Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] काळजाचा ठोका

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 04/08/2015 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"झालं सगळं! आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता आपण." संकेत आनंदी होता. "हो ना, पण कर्ज खूप मोठं आहे रे. आपल्याला झेपेल ना हे?" सानिकाच्या स्वरात काळजी डोकावत होती. "काळजी नको करूस. सॉरी, तुझ्या आवडत्या बांगड्या मात्र विकाव्या लागल्या..." "नो प्रॉब्लेम! बांगड्या पुन्हा करता येतील.” "हम्म…कर्जाचा ईएमआय थोडा कठीण जाईल. बघू, महिन्याभरात माझं प्रमोशनही होईल बहुतेक..." दुसऱ्या दिवशी सकाळी संकेतच्या मोबाईलवर कंपनीच्या एमडीचा फोन आला. संकेतला ताबडतोब भेटायला बोलावलं होतं. "संकेत, टेक अ सीट…कंपनीचा निर्णय झालेला आहे…तुला जावं लागेल…" संकेतला दरदरून घाम फुटला... “आपले चेअरमन आपल्या नवीन रिजनल हेडची वाट बघतायेत. त्यामुळे लवकर हेड ऑफिसला जायची तयारी करा. अभिनंदन!!!"

वाचने 10320
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

छान !!!

+१

आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता
Nanded City ?

In reply to by पगला गजोधर

पण मी रिजनल हेड नाही. ;-) त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी जे 'हेड' लागतं सालं नेमकं तेच नाही ना आमच्याकडे! :-)

छान !

+१

मस्त रे +१ पैल्यांदा उगाच घाब्रवलंस! असो तुझा कथानायक राहू दे नवीन घरात सुखाने.

+१

In reply to by अत्रुप्त आत्मा

शब्दांचे खेळ नका करु बुवा जाऊ दे जोरात पुढे एक्टिवा सोडा जिल्बी येऊ दे आयटम नवा नका सरू मागे भाजा पेढयासाठी खवा

+1

+१

+१

+१ आवडली...!!

सुखद धक्याबद्दल +११११ पिळवटणार्या कथाबाजारात "सुखद सकारात्मक झुळुक" शोधणारा शशक वाचक

In reply to by नाखु

म्हटलं थोडा सकारात्मक धक्का देऊन बघू या... :-)

+१

+1

गोष्ट वाचताना....... नुसत्या कल्पनेनेच घाम फुटला..... पैजारबुवा,

+१

+१

+१

मस्त

+१.. ठोका चुकवलात..

+१

+१

नाखु म्हणाले तसे दुख्खी शेवट असणार्‍या अनेक कथांमधील अपवाद! वाचून आनंद झाला.

+१

+१

अगदी खरं...सुखद धक्क्याबद्दल +१

+१

खरच … धक्का बसला असता

सुखद धक्का +1

+१ हायला ! खरंच काळजाचा ठोका चुकला राव :)

+१

शीर्षकाला १००% जागणारी कथा!! आणि कथेचा मनावर झालेला आघात जबरदस्त! सुखद धक्का!! आवडला!!

+१

+१ मस्त धक्का!

+१

अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा पहिल्या सत्राचा 'नेटवर्क एनेलिसिस' नावाचा खतरनाक विषय! पहिल्यांदा दांडी उडाली. विशेष वाटलं नाही. ८०% विद्यार्थ्यांची उडाली होती त्यामुळे फारसं दु:ख झालं नाही. दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा पेपर दिला. पुस्तकं वाचली होती. थिअरी थोडी फार येत होती पण कधी नव्हे ती ९० गुणांची गणितं यायला सुरुवात झाली होती. गणितं जाम कळेनात. जी थोडी-फार बुद्धी होती ती सगळी ओतली पण तरी ती गणितं अगम्यच राहिली. थोडीफार प्राथमिक दर्जाची गणितं ठीक-ठाक जमू लागली. ती गणितांचा साचा थोडाफार कळल्यामुळे जमत होती; गणितांमागची लपलेली शुद्ध संकल्पना समजली नव्हतीच. थिअरीच्या जोरावर मी बरे गुण पदरात पाडून घेत असे पण तांत्रिक विषयाची गणितं म्हटली की मला कापरं भरत असे. आणि या विषयात पूर्वी ६० गुणांची थिअरी यायची; आता ९० गुणांची गणितं! गर्भगळीत होणे म्हणजे काय हे त्यावेळी आम्ही अनुभवलं. दुसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात दुसऱ्यांदा 'नेटवर्क एनेलिसिस' धडधडत्या अंत:करणाने दिला. पुन्हा नापास! आता एटीकेटी नामे वरदानाचा लाभ घेऊन तिसऱ्या वर्षात गेलो खरे पण नेटवर्कचे भूत मानगुटीवर होतेच. तिसऱ्या वर्षीच्या पहिल्या सत्रात परत झटापट करून नेटवर्क दिला. हाय रे कर्मा, पुन्हा अनुत्तीर्ण! प्राण कंठाशी आले. आता एकच चान्स. नाहीतर तिसऱ्या वर्षी डिस्टिंक्शन मिळवूनदेखील एक वर्ष आराम करावा लागला असता. तिसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा नेटवर्कसोबत कुस्ती खेळलो. तिसऱ्या वर्षीच्या बहुतेक सगळ्या विषयांमध्ये फर्स्ट क्लास मिळाला आणि नेटवर्कने पुढील एक वर्ष गिळण्यासाठी आ वासला होता. मी मटकन खाली बसलो. सगळं जग डोक्याभोवती गरगर फिरायला लागलं. पर बचेंगे तो और भी लडेंगे या न्यायाने मी पेपर पुनर्तपासणीसाठी टाकला. तोपर्यंत चौथ्या वर्षात तात्पुरता प्रवेश घेऊन वर्गांना हजेरी लावू लागलो. अशा वेळेस परिस्थिती कशी असते हे ज्यांना असे अनुभव आहेत त्यांनाच कळू शकते. वर्गात सगळे 'ये तो चंद दिनों का महमान हैं' अशा नजरेने बघत. हृदय विदीर्ण होत असे. पण या बोटीत बरेच सहाध्यायी असल्याने थोडा दिलासा होता. आणि एक दिवस मी वसतिगृहातील माझ्या खोलीत पसरलेलो असतांना एक मुलगा पळत पळत आला. "अबे सम्या, तेरा एनए निकल गया बे. साले ३७ पे निकला. और दो जनों का निकला. जा बे जल्दी xxडे देख के आ...रिजल्ट लगा है बोर्ड पे..." मला सुचेचना. क्षणभर आई-बाबा डोळ्यांसमोर तरळले. काय घडलं असतं ते डोळ्यांसमोरून तरळून गेलं. मी सुसाट पळत निघालो. सुखद धक्के आवश्यक असतात आयुष्यात.....जगण्याची ओढ अधिक घट्ट करण्यासाठी...

हा हा हा ! काही क्षण कपाळातच गेल्या असतील :-)

In reply to by बबन ताम्बे

मग काय! पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय हे मला या अनुभवातून कळले. :-)

+१