Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] अर्थस्य पुरुषो दासः

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/08/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल पण परत सतराव्यांदा का अठराव्यांदा त्यांचा फोन आला.तसा तो गेल्या आठवड्यापासून येत होताच.पण गेले ३-४ दिवस मात्र त्याची वारंवारता वाढली होती. त्यांच्या राज्यातील, आमच्या नविन कामासाठी, त्यांचे पण काही मजूर घ्यावेत, अशी त्यांची विनंती होती. हप्ता हेच त्या मागचे खरे कारण. शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष लावावा असा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर आजची भेट नक्की केली. मजूर आम्हाला नकोच होते पण त्यांना काहीतरी चिरीमिरी द्यायलाच लागणार होती.ते माझ्याच जाती-धर्माचे असल्याने, कंपनीने तडजोडीची जबाबदारी माझ्यावरच सोपवली. हो नाही करता, ५०,०००/- रु. प्रति महिना असा हप्त्याचा दर ठरला आणि आम्ही दोघेही म्हणालो."ABCDEFG."

वाचने 5286
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

चांगलय. (अवांतर-गल्ली चुकली की ओ..काथ्याकुट?)

+१

निदान मला तरी झेपली नाही. +१ देता येत नाहीये, पण म्हणून -१ ही देणार नाही. स्पर्धेच्या अनुषंगाने मी तटस्थ राहू इच्छितो.

In reply to by अन्या दातार

साहजीक आहे. अद्याप तुम्हाला परप्रांतातील, हप्ता आणि जातीय राजकारणाचा अनुभव आला नसल्यास, तुम्ही खरोखरच सुदैवी आहात. मला आलेले अनुभव, तुम्हाला यायलाच हवेत, असे थोडीच आहे.

In reply to by मुक्त विहारि

हप्ता आणि जातीय राजकारण माहित आहे. पण शेवटची वाक्यरचना वाचता अर्थबोध नाही झाला म्हहणून कळली नाही

+१

In reply to by प्यारे१

त्यामुळे, ज्या व्य्क्तींना, अशा अनुभवांचा सामना करायला लागला नाही, त्यांना कथा समजणे, जरा कठीणच आहे. दोष तुमचा नसून, मी चपखल शब्दांत अनुभव मांडू शकलो नाही, त्याला आहे. २-४ दिवसांत, सुयोग्य शब्दांत खुलासा करीन.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

छगनलाल हे वेगळेच रसायन आहे. एकतर, छगनलाल अशा ठिकाणी काम करायला जाणार नाहीत. आणि गेलेच तर जास्त पैशात काम स्वीकारले असते किंवा हप्ता देवून, त्या हप्त्याच्या तिप्पट रक्कम बिलात लावली असती. वैयक्तिक अनुभव =====> अशा बर्‍याच छगनलालांकडे काम केल्यामुळे, अशा माणसांशी व्यवहार करणे जड जात नाही.

+१

+१

+१

+१

शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष लावावा असा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर आजची भेट नक्की केली.
सोक्षमोक्ष लावणे म्हणजे तडजोड होय.. अच्छा... असे असेल तर *मचा एकदा सोक्षमोक्ष लावावा म्हणतो ? काय बोलता ?

In reply to by मुक्त विहारि

जेंव्हा सोक्षमोक्ष लावायचा विचार कथापात्राने केल्याचे लिहले आहे तेंव्हा प्रकरण संपवले जाइल असा कयास होता त्या ऐवजी सोक्षमोक्षाची तयारी म्हणजे मांड्वलीची तयारी असे कथासुत्र दर्शवत आहे हा मोठा विरोधाभास होय... असो, बाकी कोणाला काय समजावे हे सांगायचा मला अधिकार नाही मी फक्त माझे निरीक्षण नाँदवले.

+१

+१!

+१

+१ (यावरुन एक मोहठी कथा येवदे.)+१

+१

+१ फुकटचा हप्ता? यापेक्षा काम तरी करून घ्यायचे ना त्यांच्याकडून!

+१