मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] हेल्पिंग हँड

स्वामी संकेतानंद · · स्पर्धा
सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे. त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि आपापल्या गेटकड़े वळले. तो अचानक थबकून, उगाच बैगमध्ये शोधाशोध करत थांबलेल्या तिच्याकडे वळला. " आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?" " पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?" " I think you need a helping hand stopping your hand from changing songs." ती चमकून बघतच राहिली.

वाचने 10714 वाचनखूण प्रतिक्रिया 62

नाखु गुरुवार, 08/06/2015 - 09:54
हातासरशी हातचलाखी आवडली.

प्यारे१ गुरुवार, 08/06/2015 - 12:53
+१ (स्वाम्या, कुठवर आलं प्रकरण?)

तुडतुडी गुरुवार, 08/06/2015 - 12:59
का हो मराठी येत नै का तुम्हाला आणि तिला पण ? कशासाठी विनाकारण हिंदी आणि इंग्लिश च्या कुबड्या ? मराठीत बोलायचं असतं हेच विसरतो का आपण ? त्या संभाषणासाठी निषेध

In reply to by तुडतुडी

चिगो गुरुवार, 08/06/2015 - 16:08
त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि
म्हणजे करोल बाग़ला उतरणार्‍यांनापण मराठी आलंच पाहीजे काय? आणि मराठी कथेत नायक/नायिका हिंदी-इंग्रजीत बोलूच शकत नाही का? हा नियम ठाऊक नव्हता, ब्वॉ.. अवांतर : विदर्भात / नागपुरात मराठी पोरं-पोरी बिनधास्त आपापसांत हिंदीत बोलतात आणि तरीही त्यांच्या 'मराठीपणा'ला कसलीही बाधा येत नाही.. (वैदर्भीय) चिगो

In reply to by चिगो

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/06/2015 - 16:27
मिसळपावचा बॅनर एकवार नीट वाचावा !

मराठी अंतरंग ... मराठी अभिव्यक्ती !

मराठीमध्ये चर्चा करण्याचे संकेतस्थळ. उगाचच काय स्वमतांध दांभिकता :-\ किमान मुद्दा तरी योग्य पकडा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चिगो गुरुवार, 08/06/2015 - 17:05
'टर्म' आवडली.. 'करोल बाग'वाल्यांनी मराठी का बोलावी, हे कळवाल का? 'लोकल'च्या गर्दीत ही गोष्ट घडणे लेखकाला कल्पनेतही शक्य वाटली नसल्याने दिल्लीत गेले असावेत. (हिंदी बोलणारा स्वमतांध दांभिक मराठी वैदर्भिय) चिगो..

तुडतुडी गुरुवार, 08/06/2015 - 16:19
एकाने बोललं कि सगळ्यांनी तसच करायला हवंय का ? विदर्भ , नागपुर हे सुधा महाराष्ट्रातच येतं . करोल बाग असो नै तर फिरोल बाग असो . ते ठिकाण महाराष्ट्रात येत असेल तर हो . मराठी यायलाच पाहिजे . दुसरं म्हणजे तुम्ही मराठी संकेतस्थळावर कथा लिहित आहात . एखाद दुसरं वाक्य चालू शकतं कि दुसर्या भाषेतलं . नाही कोण म्हणलंय . आणि मी तुमच्या कथेचा निषेध केला नाहीये . त्यातल्या संभाषणाचा केला आहे

प्यारे१ गुरुवार, 08/06/2015 - 16:28
>>>" आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?" तुला कुठलंच गाणं पूर्ण एकता येत नाही का गं टवळे? >>>" पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?" काय करु, हाताला काहीतरी चाळा हवा असतो ना???? चुकीचंय नै? >>>>>" I think you need a helping hand stopping your hand from changing songs." उलट्या हाताची एक चापट बसली की कळेल का???? मराठी अभिव्यक्ती. आपली बोली, आपला बाणा!

कपिलमुनी गुरुवार, 08/06/2015 - 18:10
कथा मस्तच ! बाकी उगीच मराठीच्या नावाने गळे काढणार्याम्चा णीषेढ

द-बाहुबली गुरुवार, 08/06/2015 - 19:12
शतशब्द कथा(?) प्रकारात कथा न्हवे फक्त प्रसंग बसु शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं... प्रसंग आवडला.

In reply to by द-बाहुबली

स्वामी संकेतानंद गुरुवार, 08/06/2015 - 19:24
मलाही तसेच वाटते. कथा लिहीणे अगदीच अशक्य नाही, विशेष प्रयत्न पाहिजेत. साध्यातरी माझ्याने प्रसंग लिहीणेच झाले.

स्वामी संकेतानंद गुरुवार, 08/06/2015 - 19:19
वर तुडतुडी आणि प्रगो ह्यांनी भाषेचा मुद्दा उपस्थित केलाय त्याला उत्तर द्यावेसे वाटते. कथा दिल्लीत घडत असल्याने दोन अनोळखी तरुणांच्या संवादाची सुरुवात नैसर्गिकपणे हिंदी किंवा इंग्रजीतच होईल. मराठीत कसे शक्य आहे? खरं सांगायचं तर तिथे हिंदीही आली नसती. माझ्याशी इकडे दिल्लीत पहिलंवहिलं वाक्य हिंदीत बोलणारी मुलगी आठवत नाही. थेट इंग्रजीत सुरु होतात. पुढे बरीच ओळखपाळख झाली की हिंदीवर येतात.( माह्यासारख्या इदर्भाच्या गावठी पोट्टयाले हे बम मुश्किल जाते न बाप्पा!) आणि कथेत नैसर्गिकता यावी म्हणून संवादांमध्ये हिंदी आणि इंग्रजीची मुबलक पखरण करणे हे मुंबईकर व. पु. काळेंपासूनच शिकलो बरं. त्यांच्या कथाकादंबरयांतली मराठी पात्रे इंग्रजी वाक्ये फेकताना पाहून तुम्ही नक्कीच त्यांना निषेधाचे खरामरीत पत्र पाठवले असणार ह्यात शंकाच नाही. ( सॉरी वपु, तुम्हाला इथे खेचले.) मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालोय तिथे भाषेचा आग्रह-दुराग्रह कधीच नव्हता, अजूनही नाही. लहानपणापासून आम्हाला एकाच घरात १० माणसे जमली की तीन भाषा ऐकू येत आहेत. आम्ही भराभरा, कधीकधी वाक्यागणिक भाषा बदलतो.मी माझ्या या संस्कतीवर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे माझ्या कथांमधली पात्रे २-३ काय ४-५ भाषा बोलत असली तरी मला ते खूप नैसर्गिक वाटते. माझ्यासाठी जे नैसर्गिक आहे ते तुमच्यासाठीही नैसर्गिक असावे असा आग्रह नाही. पण भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कथेला सीक्वल आहे. तेव्हा दोघांचा संवाद हिंदी आणि इंग्रजीत ठेवून मी कथा ओपन एंडेड ठेवली असे तुम्हाला का वाटत नाही? :)

In reply to by स्वामी संकेतानंद

भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे.
अब रुलायेगा क्या पगले !! देख भाई , मै संपादक मंडळ के लाडके ग्रुप मे नही हुं , दोडके ग्रुप मे हुं , इसिच वजह से वह मेरी तक्रार सुन रेले नई ! वैसे इदर ये क्या लिधा तुने वाच्या हय क्या
५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे.
सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. http://www.misalpav.com/beforesignup.html इसिलिये मै बोल्या तेरेकु ! मेरा क्या जाता हय , किसि भी जुबान मे बोल ना भाई तु ! अपुन को अच्छाईच लगेगा ! =))

पैसा गुरुवार, 08/06/2015 - 19:24
+१ ऐड्या आवडली. शो स्वीट!

विवेकपटाईत गुरुवार, 08/06/2015 - 19:52
सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा करोलबाग स्टेशन पाहतो. बघू सापडेल का ती अर्धवट गाणी ऐकणारी, ३० वर्षे पूर्वीचा काळ असता तर मी निश्चित तिला मदत केली असती गाणे ऐकण्यासाठी - हम आपके हैं कौन ?? +++ 1