मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] गणू

बबन ताम्बे · · स्पर्धा
"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात." "बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई. "पण मीच का जाड? " "ते देवाच्या हातात असतं बाळा.” आईनी गणूची कशीबशी समजूत काढली. संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.” "अरे वा! आता देवावर राग नाय ना तुझा? " "नाय" असे म्हणून गणूने दप्त्तर फेकले आणि आळीतल्या मित्रांना सुवार्ता सांगायला धूम ठोकली.

वाचने 13628 वाचनखूण प्रतिक्रिया 44

जडभरत Fri, 08/07/2015 - 19:36
+१ मी पयला!!! मस्तच बबनराव खूप मस्त!!! आणि ते गाणं पण खूप मजेशीरंय!!! ;)

नीलमोहर Fri, 08/07/2015 - 20:00
+१ यासाठी :) "गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती"

चौथा कोनाडा Fri, 08/07/2015 - 23:55
फस्सकन हसु आले "गण्या गणपति हे बालपणीचे फेव्हरेट चिडवाचिडवी सॉंग चाली सकट डोक्यात वाजायला लागल्यामुळे .... ! बबनराव,, भारीय तुमचा गणु ! नाटकात राजा च्या रोलसाठी सिलेक्ट झाल्यामुळे शेलिब्रेटीच ! गण्याची सरस्वती सोबतची काही टाईमपास "स्टोरी "असलतर सिक्वेल नक्की टाका !

स्रुजा Sat, 08/08/2015 - 01:52
गाणं काय भारी आहे, हाहा +१

जुइ Sat, 08/08/2015 - 02:40
कथा आवडली!

पैसा Sat, 08/08/2015 - 09:04
+१ मस्त आहे कथा!

नाखु Sat, 08/08/2015 - 09:17
आवडली."बाळ्सेदार" कथा !!!!

जगप्रवासी Sat, 08/08/2015 - 12:36
+१ लहानपणी सर्वांनी चिडवलेला ढेरपोट्या गणपती (जगप्रवासी)

सौंदाळा Sat, 08/08/2015 - 12:46
+१ लहान मुले नादिष्ट असतात. श्रावणातल्या ऊन-पावसाप्रमाणे त्यांचे मुड झरझर बदलतात. १०० शब्दात मस्तच टिपलं हे