Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] शिवी

लेखक शब्दबम्बाळ यांनी मंगळवार, 04/08/2015 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते. "मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला. मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली! गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले. उगीचच त्याने डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता…

वाचने 8235
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

+१

अरे व्वा! +१

+१

+१

आवडली

+२

बोचरी कथा.

In reply to by एस

+स्व सहमती

+१

+१

सर धन्स :)

+१

+१

+१

+१

+१

वा: +१

+१

+१

+१

कथा आवडली असे म्हणणे hold करतो कारण कथेचा आणि "शिवी" या नावाचा संबंध अजूनतरी कळला नाही...!! जरा मला समजवाल काय?

In reply to by योगी९००

वर विनायकरावांनी दिलेल्या उदाहरणानंतर मी काही स्पष्टीकरण द्यावं का? बहुधा आपल्याला कळालच असेल...

+१

+१

+१

+१

+१

+१ पण कथेला आंधळा हे नाव जास्त योग्य ठरले असते असे वाटते.

+१

+१

+१

आवडली, पैजारबुवा,

+१

कुठेतरी एक कळ येउन गेली क्षणभर...

In reply to by तुडतुडी

अत्यंत संवेदनाहीन प्रतिसाद. तीव्र निषेध! (ही एक टेम्पलेट आहे. फिरत्या चषकाप्रमाणे फिरती असते. आज माझ्याकडे आली आहे.) खुलाशानंतर देखील निषेध तीव्र च आहे.

+१

हं. सहज म्हणुन जातो आपण, पण ते जगणार्‍याला बोचायचं ते बोचतच!

आवडली...खरं राव, जपून बोलायला हवं.

+१

+१

+१

+१

+१ आवडली कथा

+१ कथा आवडली.

एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता…

+१

+१

+१

+१ *(महाभारत आठवलं.) मलापण +१

+१

+१

+१