Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] शाप

लेखक माझिया मना यांनी मंगळवार, 04/08/2015 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोहिनी देवी सुन्न होऊन बसल्या होत्या. भविष्यातील भयंकर घटनांच्या चाहुलीने थरकाप झाला होता त्यांचा. ही जहागीर अजून किती बळी घेणार कळत नव्हते. सरकारांना परोपरीने सांगूनही जहागिरीचा मोह सुटत नाहीये.. का ही जहागीरच त्यांना सोडत नाहीये ? त्यांना आठवला तो सावत्र सासू राजलक्ष्मी देवींचा शाप.. आज खरं तर आनंदाचा दिवस..त्यांचा मुलगा अजिंक्यराजे ज्याला शिकायला दूर ठेवले होते तो त्याच्या पसंतीच्या मुलीला दाखवायला घेऊन आलाय.. राजश्री..मुलगी साध्या घरची पण स्वरूप सुंदर.. आपल्या घराण्यात शोभून जाईल..पण त्या पुन्हा नखशिखान्त थरकापल्या.. राजश्री वाड्यात सराईता सारखी वावरतेय..अजिंक्य राजे आणि राजश्री जेव्हा आशिर्वाद घ्यायला मोठे सरकार नी सासूबाईंच्या तैलचित्रापुढे उभे राहिले.. तेव्हा राजश्री म्हणाली .. "मी आलेय" आणि सासूबाई चित्रात हसल्याचा भास झाला.

वाचने 16233
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

बाप रे +१ देतो नैतर सासूबै स्वप्नात येतील!

+१

+१ स्पर्धा जाऊ दे, याचं सीक्वल लिहाच!

पहिलाच प्रयत्न आहे.. :-)

+१

+१

+१

+1

+१

+१

कथाविस्तार वाचायला आवडेल.

+१

+१

+१

आवडेश करुण रसापेक्षा वेगळा रस असल्याने जास्त आवड्ली

+१

+१

आवडली, पैजारबुवा,

+१.. घाबरलो ब्वॉ मी..

यावर १ नवीन मालीका होउ शकेल! तसेही या मालीकांचे लेखक श श क ची पाल ओढुन ताणुन डायनासॉर करण्यासाठी समर्थ आहेतच...

In reply to by gogglya

श श क च राहील.. पालीचा डायनोसोर करायला गेलो तर पालीचा जीव जाईल :-)

+१

+१

लै भारी वाटतंय .. पहिल्या प्रयत्नाला दाद दिल्याबद्दल आभारी आहे.

ही साखळीवाल्यांना पारायण करायला द्या कदाचीत "उजेड" पडेल !!!!

+१

+१

+१

+१

+१ मस्त गूढकथा!

आवड्ली कथा, पुर्ण वाचायला जास्त आवडेल ग.

कथा आवडली. पूर्ण वाचायलाही आवडेल.

+१

+१

+१

+१

+१