Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] लव्ह

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 06/08/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
तो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता. म्हणूनच तिला आवडायचा. तू काहीच कुणाशी शेअर का करत नाहीस असं तिने विचारल्यावर तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये'. हे ऐकल्यावरच तिने ठरवलं, ह्यालाच मी लव्ह देणार. आज वाढदिवसानिमित्त तिला शेकडो गिफ्ट्स मिळाल्या, पण त्यात तिला शष्प इंटरेस्ट नव्हता. रूममेट झोपल्यावर त्याने दिलेली गिफ्ट तिने उघडली. एक सुंदर बाहुली होती. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची. बाहुलीला छातीशी कवटाळून, त्याच्या विचारात ती गाढ झोपी गेली. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने रूममेटला जाग आली. बघते तर काय, ती निरागसपणे झोपली होती... आणि तिच्या छातीवरची बाहुली गंभीर आवाजात म्हणत होती... एंम् भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...

वाचने 6398
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

हा हा हा आदी भाऊ महेश च्या जागी मिथुनदा आणा सिक्वेल मधे ;)

हाहाहा!

मजेशीर.

हात जोडून 'रामदासपाध्ये रामदासपाध्येरामदासपाध्ये' असा सतत मंत्रोच्चार करावा.

+१

मस्तच! +१ पण हे शष्प म्हणजे काय?

In reply to by जडभरत

शष्प म्हणजे 'अजिबात / जराही'.

In reply to by जडभरत

तसुभर.

In reply to by जडभरत

घंटा

+१ असं घाबलवता का मिपाकरांना ?! ;)

+१

+१ अगागा! किती गोष्टींचं विडंबन ते!

जाम आवडली.

आवडली :)

+१

.

आद्या आवद्या +१ (आता तू माझ्या कथेला +१ द्यायचा बर्का. ;) )

+१

+१

+१

+१

कोण असावा बरे हा मुलगा? "तो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता" - त्याला त्याची ओळख गुप्त ठेवण्याचे आदेश असावेत! तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये' - उगाच काहीही डायलॉग मारून हवा करणे! हा दुसरा तिसरा कोण नसून जेम्स बोंड आहे! "एम"चा मृत्यू त्याला सहन झालेला नाहीये त्यामुळे तिला पुन्हा जिवंत करायला त्याने हि शक्कल लढवली आहे! लेखकाने शेवटी हिंट देखील दिलेली आहे... "एंम्" भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...

+१ हाहाहाहाहहा शेवट भारी."एंम्" भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...लक्ष्या ची आठवण आली.

आदि जोशी लव्ह वर लिहिणार म्हणल्यावर आम्ही यामाहा च्या अपेक्षेने आलेलो, अपेक्षाभंग झाला. =))