Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] नवनिर्माण

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 04/08/2015 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
भर पावसात चहूबाजूच्या सह्यकड्यांतील गहन शांततेला तीक्ष्ण बोचकारे काढत मशीनचा अजस्र हात आडवातिडवा फिरत होता. झाडं फाटून, उन्मळून पडत होती. डोंगराची ओली माती चामडी सोलावी तशी विदीर्ण होत उपसून निघत होती. खळाळणारे पाणी नव्या खड्ड्यात बिचकून थांबत रस्ता शोधत होते. ताठ-कॉलर-शुभ्र-लुंगीवाला हाताची घडी घालून ते एकटक पहात होता. बाजूचा मळकट-लेंगेवाला दाढीचे खुंट खाजवत चुळबुळत होता. हिरव्यागर्द झाडोर्‍याची खांडोळी करत मशीन डोंगराआड गेले. त्याचा दबलेला आवाज जणू दूरच्या समुद्रगाजेसारखा गूढ झाला. लुंगीवाला वळून म्हणाला, "तुम मराठी लोग बहूत लेझी...! रबर के लिये बहूत अच्चा जमीन." गांधी-टोपी-मळकट लेंग्याने त्याची नजर चुकवत मान हलवली आणि विडी शिलगावली.

वाचने 4972
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

+१.

+१

+१

अगदी चित्रदर्शी वर्णन: तीक्ष्ण बोचकारे काढत मशीनचा अजस्र हात आडवातिडवा फिरत होता. झाडं फाटून, उन्मळून पडत होती. डोंगराची ओली माती चामडी सोलावी तशी विदीर्ण होत उपसून निघत होती. खळाळणारे पाणी नव्या खड्ड्यात बिचकून थांबत रस्ता शोधत होते. माझंच न्यून असेल, पण 'कथा' सापडली नाही कुठे...

In reply to by बहुगुणी

शीर्षकासहित विचार केल्यास कथामूल्य सापडेल असे सुचवू इच्छितो. पण आपले स्पष्ट मत आवडले.

+१

+1

+१

+१

+1

+१

+१

+१

+१

+१ कथेला.. रबर-लागवडीच्या नावाखाली ह्या रबर-कंपनीवाल्यांनी जमिनी 'मोनोक्रॉप्ड' केल्यात.. आमचे एक सर कट्टर रबर-लागवड विरोधी आहेत, आणि मी त्यांना पुर्णपणे समर्थन करतो..

+१

+1

+१

+१

+१

+१

+१११

+१

+१

+१

+१

+१. चिगो,मी त्यांना पूर्ण समर्थन देतो किंवा मी त्यांचे पूर्णपणे समर्थन करतो,अशी वाक्यरचना असायला हवी,असे वाटते.

+१

+१