✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

स
संपादक मंडळ यांनी
Fri, 07/24/2015 - 10:53  ·  लेख
लेख
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
79230 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

स्पर्धेसाठी नाही...

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 12:04 नवीन
मढेघाटात... Image removed. Image removed. बेडसे लेणी, कामशेत Image removed.

ओलेचिंब फ़ोटो

कपिलमुनी
Mon, 07/27/2015 - 12:35 नवीन
सुंदर आहेत
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

विशालदा

सविता००१
Mon, 07/27/2015 - 14:17 नवीन
सगळेच फोटो मस्त आहेत रे.........
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

(No subject)

ajaypadwal
Mon, 07/27/2015 - 12:27 नवीन
Image removed.

लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 14:32 नवीन
लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा देऊ नये (याने चित्र दिसत नाही)... थंबनेलवर डबलक्लिक / क्लिक करून दिसणार्‍या मूळ चित्राचा द्यावा.
↩ प्रतिसाद: ajaypadwal

मी हाच प्रयत्न खूप वेळा केला

ajaypadwal
Tue, 07/28/2015 - 10:49 नवीन
मी हाच प्रयत्न खूप वेळा केला ... तरी काहीतरी चुकतंय ....
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

ajaypadwal
Mon, 07/27/2015 - 12:29 नवीन
Image removed.

लिंक द्या

पैसा
Mon, 07/27/2015 - 12:52 नवीन
चित्राची बरोबर लिंक द्या.
↩ प्रतिसाद: ajaypadwal

लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 14:32 नवीन
लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा देऊ नये (याने चित्र दिसत नाही)... थंबनेलवर डबलक्लिक / क्लिक करून दिसणार्‍या मूळ चित्राचा द्यावा.
↩ प्रतिसाद: ajaypadwal

पावसाचे थेम्ब

टुंड्रा
Mon, 07/27/2015 - 12:31 नवीन
Image removed.

वाह... सुंदर !

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 12:49 नवीन
वाह... सुंदर !
↩ प्रतिसाद: टुंड्रा

अतीसूंदर

कंस
Wed, 07/29/2015 - 07:35 नवीन
अतीसूंदर
↩ प्रतिसाद: टुंड्रा

स्पर्धेसाठी...

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 12:49 नवीन
उल्हास व्हॅली, लोनावळा इथे वाढला वसंत, दंवे ओलावली माती सुखकर थांब ऐकु दे समीरा गीत हिरवाईचे निवांत क्षणभर थांब जरा बोल हळु ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर बघ निशःब्द रानवेली अलवार करीती नाजुक कुरकुर ओज कसे वृक्षगर्भी ओल्या पानांची किंचीत थरथर झाडांमधुनी नागमोडी वाट जशी कुणी नार अटकर हे रान हिरवे लाजले कोवळी जणु नववधु नवथर इथे ओलावला वसंत पालवी गाते हिरवाई निरंतर सभोवार सौंदर्य फाकले क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर विशाल... Image removed.

जबरदस्त!

पैसा
Mon, 07/27/2015 - 12:54 नवीन
कविता सुंदर आणि फोटो पण क्या कहने!
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

एकदा ह्या दरीत खंडाळ्यावरुन

प्रचेतस
Mon, 07/27/2015 - 12:54 नवीन
एकदा ह्या दरीत खंडाळ्यावरुन उतरलो होतो. पण कुणे धबधब्यापर्यंत मधल्या डोहांमुळे जाता आले नव्हते.
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

तिथेही जाता येते पण

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 13:09 नवीन
तिथेही जाता येते पण पावसाळ्यात थोडे रिस्की आहे.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त १ नंबर

अमृत
Mon, 07/27/2015 - 13:49 नवीन
आक्षेप नसल्यास वॉलपेपर म्हणून वापरू काय?
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

आक्षेप कसला आलाय त्यात?

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 15:56 नवीन
आक्षेप कसला आलाय त्यात? तुम्ही विचारताय हा तुमचा सच्चेपणा झाला. न विचारता वापरला असतात तरी कोणी काहीच करु शकलं नसतं. सो गो अहेड !
↩ प्रतिसाद: अमृत

वाह..

चिगो
Mon, 07/27/2015 - 14:12 नवीन
सुंदर, आल्हाददायक फोटो..
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

झक्कास

सविता००१
Mon, 07/27/2015 - 14:19 नवीन
कविता आणि फोटो यातलं जास्त छान काय ते ठरवता येइना विशालदा
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

धन्यवाद माय :)

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 15:57 नवीन
धन्यवाद माय :)
↩ प्रतिसाद: सविता००१

ए..

सविता००१
Mon, 07/27/2015 - 16:45 नवीन
काहीही काय ;)
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सुंदर फोटो... कविताही मस्तच !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 14:34 नवीन
सुंदर फोटो... कविताही मस्तच !
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

अतीशय सूंदर

कंस
Tue, 07/28/2015 - 07:34 नवीन
वा तारीफे काबील फोटो
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

मढे घाट

बेन१०
Mon, 07/27/2015 - 15:03 नवीन
मढे घाट Image removed.

मस्तच

सविता००१
Mon, 07/27/2015 - 16:46 नवीन
छान आहे फोटो. अप्रतिम
↩ प्रतिसाद: बेन१०

लक्ष्मी धबधबा

रवीराज
Mon, 07/27/2015 - 16:35 नवीन
तो हाच का.

पांडुची वेंट्री????????

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/27/2015 - 16:50 नवीन
पांडुची वेंट्री???????? . . . . .. . . . . ७ऑगस्ट. Image removed.

हा धागा वेड लावणार

अमृत
Mon, 07/27/2015 - 17:29 नवीन
नक्कीच. वाखुसाआ.

फिलाडेल्फिया

आशय ढवळे
Mon, 07/27/2015 - 17:30 नवीन
Image removed.

आईशप्पत...........

सविता००१
Mon, 07/27/2015 - 17:42 नवीन
भारी
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

अप्रतिम !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 18:12 नवीन
अप्रतिम !
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

अप्रतिम

कपिलमुनी
Mon, 07/27/2015 - 18:28 नवीन
रंगसंगती लाजबाब !
↩ प्रतिसाद: आशय ढवळे

दिसलेले सगळेच फोटो क ह र आहेत

प्यारे१
Mon, 07/27/2015 - 17:46 नवीन
दिसलेले सगळेच फोटो क ह र आहेत. (काही न दिसल्याने निराशा झाली आहे.)

मस्त फोटो आणि विषय!

इशा१२३
Mon, 07/27/2015 - 18:13 नवीन
मस्त फोटो आणि विषय!

सर्वच फोटो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/27/2015 - 18:15 नवीन
एकापेक्षा एक जब्बरदस्त. जियो फ्रेंड्स जियो. -दिलीप बिरुटे

थोडा निराश झालो ...

चौकटराजा
Mon, 07/27/2015 - 19:01 नवीन
सर्व फोटो चांगले आहेतच पण भर पावसाचा धिगाणा दाखविणारा एकही फोटो नाही म्हूनशान नाराज !

सर्व फोटो चांगले आहेत.

जुइ
Tue, 07/28/2015 - 03:54 नवीन
मात्र पाऊस पडत असलेला एकही नाही.

पावसाच्या सरी...

मोहनराव
Tue, 07/28/2015 - 16:32 नवीन
Image removed.

महाड वाळनकोनडि गाव

Vikrant
Wed, 07/29/2015 - 11:37 नवीन
Image removed.

प्राकाशित केलेला फोटो दिसत

Vikrant
Wed, 07/29/2015 - 11:43 नवीन
प्राकाशित केलेला फोटो दिसत नाहि पहिल्यानदाच प्राकाशित करतोय मदत करावि

मदत

पैसा
Wed, 07/29/2015 - 12:13 नवीन
http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यावर लिहिल्याप्रमाणे. तरी जमले नाही तर इथेच मूळ फोटोची लिंक द्या.
↩ प्रतिसाद: Vikrant

दोन त्रुटी आहेत

श्रीरंग_जोशी
Wed, 07/29/2015 - 17:58 नवीन
त्रुटी:
  • तुम्ही फोटोचा प्रत्यक्ष पत्ता .jpg चा समावेश असलेला न वापरता गुगल फोटोजच्या पेजचा युआरएल वापरला आहे.
  • त्या युआरएल वर गेलो असता फोटो किंवा अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस नसल्याचे दिसत आहे.
उपायः
  • सर्वप्रथम या फोटोला पब्लिकली शेअर करा.
  • गुगल फोटोजमध्ये फोटो उघडल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएलद्वारे प्रत्यक्ष पत्ता मिळवा अन तो पत्ता इथे वापरा.
एक महत्वाची चाचणी:
  • यापुढे इथे फोटो प्रकाशित करताना फोटोचा युआरएल गुगल अकाउंटमधून लॉग आउट करून उघडून पहावा म्हणजे जालावर प्रत्येकाला तो दिसू शकतोय की नाही याची खातरजमा करता येईल.
↩ प्रतिसाद: Vikrant

सुंदर फोटोज... :)

मदनबाण
Wed, 07/29/2015 - 11:58 नवीन
सुंदर फोटोज... :) वेळ मिळाल्यास मी सुद्धा फोटू टाकेन हिथ... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

महाड वाळनकोडि गाव

Vikrant
Wed, 07/29/2015 - 12:20 नवीन
Image removed.

आवडले एकदम

सोंड्या
Wed, 07/29/2015 - 12:51 नवीन
आवडले एकदम गरद लेणी (पळू) जवळील गीरन्यांची* आठवण आली * - गीरी-नद्या याचा अपभ्रंश असावा हा बहुतेक
↩ प्रतिसाद: Vikrant

(No subject)

Vikrant
Wed, 07/29/2015 - 12:59 नवीन
Image removed. Image removed. Image removed.

सगळेच फोटो अप्रतीम..

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 07/29/2015 - 13:09 नवीन
सगळेच फोटो अप्रतीम...अॉफीसच्या रुक्ष वातावरणात हे फोटो सहलीचा फिल घेताहेत. जियो मिपा आणी मिपाकर्स. ..

अगदि +१००

दिपक.कुवेत
Wed, 07/29/2015 - 14:34 नवीन
सरसच आहेत सगळे फोटो.
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

ताम्हिणी घाट

आशय ढवळे
Wed, 07/29/2015 - 15:35 नवीन
Image removed.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा