गणेश विसर्जन सकाळीच करून झालं होतं . दुपारी जेवण झाल्यावर तो निघणार होता त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायला .रात्रीच्या जागरणाचा त्रास व्हायचा म्हणून तो दिवसाच प्रवास करायचा .
पण अनेक वेळा होतं तसं आजहि नवरा बायकोचं भांडण झालं. भांडणाच्या नादात त्याची गाडी चुकली. मग पुन्हा दिवसभर धुसफूस. बायकोने जाऊच दिलं नाही . त्याने मनातल्या मनात बायकोला शिव्या घातल्या . (तोंडावर घालता येत नव्हत्या ;-) ) जावूदे २ दिवसांची राजा टाकता येईल . तोपर्यंत होईल शांत . मग जावू. असा विचार करत तो रात्रीचा बिछान्यावर पडला .
सकाळी चहा पिताना हातात वर्तमानपत्र घेतलं .पहिल्याच ठळक मुख्य बातमीवर नजर गेली . अन काळजात चर्र झालं .
'पहाटे झालेल्या किल्लारी भूकंपामध्ये शेकडो जणांचा बळी '
मनात आलं , आज सकाळी मी किल्लारीत असलो असतो. कालच्या भांडणाबद्दल त्याने बायकोला मनोमन माफ केलं .
वाचने
2973
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
-1.
सहमत...
In reply to -1. by जेपी
पहाटेच्या बातम्या पेपरात
बरीय..
ते आम्हीपण आधी म्हटलं पण लोकं
In reply to बरीय.. by चिगो
अर्र्र्र्र्र्र . आवडली असेल
+१
अबब!! ११४ शब्द!
+१
-१
-१
खि:क . ओढून ताणून नै ओ जुळवलं
+१ आवडली
+0-0=0 ;)
+१
-१
+१
+१