Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] वड्यांवरची मालकी

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 04/08/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली. लगोलग तो रडु लागला," साहेब 'त्यानं' वडे मोजुन ठेवले व्हते .. आता तेवढं पैसं नाही दिलं तर.." पाकीट काढलं आणि पैसे देऊन मी निघालो. जाताना बघीतले तर मातीतले वडे तो वेचुन खात होता. समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्याच्यासाठी एकही नव्हता. त्याला त्याच्याच गाडीवर पोटभर जेऊ घातलं आणि मी निघालो. पाच पाऊल जाताच त्याने आवाज देऊन मी विसरलेलं पैशाने भरलेलं पाकीट मला परत आणून दिलं.... घरी परतलो आणि कपडे बदलताना लक्ष्ात आलं की रस्त्यावरुन येताना माझं पाकीट कोणीतरी मारलं आहे. प्रत्येकजण इथे भुकेला आहे. प्रत्येकाची भुक मात्र निरनिराळी..

वाचने 7136
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

+१ एकसे एक शशक वाचायला मिळतायत. मिपा व्यवस्थापनाचे या अनोख्या स्पर्धेबद्दल आभार.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

+१ & +१

+१

+१

आवडली. शेवटच्या ओळी खासच.

अखेरची ओळ आणि विरोधाभास, दोन्ही उल्लेखनीय.

एक सूचना. कथा ही किस्सा न वाटण्यासाठी ती तृतीयपुरुषी निवेदनात असल्यास अजून रंगेल. अर्थात्, हे माझे वैयक्तिक मत झाले.

+१.. आवडली. समाजातला/ आयुष्यातला विरोधाभास मस्त टिपलाय.. अवांतरः 'समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्यासाठी एकही नव्हता.' इथे 'त्याच्यासाठी' हवं का? आगावू शहाणपणासाठी सॉरी..

In reply to by चिगो

च्यामारी तिथं 'च्या' खरचं पाहिजे होत. नेष्ट टाईम तुमच्यासाठी 'त्याच्यासाठी' असा टाकू. आणि सॉरी म्हणत जौ नाका हां..कसकसंच वाटतय बगा मग..

+१.

+१

+१ खूपच आवडली. कथा जज करणे कठीण होणार बहुतेक

+१

+१

+१ वाह!

+१

+१

+१

+१

+१

+1

+१

+१

+१

+१

' वड्यांवरची मालकी' ऐवजी फक्त ' मालकी ' असं शीर्षक आतं तर अजून छान वाटलं असतं. +१

शब्द तुमचे आंकीत आहेत खरे !!!

शेवटची ओळ बेष्ट! पण "मातीतले वडे तो वेचुन खात होता" हे वाक्य नकळत असे दर्शवते का की मातीत खूप सारे वडे होते आणि त्यातले काहीच तो वेचून खात होता! इथे "मातीतले वडे तो भुकेपायी खात होता" असे चालले असते का? का माझी काही गल्लत होतेय समजण्यामध्ये?

In reply to by शब्दबम्बाळ

पुर्ण डिश खाली पडली ना.. एक डिश समजा दोन वड्यांची म्हणुन म्हणुन मातीतले वडे तो वेचुन खात होता असे म्हटले आहे.

+१०० मस्तच

+१

+1

+१

'भूक' हे शीर्षक पण चाललं असतं पण सिक्वल काय आहे ??

+१

+१

+१

सुरेख !

+१

+१

+१

+१

+१

सुरेख.+१

+१

वाह !!