Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] हेल्पिंग हँड

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 06/08/2015 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे. त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि आपापल्या गेटकड़े वळले. तो अचानक थबकून, उगाच बैगमध्ये शोधाशोध करत थांबलेल्या तिच्याकडे वळला. " आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?" " पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?" " I think you need a helping hand stopping your hand from changing songs." ती चमकून बघतच राहिली.

वाचने 10742
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

+1

+१

+1

+१

.

+१

नोप्प

+१

+१

+१

हातासरशी हातचलाखी आवडली.

+१

+१

+१

+१ मस्तच

+१ (स्वाम्या, कुठवर आलं प्रकरण?)

In reply to by स्वामी संकेतानंद

:) चलो हमने मान लिया, जाओ ऐश करो! ;)

का हो मराठी येत नै का तुम्हाला आणि तिला पण ? कशासाठी विनाकारण हिंदी आणि इंग्लिश च्या कुबड्या ? मराठीत बोलायचं असतं हेच विसरतो का आपण ? त्या संभाषणासाठी निषेध

In reply to by तुडतुडी

अनुमोदन ! कथा मराठीतच असावी ही नम्र विनंती . इथे निम्म्या पेक्षा जास्त शब्द हिंदी / ईम्ग्रजी आहेत !

In reply to by तुडतुडी

त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि
म्हणजे करोल बाग़ला उतरणार्‍यांनापण मराठी आलंच पाहीजे काय? आणि मराठी कथेत नायक/नायिका हिंदी-इंग्रजीत बोलूच शकत नाही का? हा नियम ठाऊक नव्हता, ब्वॉ.. अवांतर : विदर्भात / नागपुरात मराठी पोरं-पोरी बिनधास्त आपापसांत हिंदीत बोलतात आणि तरीही त्यांच्या 'मराठीपणा'ला कसलीही बाधा येत नाही.. (वैदर्भीय) चिगो

In reply to by चिगो

मिसळपावचा बॅनर एकवार नीट वाचावा !

मराठी अंतरंग ... मराठी अभिव्यक्ती !

मराठीमध्ये चर्चा करण्याचे संकेतस्थळ. उगाचच काय स्वमतांध दांभिकता :-\ किमान मुद्दा तरी योग्य पकडा !

In reply to by प्रसाद गोडबोले

'टर्म' आवडली.. 'करोल बाग'वाल्यांनी मराठी का बोलावी, हे कळवाल का? 'लोकल'च्या गर्दीत ही गोष्ट घडणे लेखकाला कल्पनेतही शक्य वाटली नसल्याने दिल्लीत गेले असावेत. (हिंदी बोलणारा स्वमतांध दांभिक मराठी वैदर्भिय) चिगो..

+१

+१

+१

प्रपोज करायचा वेगळा अंदाज

+१ लैच चालु हाय, बाप्पु.. कथा आवडली..

एकाने बोललं कि सगळ्यांनी तसच करायला हवंय का ? विदर्भ , नागपुर हे सुधा महाराष्ट्रातच येतं . करोल बाग असो नै तर फिरोल बाग असो . ते ठिकाण महाराष्ट्रात येत असेल तर हो . मराठी यायलाच पाहिजे . दुसरं म्हणजे तुम्ही मराठी संकेतस्थळावर कथा लिहित आहात . एखाद दुसरं वाक्य चालू शकतं कि दुसर्या भाषेतलं . नाही कोण म्हणलंय . आणि मी तुमच्या कथेचा निषेध केला नाहीये . त्यातल्या संभाषणाचा केला आहे

>>>" आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?" तुला कुठलंच गाणं पूर्ण एकता येत नाही का गं टवळे? >>>" पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?" काय करु, हाताला काहीतरी चाळा हवा असतो ना???? चुकीचंय नै? >>>>>" I think you need a helping hand stopping your hand from changing songs." उलट्या हाताची एक चापट बसली की कळेल का???? मराठी अभिव्यक्ती. आपली बोली, आपला बाणा!

+१

कथा मस्तच ! बाकी उगीच मराठीच्या नावाने गळे काढणार्याम्चा णीषेढ

+१

+१

शतशब्द कथा(?) प्रकारात कथा न्हवे फक्त प्रसंग बसु शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं... प्रसंग आवडला.

In reply to by द-बाहुबली

मलाही तसेच वाटते. कथा लिहीणे अगदीच अशक्य नाही, विशेष प्रयत्न पाहिजेत. साध्यातरी माझ्याने प्रसंग लिहीणेच झाले.

वर तुडतुडी आणि प्रगो ह्यांनी भाषेचा मुद्दा उपस्थित केलाय त्याला उत्तर द्यावेसे वाटते. कथा दिल्लीत घडत असल्याने दोन अनोळखी तरुणांच्या संवादाची सुरुवात नैसर्गिकपणे हिंदी किंवा इंग्रजीतच होईल. मराठीत कसे शक्य आहे? खरं सांगायचं तर तिथे हिंदीही आली नसती. माझ्याशी इकडे दिल्लीत पहिलंवहिलं वाक्य हिंदीत बोलणारी मुलगी आठवत नाही. थेट इंग्रजीत सुरु होतात. पुढे बरीच ओळखपाळख झाली की हिंदीवर येतात.( माह्यासारख्या इदर्भाच्या गावठी पोट्टयाले हे बम मुश्किल जाते न बाप्पा!) आणि कथेत नैसर्गिकता यावी म्हणून संवादांमध्ये हिंदी आणि इंग्रजीची मुबलक पखरण करणे हे मुंबईकर व. पु. काळेंपासूनच शिकलो बरं. त्यांच्या कथाकादंबरयांतली मराठी पात्रे इंग्रजी वाक्ये फेकताना पाहून तुम्ही नक्कीच त्यांना निषेधाचे खरामरीत पत्र पाठवले असणार ह्यात शंकाच नाही. ( सॉरी वपु, तुम्हाला इथे खेचले.) मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालोय तिथे भाषेचा आग्रह-दुराग्रह कधीच नव्हता, अजूनही नाही. लहानपणापासून आम्हाला एकाच घरात १० माणसे जमली की तीन भाषा ऐकू येत आहेत. आम्ही भराभरा, कधीकधी वाक्यागणिक भाषा बदलतो.मी माझ्या या संस्कतीवर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे माझ्या कथांमधली पात्रे २-३ काय ४-५ भाषा बोलत असली तरी मला ते खूप नैसर्गिक वाटते. माझ्यासाठी जे नैसर्गिक आहे ते तुमच्यासाठीही नैसर्गिक असावे असा आग्रह नाही. पण भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कथेला सीक्वल आहे. तेव्हा दोघांचा संवाद हिंदी आणि इंग्रजीत ठेवून मी कथा ओपन एंडेड ठेवली असे तुम्हाला का वाटत नाही? :)

In reply to by स्वामी संकेतानंद

भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे.
अब रुलायेगा क्या पगले !! देख भाई , मै संपादक मंडळ के लाडके ग्रुप मे नही हुं , दोडके ग्रुप मे हुं , इसिच वजह से वह मेरी तक्रार सुन रेले नई ! वैसे इदर ये क्या लिधा तुने वाच्या हय क्या
५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे.
सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. http://www.misalpav.com/beforesignup.html इसिलिये मै बोल्या तेरेकु ! मेरा क्या जाता हय , किसि भी जुबान मे बोल ना भाई तु ! अपुन को अच्छाईच लगेगा ! =))

+१ ऐड्या आवडली. शो स्वीट!

सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा करोलबाग स्टेशन पाहतो. बघू सापडेल का ती अर्धवट गाणी ऐकणारी, ३० वर्षे पूर्वीचा काळ असता तर मी निश्चित तिला मदत केली असती गाणे ऐकण्यासाठी - हम आपके हैं कौन ?? +++ 1

+१

+१

यार ये भी कोई बात हुई!!! स्वामीजीनी दिल्ली vibe पकडली त्याचे कौतिक करा की राव ज़रा नको तिथे कश्याला काहीही टिका, आपले पटाईत सर सुद्धा दिल्लीकर आहेत ते सुद्धा हिंदी शब्द वापरतात पण म्हणुन त्यांचे कुठलेच लेखन निषेधार्ह असते का?? मला तर त्यांची स्वतंत्र शैली वाटते ती!! अशी वाक्य रचना किंवा टाइटल आले की सरांची पुर्ण शैली उभी राहते डोळ्या समोर , हे उदहारण सुद्धा सोडा मी अकादमी लिहिली त्याला तुम्ही वाचक रासिकांनी भरभरुन प्रेम दिले मला (अन मी आजन्म त्यांच्यासाठी ऋणी होतो/आहे/राहीन) त्यात माझ्या बॅचमेट्स चे उस्तादजी चे अद्जुडेन्ट सरांचे बोल हे हिंदीत आहेत, तेव्हा ते हजारो शब्दांत मांडलेले प्रसंगच होते न? इथे हे कोण स्वामीजी आहेत त्यांनी सुद्धा तेच केले आहे १०० शब्दांत,त्यात काही गैर वाटत नाही आमचे तर ++१ (संभाषण ते मांडणी साऱ्यांस) बाकी हे स्वामीजी सुरस प्रकरण दिसते आहे (कुकडले हात स्वामीजी इदर्भातले??)

+१

बाकी चालुद्या. इथे पण आरक्षण हवे आहे का मराठी शब्दांना - कमित कमी ३०% मराठी शब्द नसतील तर इथे चालणार नाही ?

+१०१

+१

+१

इंग्रजी व हिंदी वाक्यांची घुसखोरी मान्य करून ते योग्य ठरवणार्‍या सर्व माननीय सदस्यांना एक प्रश्नः जर हीच कथा कुठल्या इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, पारशी, हिब्रू, रशियन, चायनीज, जापनीज, तेलुगू, तमिळ, मल्यालम, सिंहली, इत्यादी भाषेच्या संकेतस्थळावर असती आणि फक्त ते करोलबाग ला उतरलेत म्हणून नायक-नायिका हिंदीतूनच बोलतील असा अट्टाहास खपवून घेतला असता काय? शतशब्दकथा स्पर्धा ही मराठी संकेतस्थळावर आहे, ती मराठीत लिहिली जावी अशीच अपेक्षा असेल. इथे हिंदी-ईंग्रजी समजणारे लोक आहेत म्हणून धडाधड इंग्रजी-हिंदी वाक्ये टाकून संकेतस्थळाच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करावी हे पटत नाही. दोन हजार शब्द असलेल्या एक अशा १०-१५ भागाच्या मालिकेत वातावरण निर्मीतीसाठी एखादं वाक्य किंवा पात्राचे व्यक्तिचित्र उभे राहावे म्हणून दुसर्‍या भाषेत ठिक आहे. पण जिथे मर्यादा शब्दसंख्येचीच घातली आहे तिथे शब्दांचीच मर्यादा ओळखली पाहिजे. अचूक शब्दांतून नेमकं वातावरण उभं करणं आवश्यक आहे. दिल्लीची आणि हिंदी-इंग्रजी वाक्यांची एक प्रेमकथा उभी राहण्यासाठी गरज पडावी हे पटत नाही. या कथेचं दिल्ली हे एक महत्त्वाचं अंग आहे असं वाटत नाही. जर हा प्रसंग पॅरीस्/टोकियोमधे घडला असता तर फ्रेंच/जॅपनीजमधेच टाकलं असतं का ते वाक्य? कथा दिल्लीत घडत असल्याने दोन अनोळखी तरुणांच्या संवादाची सुरुवात नैसर्गिकपणे हिंदी किंवा इंग्रजीतच होईल. मराठीत कसे शक्य आहे? इथे मराठी कमी पडतं असं सरळ मान्य करण्यासारखे झाले की. अनेक अनुवादीत कथाकादंबर्‍यांमधे वॉलस्ट्रीटवरचा जॉन नावाचा एखादा नायक हॅरी नावाच्या सहकार्‍याला तो केवळ न्युयॉर्कमधे आहे म्हणून हाव-डु-यु-डू म्हणून संभाषण सुरू करत नाही. किंवा एखाद्या चेतनभगतीय पुस्तकात दोन सहकारी हिंदीत बोलतायत असंही वाचलं नाही. मग मराठीत असं खपवून घ्या असा हट्ट का बुवा? आपली भाषा समर्थ आहे सगळ्या भाव-भावना नीट मांडायला. त्या तशा समर्थपणे मांडता येणे हे व्यक्तिपरत्वे बदलेल इतकंच. पण भाषा सोडू नये ही कळकळीची विनंती. बरं इथे जे शेवटचं इंग्रजी वाक्य टाकलंय त्याच्या व्याकरणाबद्दल व शुद्धतेबद्दलही शंका आहे. आता म्हणा की आम्ही कसेही इंग्रजी लिहू. तर असोच. लेखकरावांनी दिलेलं स्पष्टीकरण वाचलं. त्यात ते म्हणाले की भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे. अहो हे वाक्य तत्त्वज्ञानी छाप पाडायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष जगात उपयोगी नाहीये ना. मी उद्या एखादी मराठी कथा लिहिली ज्यात एक साउथ इंडीयन त्याच्या भाषेत जे बोलला ते त्या लिपीसकट इथं टाकलं आणि ते एकदम कथेचा केंद्रबिंदू आहे पण वाचणार्‍याला कळलंच नाही तर हे तुमचं सहिष्णु जग काय डोंबलाचं मदतीस येणारंय. लहानपणापासून आम्हाला एकाच घरात १० माणसे जमली की तीन भाषा ऐकू येत आहेत. आम्ही भराभरा, कधीकधी वाक्यागणिक भाषा बदलतो. ह्याच्या मागे काय तर्क आहे बुवा? ह्या दहा माणसांत एखादा फ्रेंच, जर्मन, यंडुगुंडू वाक्ये मराठीत घुसडून बोलणारा असेल तर जमेल काय? दाखवाल का तुमचा तो सहिष्णुपणा भाषेच्या जगातला का काय तो? ह्या कथेचा मूळ आत्मा ज्या वाक्यात आहे तेच अक्खं इंग्रजीत तेही मोडक्या-तोडक्या. म्हणून आक्षेप आहे. या मराठी कथेत महत्त्वपूर्ण असलेलं वाक्य इंग्रजीत खपवून घेणार्‍यांना शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटात शिवाजी म्हणून एखादा काळा आफ्रिकन दाखवला तरी चालेल असे समजतो. बाकी चालु द्या. @कपिलमुनि, मराठीच्या नावाने संकेतस्थळे काढणारांचाही णिषेढ करा. त्याचेच सदस्य होऊन मराठीचा आग्रह धरणार्‍या इतर सदस्यांचा णिषेध करणे म्हणजे दांभिकतेची सर्वोच्च पातळी नव्हे काय?

+१ झक्कास