✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

स
संपादक मंडळ यांनी
Fri, 07/24/2015 - 10:53  ·  लेख
लेख
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
79230 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

जुरासिक पार्कमधला म्हणून सहज

टवाळ कार्टा
Wed, 07/29/2015 - 16:03 नवीन
जुरासिक पार्कमधला म्हणून सहज खपून जाईल
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

ताम्हिणी....

सविता००१
Wed, 07/29/2015 - 17:42 नवीन
मस्तच आहे
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

मस्तच आहे

रवीराज
Wed, 07/29/2015 - 23:49 नवीन
पण रस्ता सोडुन बाहेर चालली आहे ना गाडी (फोटो बाहेर चाललाय)
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

न्यू ह्याम्शायार

आशय ढवळे
Wed, 07/29/2015 - 15:58 नवीन
Image removed.

अप्रतिम !!!!

अश्विनी मेमाणे
Wed, 07/29/2015 - 18:41 नवीन
अप्रतिम !!!!
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

एक से बढकर एक फोटो आलेत. :)

झकासराव
Wed, 07/29/2015 - 17:25 नवीन
एक से बढकर एक फोटो आलेत. :)

माझा पण पाऊस....!!!

ढंप्या
Wed, 07/29/2015 - 20:49 नवीन
Image removed. अजून एक....... Image removed. दोन्ही फोटो मोबाईल ने क्लीकले आहेत. (Samsung S-II) टेक्नीकल डिटेल्स ....... माहीत नाही..... ऑटो मोड मध्ये क्लीकले आहेत रस्ता आपला नेहमीचाच..... खोपोली ते पाली याच्यामध्ये कुठेतरी.... २०१३ चे आहेत फोटो.. त्यामुळे आठवत नाही......

इंद्र्धनुचा पाठलाग

मोहन
गुरुवार, 07/30/2015 - 10:50 नवीन
पावसाळ्यातला उन - पावसाचा खेळ आणि इंद्रधनुष्य नेहमीच मनमोहक दिसते. Image removed.

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Fri, 07/31/2015 - 07:35 नवीन
पाऊस Image removed. सोनी सायबरशॉट डब्ल्यू ५० एफ २.८ १/१०० आयएसओ ८०

एकच नंबर !

विशाल कुलकर्णी
Fri, 07/31/2015 - 12:48 नवीन
एकच नंबर ! या फोटोला प्रथम क्रमांक मिळायलाच हवा.
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

(No subject)

त्रिवेणी
Fri, 07/31/2015 - 08:16 नवीन
Image removed.

हा फोटो चालेल का?

किल्लेदार
Fri, 07/31/2015 - 09:25 नवीन
असाही एक पाऊस ………… Image removed.

अफ़ाट

कपिलमुनी
Fri, 07/31/2015 - 09:46 नवीन
बेष्ट फ़ोटो ! पाउस यापेक्षा सुंदर असूच शकत नाही :)
↩ प्रतिसाद: किल्लेदार

ह्या चित्रातल्या पोज नंतरचा

नाव आडनाव
Fri, 07/31/2015 - 10:07 नवीन
ह्या चित्रातल्या पोज नंतरचा डायलॉग (हिंदी पिच्चरातला) - "ये हमसे कैसी मीठी सी भूल हो गयी" :)
↩ प्रतिसाद: किल्लेदार

रिमझिम गिरे सावन....

किल्लेदार
Fri, 07/31/2015 - 10:10 नवीन
रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
↩ प्रतिसाद: किल्लेदार

आज लीपट जाये तो हमे न छुडैयो

कहर
Fri, 07/31/2015 - 12:43 नवीन
आज लीपट जाये तो हमे न छुडैयो
↩ प्रतिसाद: किल्लेदार

व्हॉट अ मोमेंट कॅप्चर्ड.....

वेल्लाभट
Fri, 07/31/2015 - 13:22 नवीन
व्हॉट अ मोमेंट कॅप्चर्ड.....
↩ प्रतिसाद: किल्लेदार

दिल गार्डन गर्डन और बरच कै हो

टवाळ कार्टा
Fri, 07/31/2015 - 13:48 नवीन
दिल गार्डन गर्डन और बरच कै हो गया ;)
↩ प्रतिसाद: किल्लेदार

पटला नाही

मधुरा देशपांडे
Fri, 07/31/2015 - 14:28 नवीन
स्पर्धेसाठी दिला असेल किंवा सहज दिला असेल, फोटो पटला नाही. आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत हे माझे वैयक्तीक मत.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

सहमत

प्रियाजी
Fri, 07/31/2015 - 15:46 नवीन
मधुरा, मी तुझ्याशी १०० टक्के सहमत आहे. मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही.बाकी ज्याची त्याची आवड आणि निवड!!
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

सहमत

वेल्लाभट
Fri, 07/31/2015 - 15:59 नवीन
ऑलदो, आय से इट्स अ ग्रेट कॅप्चर, पण तुमचं म्हणणं १००% रास्त आहे.
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

ओलेती

कपिलमुनी
Fri, 07/31/2015 - 16:13 नवीन
हे चित्र राजा रविवर्मा यांच्या ओलेती सारखा वाटला आणि ते चित्र हे जगभरात मास्टर पीस म्हणून प्रसिद्ध आहे. चित्राचा दुवा
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

एक दुरुस्ती.

एस
Fri, 08/07/2015 - 23:05 नवीन
ते चित्र एस. जी. ठाकूरसिंग यांचे आहे. औंधच्या संग्रहालयात राजा रविवर्मांच्या चित्रांबरोबरच हेही चित्र आहे. पण ते राजा रविवर्माचे नाही.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

स्पर्धेचा विषय निट समजून

ऋतुराज चित्रे
Fri, 07/31/2015 - 16:17 नवीन
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात. वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

सहमत/असहमत..

चिगो
Fri, 07/31/2015 - 17:39 नवीन
वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.
ह्या वाक्याच्या 'ठ्ठोऽऽ" पोटेंशियलशी सहमत.. पण ह्या फोटोने पावसाचा 'रोमँटीक' किंवा 'प्रणय' मुड बरोबर पकडला आहे असं वाटतं.. ह्या फोटोला 'संस्कारी' विरोध करणारे, 'लहान मुलांचा पावसात बागडण्याचा किंवा कागदी होड्या सोडण्याच्या' फोटोला असाच विरोध करणार का? तो पावसाचा 'निरागस' मुड तसाच हा पावसाचा 'नॉट सो निरागस मुड'..
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात.
हे वाक्य ह्या फोटोच्या बाबतीत गैरलागू आहे.. बाकी बर्‍याच फोटोंना मात्र लागू होतंय..
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

वरील फोटो विषयाला धरुनच आहे

ऋतुराज चित्रे
Sat, 08/01/2015 - 10:22 नवीन
वरील फोटो विषयाला धरुनच आहे, परंतू बघताना अवघडल्यासारखे वाटते. अशा फोटोंची लाट यायला वेळ लागणार नाही भले मग स्पर्धेचा विषय कोणताही असो. म्हणुन भाद्रपद म्हटले.
↩ प्रतिसाद: चिगो

तो फोटो 'पाऊस' या विषयाचा न

सस्नेह
Sat, 08/01/2015 - 16:00 नवीन
तो फोटो 'पाऊस' या विषयाचा न वाटता 'पावसातला प्रणय' या विषयाचा वाटतो.
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

आपकी पारखी नजर..

चिगो
Fri, 07/31/2015 - 16:48 नवीन
आपकी पारखी नजर और.. भारी फोटो, किल्लेदार..
↩ प्रतिसाद: किल्लेदार

संमिश्र प्रतिसादांचा पाऊस !!!!!!!!!!

किल्लेदार
Fri, 07/31/2015 - 17:46 नवीन
या छायाचित्रावर संमिश्र प्रतिसाद येणे अपेक्षितच होते. सर्वप्रथम मी संपादक मंडळाला विनंती करतो की छायाचित्र आक्षेपार्ह असल्यास प्रथम इथून काढून टाकावे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल. पण थोडा प्रतिवाद नक्कीच करावासा वाटतो. काही मुद्दे इथे मांडणार आहे पण त्याही आधी संपादक मंडळास काय वाटते ते जाणून घ्यायचे आहे.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

छान

कंस
Sat, 08/01/2015 - 00:22 नवीन
छान आहे फोटो
↩ प्रतिसाद: किल्लेदार

हा स्पर्धेसाठी नाही....

किल्लेदार
Tue, 08/04/2015 - 01:28 नवीन
सर्वप्रथम या छायाचित्राबद्दल …… कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात न डोकावता घेतलेले हे छायाचित्र आहे. (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) १. "आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत" "मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही" …. विषयास अनुसरून वाटला म्हणून मी तो इथे दिला. आणि मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत म्हणूनच तो इथे डकवतांना मला संकोच वाटला नाही. २. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पहिल्या पावसात पिसारा फुलवणारा मोर, पावसात नाचणारी मुले, भातखाचरात काम करणारे शेतकरी, आडोश्याला बसलेली पाखरे, कडाडणाऱ्या विजा, अगदी खिडकीत ठेवलेली भज्यांची प्लेट आणि बाहेर कोसळणारा पाऊस असे अनेक विषय आणि मूड्स असूच शकतात. चिगो यांनी म्हटले तसे हा मूड पाऊस विषयाला धरून का वाटत नाही ? ३. पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का? या छायाचित्रात हाच एक मूड टिपायचा प्रयत्न केला आहे. तरीही मिपाकर सुज्ञ आहेत. त्यांनीच काय ते ठरवावे. बादवे ……. हा स्पर्धेसाठी नाही.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

503 लोकांना सर्दी खोकला.

प्यारे१
Tue, 08/04/2015 - 01:47 नवीन
503 लोकांना सर्दी खोकला. डॉक्टर चा धंदा वाढणार!
↩ प्रतिसाद: किल्लेदार

स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद

मधुरा देशपांडे
Tue, 08/04/2015 - 02:10 नवीन
स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद. १. फोटो न पटण्यामागे पहिले कारण होते की जर स्पर्धेसाठी दिला असे गृहित धरलं, म्हणजेच तो तुम्ही काढलाय (आंतरजालावरुन घेतलेला नाही) असे समजुन, तेव्हा आता जी पार्श्वभुमी सांगितली (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) ती आधीच दिली असती तर हा एक मुद्दा आला नसता. हे कुणाच्या व्यक्तीगत आयुष्यात न डोकावता घेतले असेल हे वाटत नव्हते, पण आंतरजालावर ज्या प्रमाणात अशा घटना घडु शकतात, त्यामुळे शंका आल्याशिवाय राहात नाही. हे तुम्हाला पर्सनली म्हणत नाहीये. हा किंवा तत्सम फोटो कुणीही टाकला असता तरी हेच वाटले असते. अर्थात तरीही - २ आणि ३. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का? असे नक्कीच नाही. पाऊस म्हटला की रोमान्स, प्रणय या बाबी येणारच. आणि त्यावर आक्षेपही नाही. फक्त यातले काही आनंद हे अधिक सार्वजनिक रीत्या सहजगतीने मांडता येतात, तसेच काही हे प्रत्येकाचे खाजगी असु शकतात. हेही अर्थात व्यक्तीसापेक्षा धरुन चालु. पण गाणी कविता लेख यातुन व्यक्त होणे वेगळे आणि या छायाचित्रातुन व्यक्त होणे वेगळे. हे छायाचित्र मला अश्लीलतेकडे झुकणारे वाटले, म्हणुन मी तसे लिहिले. आक्षेप रोमान्सला नव्हता, या छायाचित्रातुन दिसणार्‍या त्या सादरीकरणाला होता आणि म्हणुनच मला मिपावर ते योग्य वाटले नाही. मी फक्त माझे वैयक्तीक मत सांगितले. मिपाकरांची मते वेगळी असु शकतात, त्यामुळे फोटो काढुन टाका असे मी म्हणाले नाही. फक्त पटले नाही हे मत नोंदवले.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

किल्लेदार
Tue, 08/04/2015 - 07:58 नवीन
मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल आभार. :)
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत.

सूड
Tue, 08/04/2015 - 14:25 नवीन
मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत.
काय सांगता?
↩ प्रतिसाद: किल्लेदार

आमची एंट्री

प्रभो
Fri, 07/31/2015 - 13:52 नवीन
भेडसे लेण्यांना जाताना एका पानावर जमलेले पावसाचे दवबिंदू... मोबाईल क्यामेर्‍याने टिपलेले. Image removed.

वाव! मस्तच.

प्रियाजी
Fri, 07/31/2015 - 15:49 नवीन
खूप सुंदर!

सगळे फोटू आवडले फक्त तो वरचा

रेवती
Fri, 07/31/2015 - 16:24 नवीन
सगळे फोटू आवडले फक्त तो वरचा बाई आणि मनुष्याचा अस्थानी आहे...........आणि आपण क्लिकवलेलेच द्यायचे आहेत ना?

आपली एन्ट्री

चौकटराजा
Fri, 07/31/2015 - 18:49 नवीन
Image removed. एन एच फोर इन रेन स्थळ - वाघजाई उतार -खंडाळा वेळ सकाळी साडे दहा दि. गुरू ३० जुलै २०१५

हा स्पर्धेसाठी नाही ....

चौकटराजा
Fri, 07/31/2015 - 18:58 नवीन
Image removed. स्थळ - खण्डाळा गाव कॉर्नर .. वेळ सकाळी ९ ची दि. ३० जुलै २०१५

स्पर्धेसाठी नाही...

विशाल कुलकर्णी
Sat, 08/01/2015 - 10:55 नवीन
इथे रेंगाळला पाऊस... Image removed.

माझी प्रवेशिका-पाउस

रोहन अजय संसारे
Mon, 08/03/2015 - 17:01 नवीन
आनुस्कुरा घाट - पाचल - कोकण https://lh3.googleusercontent.com/-b9OowGdtV1A/Vb9LwPcUedI/AAAAAAAAAM0/E3domHIO5js/s576-Ic42/IMG_6044.JPG

माझी प्रवेशिका-पाउस

रोहन अजय संसारे
Mon, 08/03/2015 - 17:02 नवीन
आनुस्कुरा घाट - पाचल - कोकण Image removed.

स्पर्धेसाठी (रत्नागिरी जेट्टी

नन्दादीप
Mon, 08/03/2015 - 17:49 नवीन
स्पर्धेसाठी (रत्नागिरी जेट्टी) Image removed. स्पर्धेसाठी नाही Image removed. स्पर्धेसाठी नाही Image removed.

सहज आपला एक...........स्पर्धेसाठी नाही.........

किल्लेदार
Tue, 08/04/2015 - 08:08 नवीन
हा पाऊस पडण्याआधीचा आहे…म्हणून स्पर्धेसाठी नाही :) Image removed.

अफ़ाट सुंदर फ़ोटो

कपिलमुनी
Tue, 08/04/2015 - 13:57 नवीन
तुम्ही अफ़ाट सुंदर फ़ोटो काढता ! डोळ्याचे पारणे फिटते !
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अप्रतिम..

चिगो
Tue, 08/04/2015 - 14:28 नवीन
हा अप्रतिम सुंदर फोटो आहे.. हा द्याच स्पर्धेसाठी. आणि कपिलमुनींनी, ज्यांचा फोटो माझ्यामते ह्या विषयातला 'टॉप कंटेंडर' आहे, त्यांनी एवढी खुलून समरसून दाद द्यावी म्हणजे क्या बात.. हा यारानाच सगळ्यात जास्त भावतो मला मिपा आणि मिपाकरांमधे..
↩ प्रतिसाद: किल्लेदार

काय आहे नेमकं हे?

प्यारे१
Tue, 08/04/2015 - 22:13 नवीन
काय आहे नेमकं हे? कधी नि कसं पकडलंत हे दृश्य ते सांगाल काय? (camera settings बद्दल माहिती नसलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत सांगता येईल काय)
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अप्रतिम !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/04/2015 - 23:15 नवीन
अप्रतिम !
↩ प्रतिसाद: किल्लेदार

तळ्याकाठची दुपार

किल्लेदार
Wed, 08/05/2015 - 00:11 नवीन
हा एका तळ्याकाठी दुपारी काढलेला फोटो आहे. फोटो काढल्यावर लगेच पाऊस सुरु झाला. इतका जोरात…. की कारच्या काचा पूर्णपणे अपारदर्शक झाल्या. ट्रायपॉड वापरायला सवड आणि जागा पण मिळाली नाही. नाहीतर अजून रौद्र रूप दाखवता आले असते. शिवाय अंधार असल्यामुळे हात स्थिर ठेवतांना कसरत करावी लागली ते वेगळेच. याचे अजून काही सुंदर फोटोज मिळाले पण त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल.
↩ प्रतिसाद: किल्लेदार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा