते तुम्हा सुज्ञ लोकांना समजलेच असेल..( प्रहार पण वाचा म्हणजे अधिक गंमत येईल)
आणि लोकसत्ता..? त्यातील सुमार अग्रले़ख माझी मुलगी लहान होती त्यावेळी उपयोगाला यायचे..(सर्व लोकसत्ता अग्रलेख पंखा लोकांची क्षमा मागून हे लिहिण्याचे धाडस करतो..)
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत? डिस्क्लेमरः वरचं मत माझं नाही, पुणे-नाशिक महामार्गावर या जाहीराती वाचनात आल्या आहेत.
बातम्यांची वेबसाईट म्हणून म.टा.आवडतो, वर्तमानपत्र म्हणून सुरु झालंय तर रात्री बारालाच नवीन बातम्या देणार असा प्रकार तिकडे नसतो.
बाकी इतर अनेक बातम्या मिपावर वाचायलाही मजा येते. अग्रलेख आवडतात. तत्कालिक (स्टेट-ऑफ-द-आर्ट) वृत्तपत्र म्हणून महाजालावरच्या साईट्स नाही का चालणार यात?
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते. अजून पंखा नाही आहे कोणाचीच.
पुण्यात असताना सकाळ, पुढारी आणि सामना आवडीने वाचतो.
कोकणात गेलो तर रत्नागिरी टाईम्स , सागर अशी वृत्तपत्रे वाचतो. म.टा. मात्र फक्त ऑनलाईन वाचतो कारण फुकट असतो. :)
बाकी पुढारी हा प.महाराष्ट्रात सर्वाधिक खपाचा आहे.लोकमत वाल्यांकडे फुकटचा खुप पैसा असले मुळे कधी कधी ते महिनाभर १रुपयात त्याचे अंक विकतात. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक खप त्याचा आहे.लोकमत हे पुर्णपणे कॉग्रेसचे मुखपत्र म्हणुन महाराष्ट्रात काम करत आहे.त्यातल्या बातम्या वाचल्या की लक्षात येते कॉग्रेस मध्ये निष्ठावंत कोणास म्हणतात.सकाळ मध्ये देखिल बातम्या खुपच गुळमिळित असतात.सहसा त्यात सर्व काही राष्ट्रवादी पक्षाबद्दल चांगले लिहले जाते,त्याचे कारण सर्व जाणता.म.टा. व लोकसत्ता सहसा कोणत्याही राजकिय पक्षास हातभार लावत नाहित.पुरवणी म्हणाल तर म.टा.,लोकसत्ता,तरुण भारत व सकाळ ची चांगली असते.
वेताळ
ईसकाळ..
सामना राहिलाय साहेब..
पण जर सामना शिवसेनेचं मुखपत्र (आणि सामना मध्ये तस लिहिण्याची हिंमतही आहे..रोखठोक) तर लोकमत आणि लोकसत्ता कॉग्रेसचे मुखपत्र आहे.
लोकसत्ता!
कित्येक वर्षे म्हणजे वीसपन्चवीस वर्षापूर्वी माधव गडकरीन्च्या अग्रलेखान्करीता फक्त रविवारी लोकसत्ता घ्यायचो
कारण तेव्हा तिर्थरुपान्च्या राज्यात सकाळ वाचावा लागायचा
आमच्या राज्यात आम्हि लोकसत्ता लावला
अन घोळ झाला........ शिन्चा तो केतकर सम्पादक बनला अन घाऊकरित्या सोनियाभक्ती अन हिन्दुद्वेषाच्या पानचट लेखान्चा भडीमार करुन राहिला हे! एक्स्प्रेस ग्रुपला जेव्हा अक्कल येईल ती येवो, पण जोवर हा केतकर सम्पादकीय लिहितो अन त्याचे पित्ते इतर लेख लिहितात, तोवर लोकसत्तातली निवडक पाने नजरेआड करुन धाकटीला चिन्ध्या करायला द्यावी लागतात!
मी पुण्यातला, खरतर सकाळ घ्यायला हवा, नाही???? पण त्याची "नरोवाकुन्जरा" भुमिका आवडत नाही!
खर तर परुळेकरान्चा नि:पक्षपाती सकाळ राहिलाच नाहीये आता........ वरुन रुपडे तटस्थतेचे, अन आतुन मात्र साहेबान्ची भलामण!
बाकी पेपर फुकट मिळाले तर जरुर वाचतो! :)
प्रतिक्रिया
सकाळ ला मत
सकाळ ला मत दिले आहे.. सकाळ हा आमचा आवडता पेपर.
तात्या.
मत
In reply to सकाळ ला मत by विसोबा खेचर
सामना कुठे आहे?
नम्रता राणे.
आमची आवड लोकसत्ता.
लोकसत्ता ही माझी आवड आहे. शनिवार आणि रविवारची पुरवणी वाचणीय असते. त्याचबरोबर नवनीत हे सदरही चांगले असते.
लोकसत्ता,,,
लोकसत्ता,,,गेली अनेक वर्ष वाचतोय..
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
संध्यानंद
संध्यानंद आणि पोलिस टाइम्स!
एक नंबर........
In reply to संध्यानंद by आपला अभिजित
एक नंबर........
एऽऽऽकच नंबर...
In reply to एक नंबर........ by शक्तिमान
असेच म्हणतो...
लै लै भारी पेप्रं आहेत दोन्ही...
फुल्टू टैमपास :)
लोकसत्ता
लोकसत्ता आवडतो (त्यातील सोनिया भक्तीचे अग्रलेख सोडुन)
पुरवणी चांगली असते.
. ................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
https://picasaweb.google.co.in/zakasrao
मटा,
मटा, लोकसत्ता, पुढारी, ऐक्य, प्रभात चांगले आहेत.
याहु बातम्या सी. एन एन सुद्धा चांगले आहे.
लोकसत्ता
आधी मी सकाळचा पंखा होतो. पण सध्या सकाळचे स्वरुप ईंग्रजी जास्त व मराठी कमी झाले आहे. मटा बद्दल जितके कमी बोलू तेवढे बरे.
मोहन
सकाळ
सकाळ मला चांगला पेपर वाटतो. भारतात असताना तोच वाचत होतो, आत इथेही जालावर त्यालाच पसंती देतो.
बाकी पेपर विषयी जास्त न बोललेले बरे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
सामना कोठे आहे..?
सम्राट आणि प्रहार ची नावे घेता..
पण आपला 'सामना' कोठे आहे वरील यादीमध्ये...?
खादाडमाऊ
सकाळ कारण
सकाळ
कारण घरी तो एकमेव पेपर येतो. आणी हो त्यात वाचण्यालयक फक्त "चिंटु" हे सदर आहे !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
चिंटू लैच
In reply to सकाळ कारण by परिकथेतील राजकुमार
चिंटू लैच भारी असतं. चिंटू रॉक्स!!!
अर्थात सकाळ !!
पुण्यात होतो तेव्हा सकाळ..............
आता आहे ई- सकाळ....................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वृत्तपत्र
दै.लोकसत्ता हे मराठीतील अग्रगण्य दैनिक आहे.लोकसत्ताची मराठी भाषा आणि इतर वृत्तपत्राची मराठी भाषा यात खुप फरक आहे.नियमित इतर वृत्तपत्रे आणि कधीकधी लोकसत्ता वाचणार्यांना लोकसत्ता वाचताना त्रास होतो असा अनुभव आहे. मी तर दै.लोकसत्ताला मत दिले आहे.कुमार केतकरांचे अग्रलेख हीच लोकसत्तेची जमेची बाजू तसेच लोकसत्तेतील स्तंभलेखनही छान असते.
दै.नवशक्ती हे छान आणि स्वस्त वृत्तपत्र आहे.यात महापालिका निविदा,नाव बदल,मालमत्ता ,इ.यांच्या जाहीराती जास्त असतात . रविवार चा नवशक्ती(पुरवणि-ऐसी अक्षरे रसिके) वाचनीय असतो.
दै.प्रहार हे नविन वृत्तपत्र खरोखरोच वाचनिय आहे.याचाही दर्जा उत्तम आहे.
दै.सकाळ राजकारणातील आतील बातम्यांसाठी उत्तम.याच्याही पुरवण्या चांगल्या असतात.
मटा सध्या फोटो अल्बम झाला आहे. याचे नविन संपादक कोण आहेत तेच कळत नाही.
नवाकाळ लॉटरी निकालासाठी घ्यावा.संध्याकाळ कोडी सोडविण्यासाठी .
सामना बाळासाहेबांच्या वाढदिवशी घ्यावा. उत्तम वाचण्यासारखे असते आणि कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
सम्राट नावाने दोन वृत्तपत्रे निघतात.एक वृत्तरत्न सम्राट आणि विश्वसम्राट.याविषयी न बोललेलेच बरे.
मराठी वृत्तपत्रांमध्ये सर्वात महागडे दैनिक म्हणजे संध्यानंद(रोज ४ रू.) यांत भविष्य,चटपटीत बातम्या यांवर जोर दिलेला असतो.
कधी कधी
In reply to वृत्तपत्र by विकि
कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
हे वाक्य एकदम जबरी आहे... =)) =))
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
आणि
मटाचे आणि लोकमतचे संकेतस्थळ इतर वृत्तपत्रांच्या संकेतस्थळापेक्षा जलद आहे.रात्री १२ वाजल्यानंतर यांच्या संकेतस्थळांवर दुसर्या दिवसाची तारीख लगेच पडलीच पाहीजे.त्यामुळे आंतरजाळ आवृत्तीत मटाचा प्रथम क्रमांक लागेल.
लोकमत चा
लोकमत चा पर्याय नाही
हा पण चांगला पेपर आहे
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लोक म्हनतात
सामना पेपर नाही शिवसेनेचं मुखपत्र आहे.
सकाळ बरा
सकाळ बरा आहे
सामना बाबत बोलायला नकोच
मिडडे मधील
मिडडे मधील फोटो मराठीत असतात
मी तेच वाचतो
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
सकाळची
सकाळची इतकी सवय झाली आहे म्हणून तो वाचावाच लागतो पण लोकसत्ता हे वृत्तपत्र सकाळपेक्षा उत्तम आहे ... लोकसत्ताही आवडीने वाचतो... घरात सकाळ आणि क्लिनिकला लोकसत्ता....( केतकरांच्या काँग्रेसधार्जिण्या अग्रलेखाच्या वाटेला न जाता)
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
सकाळची
In reply to सकाळची by भडकमकर मास्तर
सकाळची इतकी सवय झाली आहे म्हणून तो वाचावाच लागतो
वर्तमानपत्र आणि सिगरेटच असच आसत.
सवय लागलेलाच ब्रांड बरा वाटतो.
दुसरा आला की ठसका लागतो.
सामना
कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
आत्ताच सांगतो...उद्याचा सामना वाचा...खरंच मजा येणार वाचायला...का ते तुम्हा सुज्ञ लोकांना समजलेच असेल..( प्रहार पण वाचा म्हणजे अधिक गंमत येईल)
आणि लोकसत्ता..? त्यातील सुमार अग्रले़ख माझी मुलगी लहान होती त्यावेळी उपयोगाला यायचे..(सर्व लोकसत्ता अग्रलेख पंखा लोकांची क्षमा मागून हे लिहिण्याचे धाडस करतो..)
खादाडमाऊ
महाराष्ट्
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत?
डिस्क्लेमरः वरचं मत माझं नाही, पुणे-नाशिक महामार्गावर या जाहीराती वाचनात आल्या आहेत.
बातम्यांची वेबसाईट म्हणून म.टा.आवडतो, वर्तमानपत्र म्हणून सुरु झालंय तर रात्री बारालाच नवीन बातम्या देणार असा प्रकार तिकडे नसतो.
बाकी इतर अनेक बातम्या मिपावर वाचायलाही मजा येते. अग्रलेख आवडतात. तत्कालिक (स्टेट-ऑफ-द-आर्ट) वृत्तपत्र म्हणून महाजालावरच्या साईट्स नाही का चालणार यात?
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते. अजून पंखा नाही आहे कोणाचीच.
सर्वाधिक खपाचा कोण??
In reply to महाराष्ट् by ३_१४ विक्षिप्त अदिती
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत?
मी तर लोकमत सर्वाधिक खपाचा असे त्यांच्या जाहिरातींवरुन समजून आहे. नेमके कोणते वृत्तपत्र सर्वाधिक खपाचे आहे?
आपला,
(गोंधळलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
वर्तमानपत
In reply to महाराष्ट् by ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
यालाच माध्यमाचा परिणामकारक वापर असं म्हणत असावेत.
मी स्वतः
In reply to महाराष्ट् by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते
बाकीची वृत्तपत्रे कोण वाचुन दाखवते?
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
मी स्वतः
In reply to मी स्वतः by विजुभाऊ
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते
बाकीची वृत्तपत्रे कोण वाचुन दाखवते?
=))
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
बाकीची
In reply to मी स्वतः by भडकमकर मास्तर
बाकीची वृत्तपत्रे कोण वाचुन दाखवते?
काही दुष्ट लोकं मला इतर पेप्रांच्या लिंका पाठवतात आणि मी अनवधानाने (ओ.सी.डी.?) त्यावर क्लिक करते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत?
बरोबर आहे.
ह्या यादीत काटाकिर्र पुढारीचे नाव असायलाच पाहिजे च्यामारी.
कुठे आहेत कोल्हापुरी मिपाकर? जबरी संधी आहे नवीन चर्चा सुरु करायला.
आपलं मत सकाळला!
चतुरंग
सकाळची सवय
In reply to आपलं मत सकाळला! by चतुरंग
सवयीचा इसकाळ
अर्रे वा!
अर्रे वा! आमचा सकाळ सर्वात आधाडीवर आहे! :)
पुण्यात
पुण्यात असताना सकाळ, पुढारी आणि सामना आवडीने वाचतो.
कोकणात गेलो तर रत्नागिरी टाईम्स , सागर अशी वृत्तपत्रे वाचतो. म.टा. मात्र फक्त ऑनलाईन वाचतो कारण फुकट असतो. :)
पुण्याचे पेशवे
लोकसत्ता
लोकसत्ता चे अग्रलेख सोडले तर बाकी सर्व लेख चान्गले असतात. खास करून लोकसत्तेच्या शनिवार आणि रविवार च्या पुरवण्या तर खरोखर वाचनीय असतात.
मात्र हल्ली पानांची संख्या रोदावत चाल्लीय याचं फार वाईट वाटतं.
स्वानंद
In reply to लोकसत्ता by स्वानन्द
मात्र हल्ली पानांची संख्या रोदावत चाल्लीय याचं फार वाईट वाटतं. नाही हो तुम्हाला कोणी सांगितले.पान आहे तेवढीच आहेत.फक्त सोमवारी कमी बातम्या असतात.

लोकसत्ता ,सकाळ व म.टा. छान आहेत
बाकी पुढारी हा प.महाराष्ट्रात सर्वाधिक खपाचा आहे.लोकमत वाल्यांकडे फुकटचा खुप पैसा असले मुळे कधी कधी ते महिनाभर १रुपयात त्याचे अंक विकतात. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक खप त्याचा आहे.लोकमत हे पुर्णपणे कॉग्रेसचे मुखपत्र म्हणुन महाराष्ट्रात काम करत आहे.त्यातल्या बातम्या वाचल्या की लक्षात येते कॉग्रेस मध्ये निष्ठावंत कोणास म्हणतात.सकाळ मध्ये देखिल बातम्या खुपच गुळमिळित असतात.सहसा त्यात सर्व काही राष्ट्रवादी पक्षाबद्दल चांगले लिहले जाते,त्याचे कारण सर्व जाणता.म.टा. व लोकसत्ता सहसा कोणत्याही राजकिय पक्षास हातभार लावत नाहित.पुरवणी म्हणाल तर म.टा.,लोकसत्ता,तरुण भारत व सकाळ ची चांगली असते.
वेताळ
माफी द्या
पुढारीचं नाव नजरचुकिनं राहुन गेल्ल.
अद्यापही
अद्यापही सकाळ पुढेच! तरीही पुढारी, लोकमत, आणि सामना हे पेपर कौलामध्ये का नाही ठेवले गेले?
तात्या.
सकाळ
ईसकाळ..
सामना राहिलाय साहेब..
पण जर सामना शिवसेनेचं मुखपत्र (आणि सामना मध्ये तस लिहिण्याची हिंमतही आहे..रोखठोक) तर लोकमत आणि लोकसत्ता कॉग्रेसचे मुखपत्र आहे.
लोकसत्ता...
लोकसत्ता...
लोकसत्ता...
प्र.का.टा.आ
स ह का ह ळ ह च ह...
माझ्या आवडीचा
स ह का ह ळ ह चंह...
सकाळ घरी
सकाळ घरी येतो त्यामुळे वाचणे होतेच.
तसे काँग्रेसधार्जिणे लेख सोडले तर मटा आवडतो.
मुमुक्षु
लोकसत्ता! क
लोकसत्ता!
कित्येक वर्षे म्हणजे वीसपन्चवीस वर्षापूर्वी माधव गडकरीन्च्या अग्रलेखान्करीता फक्त रविवारी लोकसत्ता घ्यायचो
कारण तेव्हा तिर्थरुपान्च्या राज्यात सकाळ वाचावा लागायचा
आमच्या राज्यात आम्हि लोकसत्ता लावला
अन घोळ झाला........ शिन्चा तो केतकर सम्पादक बनला अन घाऊकरित्या सोनियाभक्ती अन हिन्दुद्वेषाच्या पानचट लेखान्चा भडीमार करुन राहिला हे! एक्स्प्रेस ग्रुपला जेव्हा अक्कल येईल ती येवो, पण जोवर हा केतकर सम्पादकीय लिहितो अन त्याचे पित्ते इतर लेख लिहितात, तोवर लोकसत्तातली निवडक पाने नजरेआड करुन धाकटीला चिन्ध्या करायला द्यावी लागतात!
मी पुण्यातला, खरतर सकाळ घ्यायला हवा, नाही???? पण त्याची "नरोवाकुन्जरा" भुमिका आवडत नाही!
खर तर परुळेकरान्चा नि:पक्षपाती सकाळ राहिलाच नाहीये आता........ वरुन रुपडे तटस्थतेचे, अन आतुन मात्र साहेबान्ची भलामण!
बाकी पेपर फुकट मिळाले तर जरुर वाचतो! :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

लोकसत्ता
लोकसत्ता आणि मटा
माझ्या मते
माझ्या मते लोकसत्ता उत्तम आहे.