Skip to main content

नवीन स्टिकर्स पाहिजेत.

शनिवार, 01/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन स्टिकर्स पाहिजेत. Whatsapp ने सर्वाना काबीज केलंय. गम्मत अशी की या मध्ये एकही शब्द न वापरता केवळ स्टीकर वापरून संवाद करता येतो. थोडा वेळ लागतो पण परंपरागत लिखाणापेक्षा मजेशीर प्रकार आहे. त्यामध्ये खास भारतीयांसाठी काही नवीन स्टिकर्स Whats app कंपनीने बनवून द्यावेत अशी मागणी आहे. काही विशेष भावना जोरकसपणे समोरच्यापर्यंत पोचवण्या साठी असे स्टिकर्स अत्यंत गरजेचे आहेत. भारंभार शब्द टायपिंग करण्याचा त्रास आणि वेळ वाचवून अस्सल देशी पर्याय हवा आहे. नवीन स्टिकर्स ची मागणी यादी पुढीलप्रमाणे: - १. पाया पडणे २. वाकून नमस्कार ३. साष्टांग नमस्कार ४. स्वतःच्या गालफडात मारून घेणे ५. कपाळावर हात मारणे ६. सॅल्युट ७. कानात बोटे घालणे ८. खळळं खट्यक ९. मिशीवर ताव भरणे १०. जांभई ११. जोड्याने मारणे १२. जोडीने पाया पडणे १३. स्क्रू ढिल्ला असणे १४. पदर खोचणे १५. पोट तुडुंब भरणे वानगी दाखल दिलेत, तुम्ही अजून सुचवा!

वाचने 4059
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

भेटा किंवा लिहा...... अत्रुप्तबाबा स्मायली वाले मिपा पारा जवळ, पुणे भ्रमणध्वनी- ########## वि सू- व्य नि १ ते ४ बंद राहतील !

अजून काही -- १.दगडावर डोके आपटणे २.दगड डोक्यात घालणे. ३.जिभ दाखवून वेडावणे. ४.ढूंगणाला पाय लाउन पळणे. ५.अर्वाच्य शिव्या देणे. ६.भोसकणे ७.फाट्यावर मारणे. ८.गै गै करणे ९.गै करुन घोरणे १०.येत नाही ज्जा ११.क्रुपया पुढे जा.(भिकार्‍याला सांगतात तसे) १२.माफ करा. (भिकार्‍याला आणि नॉन भिकारी दोघांसाठी) १३.आवरा १४.पुरे १५.फटके मारणे १६.कानाखाली मारणे सद्या एवढेच..

हाइक वाल्यांचे चांगले असतात देसी स्टिकर (रिजनल पण) पण काय आहे की हाईक वापरायला नको वाटते. बहुतेक हेवी असावे. व्हाटसप सोडवित नाही.