Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया!

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 07/08/2015 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी! बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२." शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!" धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला. पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली." म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!

वाचने 15737
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

+१

छान

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

पहिलाच प्रयत्न होता! सर्वांचे खूप आभार!

+१

+1

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

In reply to by उगा काहितरीच

ब-याच सरकारी शाळा विशेषत: ग्रामीण भागातल्या शाळांमधून बसण्यासाठी सतरंजी टाईप अंथरूण असायचे त्याला बस्कर म्हणायचे आणि लांबच्या लांब पट्ट्यांसारख्या असायच्या म्हणून 'बस्करपट्टी!' प्रतिसादासाठी धन्यवाद. अवांतर : तुमचे प्रतिसाद ब-याचदा तुमच्या आयडीचे सार्थक करतात (कृ. ह. घ्या)

In reply to by चांदणे संदीप

अवांतर : तुमचे प्रतिसाद ब-याचदा तुमच्या आयडीचे सार्थक करतात (कृ. ह. घ्या)
भाऊ , त्यासाठीच तर असा आयडी घेतला आहे की . रच्याकने तुमच्या कथेसाठी +१ .

+१

+१

+१ आवडली कथा!

+१ बस्करपट्टी माहीत नव्हते. कळाले आता.

+ १

+१

+1

+1

+१

सा सं चे विशेष आभार वाचक लिहिते झाले. साचलेपण की साच लेपण या वादात न पडणारा मुकाट वाचक नाखु.

+१

बस्करपट्टी नवीन शब्द समजला

+१

+१

छान कथा..

+१

+१

मस्त ...काय लिहू ? आरसा दिसला एवढेच म्हणीन .

म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना! अरेरे ! छान कथा !

+१

+1

+१

+1

+१

+१

मस्त कथा!

+१

+१

च्यामारी... माझाच डुआयडी आहे का काय? असाच काहीसा अनुभव अस्मादिकांस आहे. वर्षही तेच आणि कथानायकाचे नावही. दहा दिवस मागे लागून आमच्या बा नं आम्हाला दोन रुपये दिधले. रंगभरा स्पर्धा. चित्रकलेत शाळेत एक नंबर असुन स्पर्धेत आलो नाही. कारण... असो. अशा अनेक घटनांचे मनावरचे वळ आणि व्रण आठवलेत..... :-(

मिपावरच्या माझ्या पहिल्याच प्रयत्नाने अर्धशतकाची मजल गाठल्याने आनंद होत आहे. मिपावर चांगल्या लेखनाला नाउमेद केले जात नाही उलट बळ दिले जाते हे मिपाकर वरचेवर दाखवून देतात त्याचाच हा दाखला! सर्व मिपाकरांचे धन्यवाद! @संदीप डांगे : हा हा! डुआयडी वगैरे प्रकार आताआता कळायला लागलेत, मिपावर आल्यापासून. अस काही करण्याची गरजही वाटत नाही! तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!

In reply to by चांदणे संदीप

माझा प्रतिसाद तुम्हाला कळला नाही याबद्दल क्षमस्व. एकाच सदस्याने एकापेक्षा जास्त आयडी घेतले तर तो डुआयडी. एका सदस्याचा डुआयडी दुसरा सदस्यनसतो. माझ्या विधानाचा अर्थ एवढाच होता की हा जणू माझाच अनुभव आहे. फक्त स्पर्धा रंगभरा आहे, माय ऐवजी बापास पैसे मागितले इतकाच फरक. आपले नाम-साधर्म्य तर आहेच त्यात सुज्ञांस काय अज्ञासही सहज कळण्यासारखे आहे. बाकी, तुम्ही कुठल्ले बाप्पा?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही कुठले? अस मला कुणी विचारलं की मला अवघडल्यासारखच होत. याच कारण म्हणजे…. १. जन्म नागपूरचा! २. बालपण पंजाबातल….(यत्ता दुसरीपर्यंत मराठीच येत नव्हत बोलायला!) ३. गाव सोलापूर जिल्ह्यातलं! ३. कर्मभूमी पुण्यनगरी! ४. स्वतःचे घर घेतल्यामुळे आता पुणेकर! डूआयडी वैग्रे जौद्या हो. मलाही खूप आनंद झाला खरे तर तुमच्या अनुभवाशी बंध जोडून! महाराष्ट्रात जन्म मिळाल्यामुळे धन्य झालेला…. Sandy (हे नाव मित्रांनी केलेल आणि मी टिकवलेल!)

+१

+1