Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] सुटका

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 04/08/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं. चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा? माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं. हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या. आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय. शिकणार्‍या मुलाची तजवीज लागली की झालं. . . . . . ब्लड कॅन्सर आहे. अ‍ॅड्व्हान्स्ड स्टेजचा. आटपेल लवकरच.

वाचने 5927
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

+१

आई ग्गं! :-(

+१ कथेसाठी..

+१

+१!

(अवांतरः व्य नि पाठवला आहे)

+१

+१

+१

+१

....................... फक्त

+१

+१

+१

+१

+१

+१

इंप्रोवायजेशनला जागा आहे.

+१

आवडली. पण शीर्षक व पहिली ओळ वाचूनच बरा न होणारा रोग असेल ते समजले.. त्यामुळे शशक ची उत्सूकता ताणल्या गेली नाही.. :). स्वगत :- शेवटच्या ओळॆपर्तन्त ताणणे हा पण शशकचा भागच झाला का काय ?

अशी सुटका नको हो...

+१

+१

.

...

सिक्वेलच्या प्रतीक्षेत, मात्र स्वतंत्र कथा म्हणून ही तितकीशी परीपूर्ण वाटत नाही.

+१

शोकांतिका

+१

+१

+१

+१ नको रे देत जाऊस असले काही. :(

+१

+ १

+१