Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] शाळा

लेखक सटक यांनी गुरुवार, 06/08/2015 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
ही काय पद्धत आहे लोकांशी वागण्याची? श्वेतांबरा बाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता. भितीने जणू अद्रुश्य झाला तो.. काय केले होते त्याने? एका छोट्याश्या मुलीला ती हरवलेली असताना मदत केली होती. बाईंचा तास सोडून... त्यांची शाळा होतीही तशी मोठी..सरदारांच्या वाड्यातच भरायची. कोपर्यात बसून रडणार्या त्याला बाई समजावू लागल्या..हे बघ, शाळेचे काही नियम आहेत ते पाळायला नकोत का? वेताळे गुरुजींना कळले तर तुझे काही खरे नाही! तुला आवडली की नाही ती मुलगी? "हो"! मग ती इथे यायला हवी की नाही? "हो"! मग तिने वाड्यात हरवायला नको का??? त्याच्या चेहर्यावर मंद हसू पसरले...श्वेतांबरा बाईंच्या खोबण्याही आसुरी लाल प्रकाशानी उजळून निघाल्या...

वाचने 4089
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

समजायला २-३ वेळेस वाचावी लागली. शेवट पुरेसा थरारक नाही. शाळेतला मुलगा म्हटले तर फार तर १० -१२ वर्षाचा मुलगा वाटतो. "तुला आवडली की नाही ती मुलगी?" या ऐवजी "तुला तुझी मैत्रीण इथे रोज भेटायला हवी का नको?" असे करून पहा. 'श्वेतांबरा ' ऐवजी नुसतेच 'श्वेता' ठेवा.

+१

.

+१

+१ ते विषकन्यावाले तुम्हीच का हो? :) :) असो पण मस्त ट्विस्ट आहे. २-३ वेळा वाचल्यावर कळली.

+१

आवडली +१

+१

बादवे +१

सर्व प्रतिसादांबद्दल आभारी आहे! अनंत अवधूत, श्वेतांबरा नावाची सिरीअल ही मी बघितलेली पहिली गूढ मालिका होती. त्याच्या Title Music ची भिती वाटल्याचे अजून आठवणीत आहे! म्हणून श्वेतांबरा हे नाव घेतले. मुलगा लहानच आहे...आता लहानग्यांनाही आवडी-निवडी असतात....तरी तुम्ही म्हणताय तसे केल्याने शब्दम्रर्यादा ओलांडली जाते! :( अवांतरः एकसलग लिहिल्याने समजायला कठीण झाली आहे काय?

In reply to by सटक

त्याच्या Title Music ची भिती वाटल्याचे अजून आठवणीत आहे! म्हणून श्वेतांबरा हे नाव घेतले. नेटवर कुठे दुवा असेल तर कृपया इथे उपलब्ध करून द्या सगळ्यांना. मला पण असं काहीतरी ऐकल्याचं आठवतंय. पण फारसं नाही.

In reply to by जडभरत

मी ही ह्या मालिकेच्या बाबतीत आंजावर खुप शोधले पण काहीच हाती लागले नाही. फक्त नावात साम्य म्हणुन एक चेंबुरची कोणी नगरसेविका श्वेतांबराची माहिती समोर येते. त्याकाळी ही मालिका खुप गाजली होती. जी चे Title Music खुप गुढ होते. त्यावेळी सर्वांकडे दुरदर्शन संच नव्हते म्हणुन. आम्हीही शेजारी पहायला जायाचो. तेव्हा रस्याने येताना घाबरायला व्हायचे. कोणाकडे त्याचे सलग भाग रेकॉर्ड केलेले आहेत काय?

In reply to by सनईचौघडा

Correct! मी असेही वाचले की त्याचे Title Music, Shaft ह्या चित्रपटाच्या theme वर बेतलेले आहे. तेही ऐकून पाहिले पण तसे नाही वाटले..

+१

+१

जबराट!!

२ -३ वेळा वाचल्यावर कळली...

+१

मस्त !! +१

+१