Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] हाक !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 06/08/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
"अंबामाय वाचवं गं माझ्या लेकराला....अहो आई बोलवा ना गजाननाला!!...सगळे शांत का बसलेत ?कोणी काहीच कसं करत नाही..डॉक्टरसुद्धा म्हणाले घरी घेऊन जा त्याला..आता काहीच होऊ शकत नाही..देवा काय करू मी आता? कुठून अवदसा आठवली अन होटेलात जेवायला गेलो आज..माझं लेकरू टेबलापाशीच खेळत होतं..थोडं दुर्लक्ष झालं..बगीच्यातली पाण्याची टाकी दिसली त्याला..गेला हो धावत तिकडे नी पाय घसरला..दोन-तीन मिनिटे पाण्याच्या तळाशी होता..ह्यांनी उडीच मारली त्याला बाहेर काढायला...शुद्ध हरपलीये त्याची..श्वास सुरु आहे फक्त.. सगळे नातेवाईक जमलेत..ह्यांची अवस्था तर बघवत नाहीये..शून्यात बघतायेत कुठेतरी..फार जीव हो त्यांचा लेकरावर. ऐ बाळा..उठ ना रे..रोजच्यासारखी हाक मार ना मला......" तेव्हढ्यात एक आवाज आला.. "आई...........आई!" (सत्यकथेवर आधारित)

वाचने 5180
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

+१ पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता जागी झाली आहे !

+१

आई आई हाक कुठून आली याचा काहीच बोध झाला नाही आधी, मग आठवले ईथेही सिक्वेल प्रकरण असावे.. अश्यावेळी +१ द्यावे की नाही अजूनही कन्फ्यूज .. मात्र उत्सुकता चाळवणारे असल्याने द्यावाच :)

+१

+१

+१

ना असा नाही सोडणार वाचकांना !!! कथेला +१

In reply to by चिनार

आहे वाचकाच्या (डोक्यात) भुंगा सोडायची म्हणून म्ह्टलं बाकी काही नाही ! खुलासेदार नाखु ता.क. बरेच दिवसात एक दिवस @@@वाला पुढील भाग आला नाही ह्याची नम्र आठवण

In reply to by नाखु

'डुआयडी घेऊन मिपावर एक दिवस ' असं काहीतरी लिहाव म्हणतो. पण त्यासाठी कोणाचा आणि कोणता अवतार घ्यावा हे सुचत नाहीये काका..

+१

+१

+१

झक्कास!! (आनंददायी कलाटणी)

+१

+१ मुलगा जिवंत असेल अशा अपेक्षेने गुण देतो. जिवंत ठेवा बाबा त्याला. अनेकांनी शशक मधून अगदी अगदी भयानक शेवट निर्माण केलेले आहेत.

In reply to by जडभरत

+१

In reply to by जडभरत

मुलगा जिवंत असेल अशा अपेक्षेने गुण देतो. जिवंत ठेवा बाबा त्याला. अनेकांनी शशक मधून अगदी अगदी भयानक शेवट निर्माण केलेले आहेत.> +११

+१

+१

+१

+१

+१

+१

सीक्वल मध्ये मुलगा जिवंत ठेवणे या अटीवर +१ :)

+१

+१

काहीही अट न ठेवता..

In reply to by मी-सौरभ

लेखकाला काहीही अट नाही :) :)

+१

+१

+१

+१