Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] माफी

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 04/08/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन सकाळीच करून झालं होतं . दुपारी जेवण झाल्यावर तो निघणार होता त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायला .रात्रीच्या जागरणाचा त्रास व्हायचा म्हणून तो दिवसाच प्रवास करायचा . पण अनेक वेळा होतं तसं आजहि नवरा बायकोचं भांडण झालं. भांडणाच्या नादात त्याची गाडी चुकली. मग पुन्हा दिवसभर धुसफूस. बायकोने जाऊच दिलं नाही . त्याने मनातल्या मनात बायकोला शिव्या घातल्या . (तोंडावर घालता येत नव्हत्या ;-) ) जावूदे २ दिवसांची राजा टाकता येईल . तोपर्यंत होईल शांत . मग जावू. असा विचार करत तो रात्रीचा बिछान्यावर पडला . सकाळी चहा पिताना हातात वर्तमानपत्र घेतलं .पहिल्याच ठळक मुख्य बातमीवर नजर गेली . अन काळजात चर्र झालं . 'पहाटे झालेल्या किल्लारी भूकंपामध्ये शेकडो जणांचा बळी ' मनात आलं , आज सकाळी मी किल्लारीत असलो असतो. कालच्या भांडणाबद्दल त्याने बायकोला मनोमन माफ केलं .

वाचने 2973
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

-1. अवांतर-लॉजीक पटल नाही.भुकंप पहाटे झालता.लगेच सकाळी पेप्रात बातमी कुठुन येणार? पुभाप्र. (लॉजीकल)-जेपी

In reply to by जेपी

सहमत...

पहाटेच्या बातम्या पेपरात येतात . तुम्हाला आठवत असेल दुसर्या दिवशीच्या पेपर मध्ये बातमी आली होती

जमलीय..
जावूदे २ दिवसांची राजा टाकता येईल .
कृपा करुन 'पूर्वपरीक्षण' सुविधेचा लाभ घ्यावा, ही विनंती.. आणि विरामचिन्हांकडे पण जरा लक्ष द्यावे..

+१

+१

-१

बरंच ओढून ताणून जुळवल्यासारखी वाटली.

+१ आवडली

+0-0=0 ;)

+१

-१

+१

+१